"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २३: ओळ २३:
==अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध==
==अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध==


आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यत, उर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त साधारण संकल्पना म्हणुन मान्यता पावल्या आहेत. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरल्या जात नाहित. त्याऐवजी संवेग, उर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टिंना मुलभुत मानून काम केले जाते.
आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यत, उर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणुन मान्यता पावल्या आहेत. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरल्या जात नाहित. त्याऐवजी संवेग, उर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टिंना मुलभुत मानून काम केले जाते.

१६:५७, ११ जुलै २०१४ ची आवृत्ती




भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

  1. पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.
  2. दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
  3. तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अणि या नियमांच्या सहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले. यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वी पुरते मर्यादीत नसुन सार्वत्रीक आहेत हे स्पष्ट झाले. तत्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत. तसेच ज्या वस्तुवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सुक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

विवेचन

पहिला नियम

दुसरा नियम

तिसरा नियम

इतिहास

अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध

आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यत, उर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणुन मान्यता पावल्या आहेत. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरल्या जात नाहित. त्याऐवजी संवेग, उर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टिंना मुलभुत मानून काम केले जाते.