"ना.घ. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13118252
छो वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ३०: ओळ ३०:
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]]

२०:३०, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

नागोराव घनश्याम देशपांडे (ऑगस्ट २१, इ.स. १९०९ - इ.स. २०००) हे मराठी कवी होते.

जीवन

ना.घ. देशपांड्यांचा जन्म २१ ऑगस्ट इ.स. १९०९ रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते. इ.स. १९३० साली त्यांनी मॉरिस कॉलेजातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांन कायद्याचा अभ्यासक्रम पुरा करून एल.एल.बी. पदवी कमवली. बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली शीळ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून भावगीत हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली शीळ याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली अभिसार हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याशिवाय कंचनीचा महाल (चार दीर्घकवितांचा संग्रह) व गुंफण (शीळ काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. इ.स. १९८०च्या दशकात कोल्हापूर सकाळ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे फुले आणि काटे हे संकलन प्रकाशित झाले.

अन्य कार्य

साहित्य क्षेत्राखेरीज इतरही क्षेत्रात त्यांनी कार्य केले. मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. इ.स. १९३५ साली स्थापलेल्या या संस्थेचे ते इ.स. १९६९-२००० या दीर्घ काळात अध्यक्ष होते. इ.स. १९३५पासून इ.स. १९९२पर्यंत त्यांनी मेहेकरच्या सत्र न्यायालयात वकिली केली. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही दांडगा होता.

ते काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे[ संदर्भ हवा ]. त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.

प्रकाशित साहित्य

काव्य संग्रह

  • शीळ (इ.स. १९५४)
  • गुंफण (इ.स. १९९६)
  • खूणगाठी (इ.स. १९८५)
  • कंचनीचा महाल (इ.स. १९९६)
  • अभिसार (इ.स. १९६३)

पुरस्कार

नाघंना ख़ूणगाठी या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी, इत्यादी पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. इ.स. १९८४ साली त्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विदर्भ साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले.

बाह्य दुवे

  • http://beta.esakal.com/2009/05/27233522/pune-NG-Deshpande.html. Missing or empty |title= (सहाय्य)