"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q5068400
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १०: ओळ १०:
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून त्यांनी आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">लीळाचरित्र, एकांक, लीळा ७</ref>
गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून त्यांनी आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.<ref name="leela7">लीळाचरित्र, एकांक, लीळा ७</ref>


सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव [[रिद्धपुर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभु]] दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref>
सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव [[रिद्धपुर]] येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री [[गोविंदप्रभु]] दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.<ref name="leela7"/> याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.<ref>संकपाळ (२००९) पृ. १२</ref> SAGAR M. WADHAI


==एकाकी भ्रमणाचा काळ==
==एकाकी भ्रमणाचा काळ==

१३:३३, २६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मियांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत. चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.

प्रारंभिक जीवन

चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पुर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.[१] पुढे हरपाळदेवांना द्यूत खेळायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून जुगाऱ्यांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यु झाला. परंतु स्मशानत सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जीवंत असल्याचे आढळून आले. महानुभावियांच्या मते यावेळी ईश्वराने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला.[२] ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.[२]

या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्या पुर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे द्युताचे व्यसन मात्र तसेच राहिले. एक दिवस द्युतात हारल्यामुळे त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांना देणेकऱ्यांचे पैसे परत करावे लागले.[३] या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासिन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करायचा निर्णय घेतला.

गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून त्यांनी आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले.[४]

सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव रिद्धपुर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या.[४] याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.[५] SAGAR M. WADHAI

एकाकी भ्रमणाचा काळ

गोविंदप्रभूंपासून शक्तीप्राप्तीनंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकटेच भ्रमण केले. आंध्रप्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.[६] यावेळीपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. या काळात चक्रधारांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते अंगणात झोपलेल्या एका स्त्रीच्या अंथरुणात जाऊन झोपले.[७] एका प्रसंगी वारंगल येथील एका अश्व व्यापाऱ्याने आपल्या मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.[८] गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी वडनेरचे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि शिष्यपरिवार चक्रधरांना मिळाला.

या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. नंतर एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर त्रंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.[९] अशा तर्‍हेने रिद्धीपुरापासून सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण पैठण इथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.

एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पुर्वतयारीच या काळात झाली.[९]

संदर्भ व नोंदी

  • महानुभाव पंथ :

भगवान श्री चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥

  • संकपाळ, बापूजी; श्रीचक्रधर (२००९); नॅशनल बूक ट्रस्ट, इंडिया; आय. एस. बी. एन. ९७८-८१-२३७-२५९०-१
  • लीळाचरित्र : एकांक; संपा. भालचंद्र सोहोनी (२००४); श्रीप्रसाद प्रकाशन, पुणे
  1. ^ संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी गुजरातवर स्वारी केली असता हरपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते. या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.
  2. ^ a b संकपाळ (२००९) पृ. ९-१० आणि १३. पंचावतारातील चवथा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यु झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. अन्य मतांनुसार चांगदेवांचा आत्मा मुक्त झाला; हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.
  3. ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ६
  4. ^ a b लीळाचरित्र, एकांक, लीळा ७
  5. ^ संकपाळ (२००९) पृ. १२
  6. ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ११ आणि १४
  7. ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा ११
  8. ^ लीळाचरित्र, एकांक, लीळा १६
  9. ^ a b संकपाळ (२००९) पृ. २६-२७