"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २०६: ओळ २०६:
* {{कौल|Y|अभय नातू}}
* {{कौल|Y|अभय नातू}}
* {{कौल|Y|J}}
* {{कौल|Y|J}}
* {{कौल|Y|सुधन्वा जोगळेकर }}
* {{कौल|Y|सुधन्वा जोगळेकर }}
* {{कौल|Y|अभिषेक सुर्यवंशी }}


===शीर्षकासाठी संपूर्ण नाव===
===शीर्षकासाठी संपूर्ण नाव===

१६:२१, ३१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.




दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव

हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. याची नोंद विकिपीडिया:प्रचालक आणि विकिपीडिया:प्रशासक या पानांवर केलेली आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.

नि:संदिग्धीकरण

@Mahitgar आणि अभय नातू: नि:संदिग्धीकरण पाने ही नि:संदिग्धीकरण या वर्गाव्यतिरीक्त अन्य वर्गातही असावीत यासाठी मराठी विकिपीडियाचे काही वेगळे धोरण आहे काय ? -- संतोष दहिवळ (चर्चा) ०९:५६, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

मी नि:संदिग्धीकरणात मुख्यत्वे मथळा साचेच लावले आहेत. नि:संदिग्धीकरण पानात काय काय असणे अधिक उचीत असेल. याबाबत मागे फार चर्चा झाली असेल असे वाटत नाही तरी एकदा चर्चा पानांचा ढोबळ शोध घेतलेला बरा असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५६, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)[reply]

लेखाधिकार (कॉपीराईट) संबंधित

जर मी विकी ची ध्येयधोरणे न वाचता एखाद्या लेखाधिकारित संकेतस्थळावरून माहिती कॉपि पेस्ट केलेले असेल तर काय होऊ शकते ?

उपरोक्त सही न केलेले लेखन बहुधा -सदस्य:Swapnil mangalvedhekar यांनी केले आहे.


आपल्या प्रश्न विचारण्याचा मुख्य हेतु लक्षात आला नाही, तरी जेवढे जमेल तेवढे उत्तर देतो.
जिथ पर्यंत विकिपीडियाचा संबंध आहे. कुणी प्रताधिकार विषयक अधिकृत आक्षेप नोंदवून प्रचालकांचे लक्ष वेधल्यास असे लेखन / छायाचित्र वगळले जाते. शक्य असल्यास संबंधीत सदस्यांना पुढे चालून तसे न करण्याची त्यांच्या व्यक्तीगत सदस्य चर्चापानावर बऱ्याचदा विनंतीही केली जाते. इतर वेळी शंका आलेल्या मजकुरावर कॉपीपेस्ट हा टॅग लावला जातो. असे टॅग लावलेले लेखन सहसा स्वत: कॉपीपेस्टरने सुधारणे अभिप्रेत असते अर्थात इतर इच्छुक सदस्यही यात सहभागी होऊ शकतात. कॉपीराईट मुख्यत्वे मांडणी आणि लेखन शैलीमुळे निर्माण होत असतो त्यातील वस्तुनिष्ठ फॅक्ट्सवर नसतो हे लक्षात घेणे गरजेचे असते; लिखीत मजकुरातील आलंकारीकता विशेषणे वगळून स्वत:च्या भाषेत पुर्नलेखन करून मुळ लेखनाचा संदर्भ दिल्यास बहुतांष लिखीत मजकुरा बद्दल समस्या सहजतेने सोडवणे शक्य असते. (अर्थात असे करणे शक्य असते, म्हणून "हेतुपुरस्सरच्या कॉपीपेस्टींगला उत्तेजन दिले जात नाही", हेही लक्षात घ्यावे). छायाचित्रात बदल करणे शक्य नसते कॉपीराईट परवाना नसलेली छायाचित्रे वगळण्याशिवाय बहुतांश वेळा पर्याय नसतो.
प्रताधिकार विषयक अधिकृत आक्षेप नोंदवण्याचे अपवादात्मक तुरळक प्रसंग घडले आहेत. सहसा संबंधीत मजकुर वगळल्या नंतर संबंधीत व्यक्तींनी मराठी विकिपीडियाचे महत्व लक्षात घेऊन कॉपीपेस्टर सदस्यांचा कायदेशीर पाठपुरावा केल्याचे अद्यापतरी पाहण्यात नाही पण कॉपीराईट असलेल्या संबंधीतांचे कायदेशीर आधिकार चांगलेच सबळ असतात त्यामुळे सरसकट कॉपीपेस्टींगचा विचार टाळलेला बरा . कॉपीपेस्टींग अथवा कॉपीपेस्टरची कोणतीही जबाबदारी विकिपीडिया घेत नाही हे येथे लक्षात घ्यावे. आपला उद्देश कितीही चांगला असला तरीही खाया पिया कुछ नही गिलास फोडा बारा आना अशी आपली स्थिती होणार नाही याची प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी.
मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावरच्या कॉपीपेस्टींग हतोत्साहीत करणाऱ्या काही चांगल्या संपादन गाळण्या आणि नवागतांना शक्य तिथे मार्गदर्शनाची चांगली परंपराही आहे.
कॉपीपेस्टरने केलेल्या प्रताधिकारभंगाची कोणतीही जबाबदारी इतर कुणीही घेत नाही ती केवळ संबंधीतांची आपापसातली असते. अधिक माहिती करता विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पहावे.
आणखी एक महत्वाचे आंतरजालावर बऱ्याच ठिकाणी मोफत उपलब्ध असे लिहिले जाते (एक प्रकारची धूळफेक) पण तरीही त्यांचे कॉपीराईट शाबूत असतात आणि त्याचे कॉपीपेस्टींग (कॉपीराईट फ्री करण्याचा स्पष्ट परवाना नसल्यास) अवैध असते.
आपला शंका विचारण्याचा नेमका उद्देश समजला नाही. आपणास स्वत:चे कॉपीराईटेड लेखन कॉपीपेस्टेड झालेले आढळल्यास ते आपण स्वत:ही वगळू शकता अथवा इतर जाणत्या सदस्यांना याच पद्धतीने विनंती करू शकता. मराठी विकिपीडीयास कॉपीपेस्टेड लेखनाची आवश्यकता नाही. आंतरजालावर जे लेखन उपलब्ध आहे ते जसेच्या तसे मराठी विकिपीडीयावर आणण्यात मराठी विकिपीडियांच्या वाचंकांना नवे काहीच मिळत नाही. शिवाय असे कॉपीपेस्टेड लेखन जसेच्या तसे येथील अभिप्रेत ज्ञानकोशीय लेखन शैलीत बसतही नाही. त्यामुळे तुरळक झालेले न लक्श्ःआत आलेले कॉपी पेस्टींगही काळाच्या ओघात सहसा कुणी न कुणी ज्ञानकोशीय रुपात आणते आणि सहसा कॉपीराईटच्या समस्येतून मुक्तता होते.
आपणास अजून काही माहिती शंका साहाय्य हवे असल्यास जरूर कळवावे. आम्ही आपणास सर्वतोपरी साहाय्य करू.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन आणि वाचन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२५, ७ मे २०१४ (IST)[reply]

व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षकलेखन संकेतांत प्रस्तावित बदल

९ ऑक्टोबरला चर्चेस घेतलेल्या या विषयावरील दोन आठवड्यांची मुदत होउन गेलेली आहे. तदनुसार येथील चर्चा बंद करण्यात येत आहे. आता हा प्रस्ताव मतदानासाठी घेतला जाईल.

अभय नातू (चर्चा) ०८:५३, २५ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]


प्रस्ताव

व्यक्तींबद्दलच्या लेखांच्या शीर्षकांसाठी मराठी विकिपीडियावरचे सध्याचे संकेत या प्रमाणे आहेत.

===व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत===

व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते(alphabetical categorisation)]. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.

जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.

अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.


येथे झालेल्या मोठ्या चर्चेनंतर मी यात खालील बदल सुचवित आहे. १, २, ४ व ५ अबाधित आहेत. ३ मध्ये बदल आहेत.

१. व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे.

२. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.

३. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास लेखाच्या चर्चा पानावर प्रचलित नाव नमूद करावे व लेख त्या नावाने ठेवण्याबद्दल सदस्यांची मते मागवावी.

३.१ जर चार दिवसांत मत आले नाही तर एक तरी प्रचालकास व इतर जाणत्या सदस्यांस साद घालून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे ({{साद|अभय नातू}} किंवा {{साद|Mahitgar}} ही उदाहरणादाखल).
३.२ साद घातल्यावर २ दिवसांत उत्तर न आल्यास लेखाचे प्रचलित नावाकडे स्थानांतरण करावे. यावेळी पूर्ण नावापासून प्रचलित नावाकडे पुनर्निर्देशन असू द्यावे.
३.३ इतर अप्रचलित परंतु कागदोपत्री असलेल्या नावांपासून लेखाकडे पुनर्निर्देशने ठेवावी.

४. जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.

५. अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.


वरील प्रस्तावावर येथे चर्चा करावी तसेच इतर सदस्यांचे लक्ष याकडे वेधून घ्यावे ही विनंती.

दोन आठवड्यांनी हा प्रस्ताव मतदानासाठी घेण्यात येईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:०६, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

चर्चा

पाठिंबा- माझे येथील अनधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे.. - अभय नातू
संकेतातील या खुलाशाने अनेक लेख सापडणे सोपे होईल तसेच वादही टळतील.


अशा पद्धतीने चर्चा करण्याचे मनमोकळे स्वागत करतो. जिथ पर्यंत मराठी लोक निर्णय घेतात मला न व्यक्तीश: पटणारी निती असेल तरीही हरकत नाही पण शक्य तेवढी तर्कसुसंगत ठेवण्याचा प्रयास करावा. माझी मते खालील प्रमाणे
१) वाद आहे म्हणून नितीची पुन्हा चर्चा करणे वेगळे आणि वाद टाळावयाचे म्हणून ज्ञानकोशाने नितींचा स्विकार करावयास चालू केल्यास वस्तुनिष्ठतेची ऐसी तैसी होण्यास वेळ लागणार नाही हे ही लक्षात घ्यावे.
मुद्दा शोधाचा तर्कावर टिकत नाही, माझे विश्लेषण खालील प्रमाणे :


शोध १) Default Sort मध्ये प्रॉपर सॉर्टींग आहे व्यवस्थीत नि:संदीग्धीकरण पाने आहेत, पुर्ननिर्देशने व्यवस्थीत आहेत वरून मराठी विकिपीडियन मोठ्या उत्साहाने कॅटेगरायझेशन करतात. तो पर्यंत तांत्रीक दृष्ट्या मराठी विकिपीडियातून लेख शोधण्याचा कोणत्याही केस मध्ये कसलाही प्रॉब्लेम नाहीच आहे. फार फारतर नि:संदिग्धीकरण हा शब्द नवीन माणसाला समजत नाही म्हणून अबकडव्यक्तीनाम (सर्व व्यक्ती यादी) असे सुस्पष्ट लेखन आणि ज्या लेखाच्या बाबतीत त्या नावाच्या फारच व्यक्ती असतील आणि नि:संदीग्धीकरण पान वरच्या बाजूस दिसत नसेल तर नि:संदीग्धीकरण पानाचे शीर्षक अबकडव्यक्तीनाम

एवढेच केले तर ते आपोआप पहिल्या क्रमांकाच्या शोधावर जाते.

शोध २) डिफॉल्ट सर्च मुख्य लेख नामविश्वावरच होतो. शोध घेताना लेखनात चूक जरी झाली तरी एकतर Default Sort मुळे ते शोधात यावयास हवे. Default Sort टर्म्स समजा प्रॉपरली भरलेल्या नाहीत तरीही विकिपीडियाचे शोध यंत्रही अलिकडे अद्ययावत झाले आहे. त्याने आपोआप बेस्ट पॉसीबल सदृश्य शोध दाखवणे अभिप्रेत आहे. तसे काही केस मध्ये होत नसेल असे निदर्शनास आणून दिल्यास १) संबंधीत बाब बगझीला मध्ये नोंदवावी.
    • हे लिहिताना मी विकिपॉडीया असा सर्च दिला शोध यंत्राने तुम्हाला विकिपीडिया म्हणायचे आहे का? हे बरोबर विचारले
    • एखाद्या व्यक्तीला अनुस्वार कसा टाईप करावयाचा माहीत नाही विवेकानद टाईप झाले अथवा टायपींग मिसटेक मुळे विचेकानंद वर शोध दिला तरीही तुम्हाला विवेकानंद म्हणायचे आहे का? हे शोध सॉफ्टवेअर बऱ्यापैकी बरोबर विचारते आहे.
शोध ७) माझ्या दृष्टीने शोधाचा मुद्दा मी यथा सांग खोडलेला आहे. तरीही शोधा संबंधीने मी विचारात न घेतलेले तर्क असतील तर ते मांडावेत खोडायचाच आहे म्हणून पहाणार्र नाही. या चर्चेशी खरेच किती रिलीव्हंट आहे तेवढाच अभ्यासेन.


पूर्णनाव विरुद्ध प्रचलित नाव


पूर्णनाव नाव का असावे ह्या मागची भूमिका समजून न घेतलेल्या व्यक्ती प्रचलित नावाकरता दबाव देतच राहतील. किती आणि कुणा कुणा समोर वाकावे ? तुम्ही वाकता हे सिद्ध झाल्यानंतर तत्वांशी तडजोड करणाऱ्यांचा ज्ञानकोश विश्वासार्ह कसा राहू शकेल ? रूढ संकेत पूर्ण नावाचा पण चर्चा पानावर चर्चा घेऊन प्रचलीत नावे वापरता येतील
शोध घेता येत नाही हा तर्क मी खोडून वर काढला आहेच, प्रश्न उरतो माझ्या डोळ्यांना/ मनाला पूर्ण नाव चांगले वाटत नाही. विकिपीडिया वस्तुनिष्ठतेची जागा आहे माझ्या डोळ्यांना/ मनाला पूर्ण नाव चांगले वाटत नाही याचीच जागा लेखातही घेणार की अमूक हा मजकूर माझ्या डोळ्यांना/ मनाला चांगला वाटत नाही म्हणून तो नको आणि हि मंडळी लेखातील मजकुरातही असेच वाकवत राहतील पुन्हा एकदा तोच प्रश्न; तुम्ही वाकता हे सिद्ध झाल्यानंतर तत्वांशी तडजोड करणाऱ्यांचा ज्ञानकोश विश्वासार्ह कसा राहू शकेल ?
अ) यात अप्रत्यक्ष डेमोक्रॅटायझेशन होतेच , वस्तुनिष्ठ पणे विरोध करणारे किती चर्चा पानांवर जाऊन विरोध नोंदवत राहतील म्हणजे एकुण प्रचलीत नाव मागणाऱ्यांची संख्या अधिक असणार केवळ प्रचलीत कोणते याच्या चर्चा होणार आणि अपवाद हाच नियम सिद्ध होईल केवळ जे मायनॉरिटी आहेत आपले म्हणणे रेटू शकत नाहीत तेवढीच शीर्षके पूर्ण नावाची राहतील. मेजॉरिटीच्या दबावाखाली जे तयार होते त्याला पुराण लोकरंजक कथा संग्रह म्हणता येऊ शकते वस्तुनिष्ठतेची संस्कृती असलेला ज्ञानकोश म्हणता येत नाही.
आ) ज्या लोकांच म्हणण स्विकारल जाणार नाही ती मंडळी स्वाभाविक पणे अनफेअर ट्रीटमेंटचा क्लेम अधून मधून टाकत राहणार आणि त्यांचा तो क्लेम बरोबर असेल पण मेजॉरिटी तो स्विकारणार नाही म्हणजे अनफेअर ट्रिटमेंट मूळे असलेला असंतोष खदखदतच राहणार.
इ) पूर्ण नावाच्या भूमीके मागचा मागच्या चर्चांचा कोणताही गोषवारा या चर्चे सोबत दिला गेलेला नाही त्या मुळे एका अर्थाने हा घाई घाईत हाफझार्डली मांडलेला प्रस्ताव ठरतो आहे.
ई) तुम्ही यावर कौल घेण्याचा प्रस्ताव आहे. पण तत्पुर्वी किती जणांनी पूर्ण नाव असण्याच्या गरजे मागची तार्कीक भूमीका समजून घेतलेली असणार आहे ? म्हणजे असा पर्याय देणेही सयूक्तीक नसलेले डेमोक्रॅटायझेशन आहे.
तरीही आठेक दिवसात सवडीनुसार मी जुन्या चर्चा शोधून येथे पूर्ण नावाच्या मागची भूमीका पुन्हा एकदा सविस्तार नोंदवण्याचे काम करेन.


संन्यासोत्तर संन्यासी नाव प्रचलीत झालेल्या व्यक्ती, विवाहपूर्व किंवा विवाहोत्तर पैकी एक नाव प्रचलीत असलेल्या स्त्रीयांच्या पूर्ण नावांचे लेखन कसे करावे, संभाजी शिवाजी भोसले या नावाच्या व्यक्ती संभाजी महाराजांच्या नंतरच्याही काळात दिसून येतात त्यातील कुणाला ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास काय करावे ह्या वेळी कुठे अपवाद द्यावयाचा असल्यास अशा स्वरूपाची चर्चा मननीय होऊ शकेल
परंतु मराठी विकिपीडिया तत्व चिंतनात पुढे जाण्या एवजी मागे जाईल दुसऱ्यांची नक्कल करण्यात समाधान मानेल ज्याच्या भविष्यात जे लिहिल आहे ते काही वेळा टळत नाही इत:पर काय म्हणावे


जाता जाता >>माझे येथील अनधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे<< हे वाक्य जरासे विनोदी आहे :)


'लेखन चालू' पूर्ण नावाच्या गरजेचा गोषवारा सदस्यांच्या माहिती साठी पुन्हा एकदा नमूद करे पर्यंत हे लेखन पूर्ण होऊ शकत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१९, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]



वर माहितगारांचे लेखन चालू असले तरी मी येथे खुलासा करू इच्छितो की वाद टळणे आणि शोध लवकर लागणे हे दोनच मुद्दे नाहीत. हे सहज सुचले म्हणून लिहिले. पुनर्निर्देशनाने शोध लागू शकतो हे सत्य आहे.
एक मोठा मुद्दा असाही आहे की सदस्यांना प्रमाणीकरणाच्या एकसंध साच्यातून वेगळे शीर्षक द्यायचे असल्यास त्यातही सुसूत्रता असावी.
वाद झाला याचे कारण संकेतात त्रुटी होती. संकेतात खुलासा यावा आणि संदिग्धता राहू नये म्हणून हा प्रस्ताव.
माहितगारांचे लिहून होण्याची वाट पहात आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:२०, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
ता.क. माहितगार, प्रस्तावाला धरून फक्त लिहावे. वर अनेक उतारे असंबद्ध आणि भरकटलेले आहेत ( आणि हे दोन उदाहरणे.) तसेच व्यक्तिगत ताशेरे ओढल्यास तुमचे लेखन गाळले जाईल (किंवा तुमच्या लेखनातील सगळ्या गमती आणि गमजा स्पष्ट करण्यात येतील) याची नोंद घ्यावी.
अभय नातू (चर्चा) ०९:२५, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
माझे मत सरळ आहे. विकिपीडियाने शीर्षकांसाठी संकेत ठरवले आहेत, जे हिंदी (विकिपीडिया:लेख_का_नाम_कैसे_रखें), संस्कृत, बंगाली, तामिळ, तेलुगू इत्यादी अनेक भारतीय भाषांसह एकूण ८२ विकिपीडियांवर वापरले जात आहेत. असे असताना केवळ एकाच सदस्याच्या आग्रहासाठी मराठी विकिपीडियाने अकारण वेगळे संकेत का वापरावेत ह्याचे संक्षिप्त व मुद्देसुद उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. मला पुन्हा वाद सुरू करायचा नाही म्हणून मी ह्या चर्चेमधून अंग काढून घेत आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १०:०५, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]


>>:ता.क. माहितगार, प्रस्तावाला धरून फक्त लिहावे. वर अनेक उतारे असंबद्ध आणि भरकटलेले आहेत<< हे सरसकटीकरण आणि एखादी नाकारावयाची गोष्ट नाकारण्यासाठी दिलीले थातुरमातूर कारण आहे. मी प्रत्येक शब्द प्रस्तावावर टिका करण्यासाठी आणि माझ्या दृष्टीने सुसंबद्धच लिहिला आहे. प्रत्येक शब्द अथवा वाक्यातला कोणता भाग आपणास लक्षात आला नाही हे स्पष्ट करावे म्हणजे मलाही माझी भूमिका स्पष्ट करता येईल.
>>ई) किती जणांनी पूर्ण नाव असण्याच्या गरजे मागची तार्कीक भूमीका समजून घेतलेली असणार आहे ? << हे वर अभिजीत साठेंच्या मुद्देसुद उत्तर मला अजूनही मिळालेले नाही." याच्या शी संबंधीत आहे आणि इतरही अनेकांची अभिजीत साठेंसारखी स्थिती असू शकते. पूर्ण नावा मागच्या संकल्पने बद्दल मागच्या चर्चा उधृत करून गोषवारा देण्या पूर्वीच धोरण चर्चेला टाकणे त्याही पुढे जाऊन कौल घेणे म्हणजे ज्या गोष्टीची महत्वपुर्ण बाजू इतरांपूढे मांडलेलीच नाही त्यावर मत मत मागवणे हाफझार्ड आहेच (हि प्रस्तावावरची टिका आहे व्यक्तीगत नव्हे). तसेही अभिजीत साठे स्वत: थांबण्यास तयार असताना पूर्ण नावा मागच्या आणि जुन्या चर्चांचा गोषवारा न देता चर्चा आणि कौलाची घाई कशा साठी ? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका चालू आहेत त्या पुर्वी राजकीय नेत्यांना बघा सुटसुटीत नावाच्या निमीत्ताने हा विवाद जिंकून दाखवतो आणि मग नंतर इतरही माहिती तुमच्या सोईची भरतो असा काही संदेश राजकीय कार्यकर्त्यांना देण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उद्देश या घाई मागे नसावा असे गृहीत धरून चालतो आहे.
तुमच्यावर कोणताही व्यक्तीगत ताशेरा ओढलेला नाही. कोणत्याही चर्चे मध्ये इव्हन प्रस्तावात सहमतीच्या दृष्टीने बदल करावे लागू शकतात. त्यापुर्वी कौलाचे मत स्वत: अनधिकृत असल्याचे सांगत देण्याची घाई माझ्या समर्थकांनो तुम्ही पण असेच घाई घाईने समर्थन करा असा संदेश देत नाही काय ? ताशेरा या घाईवर आहे व्यक्तीगत नव्हे.
जिथ पर्यंत अभिजीत साठेंच्या दुसऱ्या मुद्दाचा परामर्ष आहे. १) मला कुणाचे तरी प्रचलीत नाव सोन्या आहे असे वाटते अथवा गाढव आहे असे वाटते म्हणून किंवा २) संबंधीत व्यक्ती स्वत:चे खरे नाव लपवून समाजात स्वत:चे नाव सोन्या अथवा गाढव आहे असे पसरवते म्हणून किंवा ३) त्या व्यक्तीचे इतर चाहते/विरोधक त्या व्यक्तीला सोन्या अथवा गाढव या पैकी एक नाव प्रचलीत करतात म्हणून किंवा ४) इतर अनेक अथवा सर्व विकिपीडिया आधीच्या तीन पैकी एक अथवा दोन अथा तीन्ही पर्याय आवडले म्हणून एखाद्या व्यक्तीचे प्रचलीत नाव सोन्या अथवा गाढव आहे असे ठेवावे म्हणतात म्हणून मराठी विकिपीडियाने सुद्धा जुन्या चर्चांचा पूर्ण नावा मागच्या भूमीकांचा कोणताही विचार बाजूस ठेऊन, वस्तुनिष्ठतेशी तडजोड करून सोन्या अथवा गाढव अशा प्रकारची लेख शीर्षके लोकानुनयाच्या आणि लोकप्रीयतेच्या आधारावर स्विकारली पाहीजेत !! ज्या लोकांच्या अमूक नावाला लोकप्रियता आणि लोकानुनय लाभला आहे ते शीर्षक ठेवले म्हणजे सर्व कसे आनंदी आनंद असेल समाधान असेल. ज्ञानकोशाच्या दृष्टीने आदर्श भूमीका दिसते आहे. संक्षीप्त आणि उत्तराची घाई असलेल्यांकरता हि माझी तात्कालीक प्रतिक्रीया आहे व्यक्तीगत ताशेरा नव्हे.
ज्यांना अभ्यासपूर्ण तर्क हवा असेल त्यांच्या साठी अभिजीत साठे हिंदी विकिपीडिया आणि अजून कोणता पिडीया म्हणतात त्यांच्या भूमीकांचा अभ्यास करून सविस्तार उत्तर आठवडाभरात देईन आणि उत्तरांची लांबी माझ्या पद्धतीनेच असेल केवळ सोई साठी जरूरी प्रमाणे विस्तृत उत्तर हा साचा वापरेन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५९, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
हे सरसकटीकरण आणि एखादी नाकारावयाची गोष्ट नाकारण्यासाठी दिलीले थातुरमातूर कारण आहे.
चूक. वर लिहिलेल्या अत्यंत मोठ्या उताऱ्यातील माझ्या अंदाजो २५% भाग प्रस्तावावर आणि इतर भाग प्रस्तावेतर गोष्टींबद्दल आहे, उदा. लोकांची मनःस्थिती, त्यांचे भविष्यातील उत्तर, इ.
मोठ्या लांबीचा उतारा लिहिल्याने कोर्टात वेळकाढूपणा करून केस जिंकलेले वकील अनेक पाहिलेले आहेत. हे कोर्ट नव्हे. शेवटी हो किंवा नाही हे तुमचे एक मत विरुद्ध हो किंवा नाही हे प्रत्येक सदस्याचे एक मत यानेच निर्णय ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मते तर्क लढवलेत तरी सगळ्यांना ते पटतीलच किंवा पटायलाच पाहिजे असे होत नाही.
गरजा लिहिलेल्या आहेत. किंबहुना लिहण्याची सक्त गरज आहे असे वाटतही नाही. प्रस्ताव मांडला. सदस्यांनी हो म्हणले तर हो, नाही म्हणले तर नाही.
येथे तुमचे मत मांडा आणि इतरांचे मत वाचा. त्यानंतर निर्णय होईलच.
अभय नातू (चर्चा) ०७:४१, १० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
अभयने सुचवल्याप्रमाणे मी माझे मत देत आहे. संपूर्ण नाव शीर्षकासाठी वापरण्याला माझा पूर्ण विरोध आहे. माझ्या मते शीर्षके रोजच्या वापरातील नावांचीच असावीत. शेवटी मराठी विकिपीडिया is not an isolated project. It is a part of Wikipedia family and should use rules and policies used by majority of other Wikis. थातूरमातूर कारणे सांगून मराठी विकिपीडियाने कशी स्वत:ची पॉलिसी वापरली पाहिजे ही वरील कारणीमीमांसा मला अजिबात मान्य नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ०८:४६, १० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
ज्या नावाने व्यक्ती प्रसिद्ध असेल त्या नावानेच लेख असला पाहिजे . त्या व्यक्तीची प्रसिद्धी त्या नावाशी जोडली गेलेली असते उदा (With due respect to our Prime Minister) नरेंद्र मोदी या ऐवजी नरेंद्र दामोदरदास मोदी असे म्हटले तर कोपऱ्यावरच्या किराणा दुकानाचे नाव वाटेल.
उगाचच काहीतरी प्रथा चालू करू नयेत. एखाद-दुसऱ्या माणसाच्या मनमानीखातर तर नक्कीच नाही. माहितगार साहेबांनी जरा साधकबाधक विचार करावा. उगीच निबंध (तेही अपुर्ण) लिहून सगळ्यांचा वेळ आणि श्रम वाया घालवू नयेत. Sudhanwa (चर्चा) ०१:०४, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

शीर्षक लेखनासंबंधीत प्रस्तावित बदलांचा प्रस्ताव कौल (मतदान) घेण्यासाठी टाकतेवेळी हा प्रस्ताव मराठी विकिपीडीया व त्यावरील संपादनांशी संबंधित असल्याने या प्रस्तावावर मत देण्यासाठी मत देणार्या सदस्याने हा प्रस्ताव कौलाला टाकण्यापूर्वी सहा महिने किमान ५० संपादने मराठी विकिपीडिया किंवा मराठीच्या कोणत्याही सहप्रकल्पांवर केलेली असली पाहिजेत अशी अट प्रस्ताव मतदानाला टाकतेवेळी असावी असे माझे मत आहे. जुन्या जाणत्या सर्व सदस्यांसाठी मागील सहा महिन्यात संपादने नसतील तर कौल टाकेपर्यंत मराठीचे सर्व सहप्रकल्प मिळून मत देेणार्या सदस्याची किमान ५०० संपादने झालेली असली पाहिजेत अशी अट प्रस्ताव मतदानाला टाकतेवेळी असावी असे माझे मत आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:०३, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

संतोष, तुम्ही ह्या सर्व अटींमध्ये पास आहात. मतदानामध्ये तुमचा कौल काय आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १८:३०, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
@Abhijitsathe: या अटी माझ्यासाठी नसून सर्वांसाठी असाव्यात.
माझ्या अंदाजाने प्रस्तावाचा मसूदा ठरविण्यासाठी प्रस्तावावर अजून चर्चा चालू आहे.
एक उदाहरण म्हणून सोडवण्यासाठी ठेवतो. हे फक्त उदाहरण आहे.......
समजा ८०० वर्षांपूर्वी कुणा माहितीकार नावाच्या व्यक्तीने एखादे उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर ४०० वर्षांनी त्याने केलेल्या कार्याचा उदोउदो होऊन माहितीकार वाघ या नावाने त्याला प्रचलित केला. त्यानंतर आणखी ४०० वर्षांनी म्हणजे आजच्या काळात त्याने केलेले कार्य कालबाह्य ठरविण्यात येऊन तो माहितीकार कुत्रा या नावाने प्रचलित झाला. तीनही वेळी त्याची नावे प्रचलित असलेलीच आहेत. मग ज्ञानकोशीय वस्तुनिष्ठतेचा विचार करुन या व्यक्तीविषयीचा विकिपीडिया ज्ञानकोशातील लेख कोणत्या नावाने असावा ? -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:४९, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

माझे मत

शीर्षक नाव हे शक्यतो पूर्ण नाव असावे या ठरावाला माझा अंशतः पाठिंबा आहे.

पाठिंबा- माझे येथील अधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे.. - J
  • अबकडव्यक्तीनाम (सर्व व्यक्ती यादी) : या शब्दप्रयोगाला माझा पाठिंबा नाही. ’सर्व व्यक्ती यादी हा धेडगुजरी समास आहे. त्यापेक्षा "अबकड (या नावाच्या अन्य व्यक्ती)" हे सुटसुटीत होईल.
  • मराठी शोध करताना ’आणि’ हा शब्द टाकला की फक्त मराठी साइट्‌स सापडतात.
  • नुकताच मी विकिपीडियावर मन्नू भंडारी हा लेख लिहिला. या बाईंचे लग्नापूर्वीचे पूर्ण नाव महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी. लग्नानंतरचे नाव महेंद्रकुमारी राजेंद्र यादव. या शेवटी उल्लेखिलेल्या दोन्ही नावांनी या बाईंची ओळख पटण्य़ासारखी नाही. यांतले पहिले नाव फार तर जन्माच्या दाखल्यावर आले असेल. दुसरे तर कधीच व्यवहारात नव्हते. जनमानसात आणि साहित्यिक जगतात बाई "मन्नू भंडारी" या एकमेव नावाने परिचित आहेत. त्यांच्या तथाकथित "खर्‍या नावा"ने त्यांचा शोध घेण्याचा कुणीही, अगदी पोलीसही प्रयत्‍न करणार नाहीत! अशा व्यक्तींच्या बाबतीत कोणतेही पुनर्निर्देशन करू नये असे मला वाटते......J (चर्चा) १०:४६, १० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
अहो J, तुम्ही संपूर्ण नावाला पाठिंबा देत आहात की रोजच्या वापरातील नावाला? नीट कळाले नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ११:२७, १० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

कौल

वरील चर्चेनंतर आता सदस्यांनी आपले मत नोंदवावे अशी मी विनंती करतो. खालील दोनपैकी एक पॉलिसी मराठी विकिपीडियाने स्वीकारावी असे वरील चर्चेमधून निष्पन्न झाले आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १७:३८, २८ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

शीर्षकासाठी प्रचलित नाव

व्यक्तींवरील लेखाचे शीर्षक संक्षिप्त व रोजच्या वापरातील नावाचेच असावे. उदा. नरेंद्र मोदी, शरद पवार इत्यादी.

पाठिंबा - अभिजीत साठे
पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा - J
पाठिंबा - सुधन्वा जोगळेकर
पाठिंबा - अभिषेक सुर्यवंशी


शीर्षकासाठी संपूर्ण नाव

व्यक्तींवरील लेखाचे शीर्षक संपूर्ण नावाचेच असावे. उदा. नरेंद्र दामोदरदास मोदी, शरद गोविंद पवार इत्यादी.