"अग्रलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: he (strong connection between (2) mr:अग्रलेख and he:מאמר מערכת),it (strong connection between (2) mr:अग्रलेख and it:Articolo di fondo)
ओळ ३०: ओळ ३०:
[[en:Editorial]]
[[en:Editorial]]
[[es:Editorial periodístico]]
[[es:Editorial periodístico]]
[[he:פובליציסטיקה]]
[[ia:Editorial]]
[[ia:Editorial]]
[[it:Editoriale]]
[[ja:社説]]
[[ja:社説]]
[[pt:Editorial]]
[[pt:Editorial]]

१९:३१, ५ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

कोणत्याही वर्तमान पत्रातील अग्रलेख हा त्या पत्राच्या संपादकाचा, वृत्तपत्राचा वा त्या संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करीत असतो.

साचा

अग्रलेख हे सामान्यतः निबंधसदृश लेखन असते.
अग्रलेखात मांडले गेलेले मत प्रत्येक वेळी नि:पक्ष असतेच असे नाही.
वर्तमानपत्र जर एखाद्या राजकीय पक्षाचे मुखपत्र असल्यास त्यांतील अग्रलेखसुद्धा त्या त्या पक्षाच्या भूमिकेचा प्रचार करतांना आढळून येतांत.[१] वाचकांचे एखाद्या अग्रलेखाबद्दल असलेले मत "संपादकांस पत्रे" सारख्या मथळ्याखाली बहुतेक वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात.

मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख

संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख लेखकांच्या वैचारिक प्रतिभेने होणारे साहित्यिक योगदान असते. आचार्य प्र.के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, माधव गडकरी, गंगाधर गाडगीळ, अरुण टिकेकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे, गोविंद तळवलकर, (चंवि. बावडेकर, चंद्रकांत भालेराव, अरुण साधू, इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले. नवाकाळ चे संपादक निळकंठराव खाडिलकर हे स्वयंघोषीत "अग्रलेखांचा बादशाह" म्हणून ओळखले जातात.

लोकमान्य टिळकांच्या प्रखर अग्रलेखां मुळे "केसरी" २ वर्षाच्या (१८८१) आंतच अखिल भारतात सर्वात जास्त खप असलेले वर्तमानपत्र झाले होते. त्यांचा "सरकार चे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख तब्बल १३० वर्षांनंतर आजही उल्लेखला जातो.

आंतरजालीय अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख

बहुतेक सर्व प्रमुख वर्तमान पत्रांच्या संकेत स्थळीय आवृत्त्या गेल्या दशका पासून उपलब्ध आहेत. ह्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे वाचक तत्क्षणी आपले त्या अग्रलेखाबद्दलचा अभिप्राय ("Comment") नोंदवू शकतात.

मिसळपाव डॉट कॉम या मराठी संकेतस्थळावर 'अग्रलेख/संपादकीय' सदर साप्ताहिक स्वरूपात उपलब्ध आहे. वृत्तपत्रीय संकेतस्थ़ळांव्यतिरिक्त मराठी आंतरजालावर 'अग्रलेख/संपादकीय' हा प्रकार मिसळपावनेच सर्वप्रथम राबवलासाचा:Fact. या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणाऱ्या एखाद्या सदस्याला दर आठवड्याला 'पाहुणा संपादक' म्हणून पाचारण केले जाते व तोच त्या आठवड्याचे 'संपादकीय' लिहितो.

बाह्य दुवे

मिसळपाववरील आंतरजालीय संपादकीय सदर/अर्काइव्ह

संदर्भ