"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
[[वर्ग:हिंदू दिनदर्शिका]]
[[वर्ग:हिंदू दिनदर्शिका]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:अन्य भाषेतील मजकूर वगळावयाची पाने]]

२१:११, ९ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

तिथी हे हिंदू कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय. अशा या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाला एक मास म्हणतात.

तिथीचे मापन

एका विशिष्ठ वेळी चंद्र आणि सूर्य एकत्र आले की अमावस्या होते.चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.


तिथींची नावे

१.प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पोर्णिमा किंवा अमावस्या.