"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ ६३: ओळ ६३:
* [[नाट्यकलेची उत्पत्ती]]
* [[नाट्यकलेची उत्पत्ती]]
* [[गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र]]
* [[गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र]]

==स्पर्धा==
राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-
* गडकरी करंडक स्पर्धा : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ही स्पर्धा भरवते. या करंडकासाठीची १५वी स्पर्धा चिंचवड येथे २० ते २२ जानेवारी २०१४ या दिवसांत होणार आहे.
* नाट्यलेखन स्पर्धा : या स्पर्धा देवयानी प्रकाशन, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा), अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा) वगैरे संस्था घेतात.


== हेही पाहा ==
== हेही पाहा ==

१२:२७, २७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

राम गणेश गडकरी
जन्म नाव राम गणेश गडकरी
टोपणनाव गोविंदाग्रज, बाळकराम
जन्म मे २६, इ.स. १८८५
नवसारी, वर्तमान गुजरात
मृत्यू जानेवारी २३, इ.स. १९१९
सावनेर
कार्यक्षेत्र नाटककार, कवी, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटके, विनोदी कथा
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन
वडील गणेश गडकरी
पत्नी रमाबाई

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

जीवन

गडकऱ्यांचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकऱ्याचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित, लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

नाटके

गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. गडकऱ्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

काव्य

वाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्‍यांनी घेतले होते.

विनोदी लेखन

गडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

अन्य साहित्य

नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत.

स्पर्धा

राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-

  • गडकरी करंडक स्पर्धा : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ही स्पर्धा भरवते. या करंडकासाठीची १५वी स्पर्धा चिंचवड येथे २० ते २२ जानेवारी २०१४ या दिवसांत होणार आहे.
  • नाट्यलेखन स्पर्धा : या स्पर्धा देवयानी प्रकाशन, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा), अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा) वगैरे संस्था घेतात.

हेही पाहा

बाह्य दुवे