"इथियोपियन एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Abhijitsathe ने लेख इथियोपियन एरलाइन्स वरुन इथियोपियन एअरलाइन्स ला हलविला
छो Abhijitsathe ने इथियोपियन एअरलाइन्स हे पान इथियोपियन एरलाइन्स येथे, पुनर्निर्देशन करुन, पुनर्निर्...
(काही फरक नाही)

१५:४५, २२ मे २०१५ ची आवृत्ती

पूर्वी इथियोपियन विमान कंपनी इथिओपिया ध्वज वाहक[१] या नावाने ओळखली जात होती आणि ती संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची होती. ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना[२] ह्यांचे सदस्य बनले.

या कंपनीचे मुख्य कार्यालय[३] बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आदिस अबाबा येथे असून ८२ ठिकाणच्या प्रवाशांना या कंपनीमार्फत प्रवासासाठी सेवा दिली जाते. या कंपनीची १९ स्वदेशी आणि २३ मालवाहू बोटी आहेत . इथियोपियन एअरलाईन्स इतर एअरलाईन्सच्या तुलनेत आफ्रिकामध्येच अंतर्गत प्रवास सेवा देते. ही या उद्योगातील वेगाने वाढणा-या कंपन्यापैकी एक मानली जाते आणि आफ्रिका खंडातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ही एक उपखंडातील फायदेशीर हवाई कंपनी आहे .या हवाई कंपनीच्या जहाजी माल विभागाला "आफ्रिकन जहाजी माल हवाई कंपनी"[४] या पुरस्काराने वर्ष २०११ मध्ये सन्मानित करण्यात आले.

२०१० मध्ये इथियोपियनने "परिकल्पना २०१०" आत्मसात केली. ही १५ वर्षाची विकास धोरण योजना होती. सदर योजनेव्दारे या कंपनीला १२० इतका वेग , ९० प्रवासाची ठिकाणे ,१८ कोटीहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता विकसित करावयाची आहे तसेच ७२०००० टन्स माल वाहतूक करावयाची असून १७०००[५] कर्मचारी या विमान कंपनीमध्ये रोजगार मिळवतील अशी अपेक्षा आहे.१३ ज़ुलै २०१३ रोजी इथियोपियाने करारावर स्वाक्षरी करुन मालाविया वाहक हवाई कंपनीचा ४९% भाग संपादन केला. या नवीन विमान कंपनीला मालविया विमान कंपनी असे नाव देण्यात आले. मालविया विमान कंपनी जानेवारी २०१४ मध्ये[६] कार्यान्वीत झाली.

मुख्य कार्यालय

सध्या इथियोपियन हवाईकंपनीचे मुख्य कार्यालय बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आडिस अबाबा[७], येथे आहे. नवीन मुख्य कार्यालय बांधण्याचा या कंपनीची भविष्यातील योजना आहे. त्यासाठी 2009 मध्ये या कंपनीच्या नवीन कार्यालयाचा आराखडा बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण त्यातील कोणताही आराखडा मंजूर झाला नव्हता. १६ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी पुन्हा दुसरी फेरी घेण्याचे ठरविले आणि सप्टेंबर २०११ मध्ये BET या वास्तुविशारदाने स्पर्धा जिंकल्याची घोषणा केली. या हवाई कंपनीने बोले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूखंडावर अंदाजे ३०० कोटी (५,४०,००० वर्गफुट) इतक्या खर्चाचे मुख्य कार्यालय बांधायला सुरुवात केलेली आहे.

गंतव्यस्थान

सप्टेंबर २०१४ पासून ८३ आंतरराष्ट्रीय प्रवासी गंतव्यस्थानकांचा आणि २० स्वदेशी गंतव्यस्थानकांचा तसेच यूरोप आणि अमेरिकातील १३ तसेच मध्य पूर्व आणि एशियामधून २१ अशा आफ्रिकेतील ४९ शहराचा ( इथिओपियाला वगळून) समावेश झाला. आफ्रिकातील स्थानकांवर[८] १५, एशिया आणि मध्य पूर्वेतील ७ तसेच यूरोपातील २ अशा २४ ठिकाणी या कंपनीकडून सेवा दिली जाते. अनेकदा इथियोपियन कंपनी आफ्रिकेतील स्थानकांवर प्राधान्याने सेवा पुरवीते. त्यानंतर बाकीच्या हवाई कंपनीना प्राधान्य दिले जाते.

अलीकडील विकास

फेब्रुवारी २००५ मध्ये इथियोपियन हवाई कंपनीने ७८७ बोईंग ड्रीमलाइनर[९] खरेदी करण्याकरीता व आफ्रिकेतील पहिले वाहक बनविण्याकरीता करारावर स्वाक्षरी केली.

सेवासंस्था

इथियोपियन हवाई कंपनीच्या विमानांमध्ये क्लाउड नाइन[१०] या नावाचा बिझनेस व आणि इकॉनॉमी वर्ग असे दोन वर्ग उपलब्ध आहेत.[११]

अन्न आणि पाणी

सगळ्या विमानांमध्ये प्रवाश्यांना खादयपदार्थ आणि शीतपेये उपलब्ध करून दिली जातात. गरम जेवण, गरम किवा थंड खाद्यपदार्थ किंवा हलका फराळ याचा समावेश त्यांच्या खादयपदार्थामध्ये आहे. उड्डाणांच्या पल्ल्यावर आणि वेळेवर खादयपदार्थ अवलंबून आहेत. ज्यादा दराने मागणी असलेले पेय उपलब्ध करुन दिले जाते. एकापेक्षा अनेक ठिकाणी प्रवास करणा-या प्रवाशांना विशेष जेवणाची सोय सुध्दा करुन दिली जाते.

विश्राम कक्ष

बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथियोपियन विमान कंपनी प्रवाशांना दोन प्रकारची विश्राम कक्ष उपलब्ध करते . क्लाउड नाइनचे प्रवासी क्लाउड नाइन विश्राम कक्षामध्ये उड्डाणाच्या[१२] निर्गमनासाठी प्रतीक्षा करू शकतात. त्यांना विविध सुविधा पूरविल्या जातात. तसेच वैयक्तिक संगणक आणि वायरलेस कनेक्शन देखिल उपलब्ध करुन दिले जाते.

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://centreforaviation.com/analysis/ethiopian-airlines-to-continue-asia-expansion-with-singapore-non-stops-giving-changi-a-needed-boost-189892. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/६7g५Wf१79. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://centreforaviation.com/profiles/airlines/ethiopian-airlines-et. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/67YXKlRBW. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/6DQjyUg6c. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ मिउला ,मलेंगा (१६ फेब्रुवरी २०१४). (इंग्लिश भाषेत) http://web.archive.org/web/20140223173203/http://allafrica.com/stories/201402170110.html. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.ethiopianairlines.com/en/corporate/default.aspx. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ (इंग्लिश भाषेत) http://news.bbc.co.uk/2/hi/middle_east/8478290.stm. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/673N9wJ30. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ (इंग्लिश भाषेत) http://web.archive.org/web/20140625211836/http://www.ethiopianairlines.com/en/travel/inflight/firstclass.aspx. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/flight-booking/ethiopian-air-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  12. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.webcitation.org/67N1AJyoR. Unknown parameter |प्राप्त दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)