"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:

==अभिनय-प्रवास==
==अभिनय-प्रवास==
[[Image:Ashoksaraf1.PNG |250px|right|thumb|'एक शेर दुसरी सव्वाशेर' चित्रपटातील एक दृष्यात अशोक सराफ]]
[[Image:Ashoksaraf1.PNG |250px|left|thumb|'एक शेर दुसरी सव्वाशेर' चित्रपटातील एक दृष्यात अशोक सराफ]]

अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकें सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी पांडू हवालदार मध्ये दाखविली तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर [[चौकट राजा, चित्रपट|चौकट राजा]] मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐंशीच्या दशकात [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने [[अशी ही बनवाबनवी, चित्रपट|अशी ही बनवाबनवी]], [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]], [[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]] यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला [[सचिन पिळगांवकर]], [[महेश कोठारे]] यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून [[नवरी मिळे नवर्‍याला, चित्रपट|नवरी मिळे नवर्‍याला]], [[आत्मविश्वास, चित्रपट|आत्मविश्वास]], [[गंमत जंमत, चित्रपट|गंमत जंमत]], [[आयत्या घरात घरोबा, चित्रपट|आयत्या घरात घरोबा]] पासून अलिकडच्या [[शुभमंगल सावधान, चित्रपट|शुभमंगल सावधान]] आई नं.१ व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले.

१८:१८, १२ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती

अशोक सराफ
जन्म जानेवारी १, इ.स. ??
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
हिंदी चित्रपट
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
कारकीर्दीचा काळ १९७१ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवर्‍याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा
वजीर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हम पांच
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार
पत्नी निवेदिता जोशी

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. लक्ष्मीकांत बेर्डे सोबत मराठी चित्रपट्सृष्टीच्या विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होय. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही विविध भूमिका केल्या असून दुरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पॉंच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.

ओळख

मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षीण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतुन देखिल त्यांनी भुमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' मधील इरसाल पोलिस, 'राम राम गंगाराम' मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक , सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

अभिनय-प्रवास

चित्र:Ashoksaraf1.PNG
'एक शेर दुसरी सव्वाशेर' चित्रपटातील एक दृष्यात अशोक सराफ

अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकें सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी पांडू हवालदार मध्ये दाखविली तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर चौकट राजा मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवर्‍याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा पासून अलिकडच्या शुभमंगल सावधान आई नं.१ व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले.

'अनाधिकृत' या त्यांच्या रंगभुमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन' नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.[१] पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मीती संस्था स्थापन करुन 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. अशा प्रकारची लोकप्रियता मिळवणारे अशोक हे बहुधा पहिले मराठी कलावंत ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.

मराठी हृदयात मानाचं स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्वेशन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.

कारकीर्द[२]

नोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही

चित्रपट

मराठी चित्रपट

चित्र:Ashi hi banwabanwi.jpg
अशी ही बनवाबनवी:अशोक सराफ यांचा लोकप्रिय चित्रपट

हिंदी चित्रपट

  • कुछ तुम कहो कुछ हम कहें
  • बेटी नं. वन
  • कोयला
  • गुप्त
  • ऐसी भी क्या जल्दी है
  • संगदिल सनम
  • जोरु का गुलाम
  • खूबसूरत
  • येस बॉस
  • करण अर्जुन

रंगमंच

  • हमीदाबाईची कोठी
  • अनधिकृत
  • मनोमिलन
  • हे राम कार्डिओग्राम

दूरचित्रवाणी

  • टन टना टन (ई.टीवी मराठी)
  • हम पांच (झी वाहिनी)

संदर्भ