"शेळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
==इतिहास==
==इतिहास==
== वंश विषयक==
== वंश विषयक==
भारतात शेळ्यांच्या २३ जाती आढळतात.
भारतात शेळ्यांच्या २३ जाती आढळतात.बोएर जात जमुनपारी


== निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता ==
== निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता ==

१२:३५, ३ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

शेळी एक चतुष्पाद प्राणी आहे. यास बकरी असेही म्हणतात. या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते. बकरीचे मांस खाण्यासाठी वापरले जाते. तसेच बकरीचे दूध एक पूरक अन्न आहे. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात.

बकरी

भारतीय व बांगलादेश येथील शेळी सर्वात उत्तम मानली जाते. हीच शेळी ऑस्ट्रेलियात नेऊन त्यांची मोठ्या प्रमाणात संख्यावाढ केली आहे.

जगातील एकूण शेळ्यांपकी भारतात चौदा टक्के शेळ्या आहेत. दरवर्षी ३५-४० टक्के शेळ्या मांसोत्पादनासाठी वापरल्या जात असल्या तरी शेळ्यांची जुळे व तिळे करडे देण्याची क्षमता त्यांची संख्या टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे.

इतिहास

वंश विषयक

भारतात शेळ्यांच्या २३ जाती आढळतात.बोएर जात जमुनपारी

निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता

भौगोलिक हवामानाशी जुळलेली शेळी प्रजाती त्या प्रदेशात, हवामानात जास्त टिकणारी असते.

भारतीय शेळ्या

  • उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत काश्मिरी, चांगथांगी, चेंगू किंवा पश्मिना शेळ्या आढळतात.
  • पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांत जमुनापरी, बारबेरी, बीटल या प्रजातीच्या शेळ्या आहेत.
  • गुजराथ, मध्य प्रदेश, राजस्थान या कोरड्या भागांत कच्छी, काठेवाडी, जाखराणी, झालावाडी, मारवाडी, मेहसाणा, बेरारी, सिरोही या प्रजाती आढळतात.
  • दक्षिणी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांत उस्मानाबादी, कन्नीआडू, मालवारी, संगमनेरी, सुरती या प्रजाती जास्त दिसतात.
  • पूर्व भारतात आसाम हिल, गंजाम, ब्लॅक बेंगॉल या प्रमुख शेळ्या आहेत. यापकी ब्लॅक बेंगॉल शेळी पश्चिम बंगालमध्ये आढळते. तिची कातडी मऊ असल्याने परदेशात तिला चांगली मागणी आहे.

महाराष्ट्रातील शेळ्या

महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, कोकण कन्याळ, बोएर, व संगमनेरी शेळ्या आढळतात.

  • उस्मानाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागांत आढळतात.
  • संगमनेरी शेळीचा उगम अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर येथील आहे. ती दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे.
  • उस्मानाबादी शेळीचा उगम उस्मानाबाद येथील असून ती मांसासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे.
  • कोकणातील उष्ण, दमट हवामान व जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरण्याची क्षमता असलेली कोकण कन्याळ शेळी विकसित

करण्यात आलेली आहे. तिच्या अंगावर काळा रंग व त्यावर पांढरे पट्टे असतात. ही शेळी अतिपावसातही तग धरू शकते. तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

==उत्पादन==चागले बकरी मिलेल 7057311902

उपयोग

पश्मिना शेळी उच्च प्रतीच्या तलम पश्मिना लोकरीसाठी प्रसिद्ध आहे.

आर्थिक महत्त्व

शरीराने निरोगी, चपळ, काटक, पुढील दोन पायांत जास्त अंतर असलेली आणि मोठी कास असलेली शेळी पैदास करण्यासाठी चांगली समजली जाते. एका शेळीला २४ तासांत ५-६ किलो चारा लागतो.

संदर्भ

अधिक माहिती

बाह्य दुवे

कुतूहल: शेळ्यांमधील आजार लोकसत्ता


पहा : मेंढी