"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎बाह्य दुवे: समानीकरण
ओळ २२४: ओळ २२४:
* [http://www.angelfire.com/ma/sarod/tabla.html विभिन्न घराण्यांचे संक्षिप्त विवरण]
* [http://www.angelfire.com/ma/sarod/tabla.html विभिन्न घराण्यांचे संक्षिप्त विवरण]
* [http://soundlab.cs.princeton.edu/research/controllers/etabla/ इलेक्ट्रॉनिक तबला]
* [http://soundlab.cs.princeton.edu/research/controllers/etabla/ इलेक्ट्रॉनिक तबला]

* [http://www.zimbio.com/Ahmedabad+India/articles/m6bGDkoCGFG/Most+Number+Musician+Playing+Tabla+Longest Largest Hand Drum Ensemble Guinness World Record]{{मृत दुवा}} (321 Students playing tabla non stop for 1 hour)





०८:१२, १८ मे २०१६ ची आवृत्ती

उदयोन्मुख लेख
हा लेख १ जानेवारी, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख


तबला (डावीकडे) आणि डग्गा (उजवीकडे)
चित्र:Rimpa shiva.JPG
महिला तबलावादक रिंपा शिवा

तबला हे एक अभिजात हिन्दुस्तानी संगीतात वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी ही दोन भागांची असते. उजखोर्‍या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला (किंवा दाया) व डाव्या हातास डग्गा (किंवा बाया)असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक तबलजी वा तबलिया म्हणून ओळखले जातात.

इतिहास

भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री

तबल्याच्या उत्पत्तीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इ.स.पूर्व २०० मध्ये भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे सिद्ध करता येते. अर्थातच इतर कोणताही विरोधी पुरावा नसल्याने हे वाद्य भारतात बनले असेही म्हणता येते.

ताल कसे वापरावेत हा संदर्भ वेदांतून आढळतो. ही ताल विषयातील पाहिली मानवी नोंद आहे असे म्हणता येते. नारदीयशिक्षा या ग्रंथात इसपूर्व २२ मध्ये ताल व लय या संदर्भात तपशीलवार लेखन आहे. यामध्ये रागगायन यांना ताल पूरक असतात असा सिद्धान्त मांडला आहे. या ग्रंथात असलेले तालाचे उल्लेख भारतात अतिशय प्रगत असे तालवाद्य इतिहासकाळी वापरात होते हे सिद्ध करते. या काळात तबल्याला पुष्कर असेही नाव होते. भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र हे ताल या विषयाचे विवेचन करते, तसेच गायन करताना तालाचे महत्त्वही सांगते. या ग्रंथामध्ये तबल्याच्या काही अतिशय प्रगत तालांचे वर्णन आहे. बाराव्या शतकात शारंगधर यांनी संगीत रत्‍नाकर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात तबल्याच्या बोलांचे वर्णन लिखित स्वरूपात आहे.

काही लोक तबल्याचा जनक म्हणून अमिर खुस्रोकडे पाहतात. परंतु भाजे येथील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. पखवाजाचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. अरबी भाषेतील 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात दिल्लीच्या सिद्धारखॉँ यांनी प्राचीन तबल्याची सद्य कालीन तबल्याची शैली परत प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.

घडण

तबल्याचे विविध भाग

तबला

चांगल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. खैराचे वा शिसवी लाकूड यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास पुडी असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास चाट (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास लव किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध शाई लावण्यात येते. तबल्याची पट्टी (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे संवादिनी /बाजाच्या पेटीचा वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरूनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या काळी चार शी सम-स्वरात असलेला तबला काळी चारचा तबला म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर लावला तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी गठ्ठे (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा टीपेकडे जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे गजरा होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या वाद्या गजर्‍यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस गुडरी म्हणतात. वाद्या वरच्या अंगाला गजर्‍यात तर खालच्या अंगाला गुडरीतून ओवलेल्या असतात.

डग्गा

प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची शाई तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याचे भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास डुग्गी म्हणतात.

तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास गादी, तबला/डग्गा सुरावर लावण्यास हातोडी व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी पावडर असा सरंजाम असतो.

घराणी

ख्याल गायकीत तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी पखवाज वगळता कोणताही उन्नत पर्याय उपलब्ध नाही.

वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात खालील घराण्यांचा समावेश होतो.

  • दिल्ली घराणे

दिल्लीच्या उस्ताद सिध्दारखाँ यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.[१]

  • लखनौ घराणे

सिद्धारखाँ यांचे नातु मोदू व बक्षु या घराण्याचे प्रवर्तक होत. लखनौ भागात नृत्याचा प्रचार जास्त असल्याने त्यास अनुकल हा बाज जोरदार व खुला आहे. मोठे परण व तुकडे हे या बाजाचे वैशिष्ट्य आहे.[२]

  • बनारस घराणे

मोदू खाँ यांचे शिष्य पं राम सहाय या घराण्याचे प्रवर्तक. बनारसचा बाज खुला व ठुमरी शैलीस पोषक असा आहे.

  • पंजाब घराणे

पंजाबमधील तबलवादक हुसेनबक्ष हे या घराण्याचे मूळ प्रवर्तक. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन पंजाब घराण्याचे प्रतिनिधीत्व करतात. बंद प्रकारे बोल वाजवण्याची पंजाब घराण्याची खासियत आहे.[३]

  • इंदूर घराणे

इंदूर दरबारचे प्रसिद्ध पखवाजवादक पं. नानासाहेब पानसे हे या घराण्याचे प्रवर्तक. पखवाजाचा या घराण्याच्या शैलीवर विशेष प्रभाव आहे.

या खेरीज फारुकाबाद, अजवाडा आदि तबल्याची इतर घराणी आहेत.

विख्यात तबलजी

पारिभाषिक शब्द

ताल

मुख्य लेख: ताल

उत्तर हिंदुस्तानी संगीतात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्त्रांचा झपताल किंवा ७ मात्त्रांचा रूपक. तालाने सांगीतिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेऊन तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगीतिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच बढत घेत तबलजी द्रुत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्त्रांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगीतिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्रांचा कायदा वाजवून समेवर येता येते.

संगीतास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.

लय

लय म्हणजे सांगीतिक वेळ. लयीचे तीन प्रकार आहेत.

  • विलंबित
  • मध्यम
  • द्रुत

गणितीदृष्ट्या मध्यम लय ही विलंबित लयीच्या दुप्पट व द्रुत लयीच्या अर्धी असते. पण मध्यम लय ही घड्याळी वेळेशी बांधलेली नाही. याचा अर्थ असा की कलाकारास आपली मध्यम लय पकडण्याचे स्वातंत्र्य असते. पण एकदा कलाकाराने स्वतःची मध्यम लय ठरवल्याव‍र विलंबित व द्रुत लयी आपोआप निश्चित होतात.

मात्रा

तबल्यातील कालमोजणीचे एकक म्हणजे मात्रा होय. पारंपारिकरीत्या र्‍हस्व अक्षर उच्चारण्यास जितका वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. संगितात येणारे एकंदर ताल कोष्टकातील आठ कालांनीच मोजले जातात.[४]

 कालाचे नाव  मात्रा  सेकंद
 त्रुटी
 १/८  १/८
 अनद्रुत
 १/४  १/४
 द्रुत     १/२  १/२
 लघु  १  १
 गुरू  २  २
 काकपद   ४  ४
 हंसपद     ८  ८
 महाहंसपद  १६  १६ 

ताल उपांग

ताल उपांगामध्ये कायदा, पेशकार, परण, त्रिपल्ली व तिहाई, सवाल जवाब,चक्रधार, तुकडा, ठेका, लडी, गत, रेला आदि उपप्रकारांचा समावेश होतो. वरील प्रकारांच्या आधाराने तबलजी तालाचा विस्तार करतो.

लेहरा

जसे स्वरवाद्य वादनाच्या मैफिलीमध्ये वादक तालातच वाजवत असला, तरी संदर्भ आणि सौंदर्यवॄद्धीकरिता तालवाद्याची साथ घेतो, तसेच तालवाद्य वादक श्रोत्यांना वादनाचा तालसंदर्भ कळावा म्हणून एखाद्या स्वरवाद्याची साथ घेतो. तालवाद्याच्या साथीकरिता होणार्‍या या स्वरवाद्य वादनाला लेहरा/लेहेरा म्हणतात.

मात्र स्वरवाद्याच्या साथीला होणाऱ्या तालवाद्य वादनामध्ये जश्या स्वरवाद्य वादनाच्या ढंगानुरूप वैविध्यपूर्ण तत्काल रचना वाजविल्या जातात, ते लेहरा वाजविताना केले जात नाही. तालवाद्य वादन हे अनेकदा तालगणनाच्या दॄष्टीने क्लिष्ट होत असल्याने लेहरा वाजविताना जवळपास कोणताही बदल न करता तेच आवर्तन परत परत वाजविले जाते. म्हणून "लेहरा वाजविणे" यापेक्षा सामान्यतः "लेहरा धरणे" हा शब्दप्रयोग केला जातो.

लेहरा साठी सारंगी सर्वात लोकप्रिय आहे.

लेहरा वादक तालाला अत्यंत पक्का असणे आवश्यक असते, कारण तालवाद्यवादक क्लिष्ट रचना वाजवीत असता वादक आणि श्रोते लेहरा हा तालसंदर्भ म्हणून वापरतात. मात्र लेहरा वादकाला बाह्य तालसंदर्भ नसल्याने त्याला स्वतःला योग्य आणि स्थिर लयीत स्वतःच वादन करावे लागते.

तबल्याची वर्णमाला

डाव्या हातास डग्गा व उजव्या हातास तबला असे गृहित धरले आहे.

उजव्या हाताचे बोल

  • ती/तीं/रे/टे
  • ता/ना
  • तुन/खुन/डा
  • तिन
  • त्रक/ती र

डाव्या हाताचे बोल

  • कत्/के
  • ग/गे, घ/घे
  • गमक

दोन्ही हातांचे संयुक्त बोल

  • धा ( ता/ना + ग/गे, घ/घे)
  • था ( ता/ना + क/के)
  • धिन ( तीन + ग/गे, घ/घे )
  • धे (ते/रे/टे + ग/गे, घ/घे)
  • क्ते ( के + ते/रे/टे)

विशेष बोल

  • गदिगन
  • तिरकिट
  • त्वकत्वक
  • धीरधीर
  • धेनेघेने / दिंग


इलेक्ट्रॉनिक तबला

बदलत्या काळासोबत नवे बदल अभिजात संगितात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक तबला हा ही त्या पैकी एक. तबल्याचा उपयोग अभिजात संगितात ठेका देण्यासाठी होतो. गायनात विशेषत: रियाझात 'इलेक्ट्रॉनिक तबल्याचा' चांगला उपयोग होतो. अर्थात याच्या काही मर्यादा आहेत. जसे - यात केवळ पायाभूत ताल असतो पण तबलजी गायनासोबत देऊ शकतो तशी साथसंगत यात शक्य नाही

स्वरलिपी

परंपरेने तबल्याचे शिक्षण मौखिक पद्धतीने दिले जात असे. त्यामुळे स्वरलिपीची (Notation) संकल्पना पूर्वी नव्हती. एकोणिसाव्या शतकात पं. भातखंडे व पं विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी तबल्याची स्वरलिपी प्रचारात आणली.

तबल्याची परिभाषा

तबला जसा वाजवला जातो, तसा तो लिहिलाही जातो. आधी तबल्याचे बोल लिहून घ्यावे, आणि मगच अक्षरांचा 'निकास' करावा अशीच शिकण्याची पद्धत आहे. तबला या वाद्याची ओळख फारशी नसलेल्यांना, त्याची म्हणून एक परिभाषा आहे हे लक्षातही येत नाही.. ही परिभाषा हाच तबल्याचा आधार आहे.

तबल्याचे ताल, कायदे, रेले, बंदिशी अक्षरबद्ध करण्याची पद्धत वगैरेंचा सर्वप्रथम उल्लेख १८५५च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या पुस्तकात आहे. अक्षर लेखन म्हटलं की, लिपी, ती लिहिण्याची पद्धती हे सर्व ओघाने येते.

'परिपूर्ण तबला लिपी' हे संजीव शेलार यांचे पुस्तक या विषयाला वाहिलेला ग्रंथच आहे. त्याची अनुक्रमणिका अशी :-

१)‍लिपीची निकड २) तिचं शास्त्र ३) तिचे गुणधर्म ४) इतिहास आणि ५) नवे प्रयोग अशी महत्त्वाची प्रकरणे, त्यानंतर 'शेलार लिपी'चा ऊहापोह... विविध रचना, ताल त्यांची लयकारी, नृत्यातील रचना, लिपींची तुलना, अक्षर चिन्हे... असा हा अभ्यासपूर्ण प्रवास या पुस्तकामुळे जिज्ञासू वाचकाचा होतो. संदर्भ ग्रंथांची सूची अखेरीला दिली आहे, ती फारच महत्त्वाची आहे. त्यांतील सर्वच ग्रंथ अभ्यास करणार्‍यांना सहज उपलब्ध असावेत.

पं. विष्णू नारायण भातखंडे या संगीतज्ञाने भारतीय संगीताला लिपी दिली. त्यानंतर पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गणितावर आधारित लिपी तयार केली. दोघांनी देशभर संगीत-कलेचा प्रचार-प्रसार केला. तबला लेखनासाठी दोन्ही लिपींचा वापर होऊ लागला अशी माहिती पुस्तकात सुरुवातीलाच आहे. प्रचलित लिपींचा लेखकाने अभ्यास केला आणि त्यात स्वतःची भर घातली. सुधारित, शास्त्रोक्त लिपी तयार केली.

अशी सुधारित लिपी लेखकाचे गुरू श्री. अभय सामंत यांनी पसंत केली. तबल्याच्या विद्यार्थ्यांनी, ती वापरण्यास सोपी असल्याचे मत दिले आणि पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात या लिपीचेचं सादरीकरण आणि स्वागत झाले.

संजीव शेलार हे उच्चविद्याविभूषित (B.E. (civil), M.S. (structures),

भातखंडे स्वरलिपी

पलुस्कर स्वरलिपी

शेलार लिपी

शेलार लिपीसाठी http://tablashelar.com/notation-mar.htm पहावे.

पुस्तके

  • शास्त्रीय तबला गाईड (सन १९५९) - भास्कर गणेश भिडे
  • तबला - लेखक अरविंद मुळगांवकर, पॉप्युलर प्रकाशन, ISBN:978-81-7185-526-1 - तबल्याची रचना, बांधणी, मापे, तबलावादकांची घराणी, तबल्याचा रियाज करण्याच्या पद्धती, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन आणि स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
  • (पुस्तकाचे नाव उपलब्ध नाही) लेखक पुरुषोत्तम गोपाळ घारपुरे, १८५५ साली प्रकाशित
  • परिपूर्ण तबला लिपी - लेखक संजीव शेलार (राजहंस प्रकाशन, जानेवारी २०१५)
  • तबला गाईड - सुरेश सामंत (नितीन प्रकाशन)
  • तबला गाईड - लेखक गजेंद्रगडकर
  • Diamond Tabla Guide - बालकृष्ण गर्ग
  • ताल वैभव - लेखक विजय किरपेकर
  • साथ संगत (तबला वादनावरील पुस्तक) - लेखक शरणकुमार लिंगाळे

संकेतस्थळ

संदर्भ

  1. ^ तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ १९
  2. ^ तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ २०
  3. ^ तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ २२
  4. ^ शास्त्रीय तबला गाईड(सन १९५९) - भास्कर गणेश भिडे

बाह्य दुवे