"माधुरी दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎Filmography: clean up, replaced: Shahrukh → शाहरूख (6), Ashok → अशोक, Kumar → कुमार (10), Jackie Shroff → जॅकी श्रॉफ (7), Alok → आलोक, Nath → नाथ using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५९: ओळ २५९:
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी अभिनेत्री]]

१५:५९, २८ जुलै २०१३ ची आवृत्ती

माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित-नेने
जन्म माधुरी श्रीराम नेने
माधुरी शंकर दीक्षित(पूर्वाश्रमीचे)

मे १५, इ.स. १९६७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी (चित्रपट)
मराठी (मातृभाषा)
प्रमुख चित्रपट दिल, बेटा, हम आपके है कौन?, दिल तो पागल है, देवदास
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (इ.स. १९९०, इ.स. १९९२, इ.स. १९९४, इ.स. १९९७, इ.स. २००२)
पती डॉ. श्रीराम माधव नेने

माधुरी दीक्षित (मे १५, इ.स. १९६७ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने इ.स. १९८० च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले स्थान पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच चित्रपटांत तिने काम केले. त्यात तिच्या अभिनयाची व नृत्यकौशल्याची खूप वाहवा झाली. इ.स. २००८ मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आरंभीचे आयुष्य

माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.

चित्रपट कारकीर्द

माधुरीने इ.स. १९८४ साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब इ.स. १९८८ साली मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "राम लखन" (इ.स. १९८९), "परिंदा" (इ.स. १९८९), "त्रिदेव" (इ.स. १९८९), "किशन कन्हय्या" (इ.स. १९९०) आणि "प्रहार" (इ.स. १९९१), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी बऱ्याच चित्रपटांत अनिल कपूर तिचा सहकलाकार होता.

इ.स. १९९० मध्ये तिने इंद्रकुमार याच्या दिल चित्रपटात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीटखिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "साजन" (इ.स. १९९१), "बेटा" (इ.स. १९९२),"खलनायक" (इ.स. १९९३), "हम आप के है कौन" (इ.स. १९९४), " राजा" (इ.स. १९९५) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या "अंजाम" या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.

इ.स. १९९६ या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या इ.स. १९९७ च्या "दिल तो पागल है" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "मृत्युदंड" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.

माधुरी दीक्षित

माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. एक दो तीन (तेजाब), हम को आज कल है (सैलाब), बडा दुख दिन्हा (राम लखन), धक धक (बेटा), चने के खेतमे (अंजाम), दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन ), चोली के पीछे (खलनायक ), अखिया मिलाऊ (राजा), मेरा पिया घर आया (याराना), के सेरा सेरा (पुकार), मार डाला (देवदास) या गाण्यांमधील तिने केलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.

व्यक्तिगत आयुष्य

१७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ रोजी माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टो. २०११मध्ये मुंबई मध्ये परत आली.[१]

पुरस्कार

मिळालेले फिल्म फेअर पुरस्कार

मिळालेली नामांकने

मिळालेले स्टार स्क्रीन पुरस्कार

मिळालेली नामांकने

मिळालेले झी सिने पुरस्कार

मिळालेली नामांकने

आयफा पुरस्कार

नामांकने

स्टारडस्ट पुरस्कार

नामांकन

सन्मान आणि पुरस्कार

  • १९९७: आंध्र प्रदेश सरकारने कलाभिनेत्री" पुरस्कार दिला.[२]
  • २००१: राष्ट्रीय नागरीक पुरस्कार
  • २००१: फोर्ब्स ने माधुरी दीक्षितला हिंदी चित्रपटसृष्टीतील शिखरावरील ५ ताकदवर लोकांत स्थान दिले[३]
  • २००८: पद्मश्री पुरस्कार,[४]
  • २००८: भारतीय चित्रपट उत्सव, लॉस एंजल्स येथे सत्कार[५]
  • २०११: पर्ल्स वेव पुरस्कार - "वेव सिल्वर क्वीन सन्मान"
  • २०११: HindiFilmNews.Com ने घेतलेल्या मतदानात माधुरी दीक्षित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आकर्षक नटी ठरली[६]
Dixit on the sets of Jhalak Dikhhla Jaa 5 along with her co-judges Remo D'souza (left) and Karan Johar (right)

Filmography

वर्ष चित्रपट भूमिका दिग्दर्शक सह कलाकार इतर माहिती
१९८४ अबोध गौरी Hiren Nag Tapas Pal, Sheela David, विनोद Sharma
१९८५ आवारा बाप बरखा Sohanlal Kanwar राजेश खन्ना, मीनाक्षी शेषाद्री
१९८६ स्वाती आनंदी Kranthi कुमार शशी कपूर , शर्मिला टागोर , Akbar खान , मीनाक्षी शेषाद्री , विनोद Mehra , सारिका
१९८७ मोहरे माया Appa Dandekar नाना पाटेकर , Sadashiv Amrapurkar , अनुपम खेर, आलोक नाथ
१९८७ हिफझत जानकी Prayag Raj अशोक कुमार , नूतन , अनिल कपूर
१९८७ उत्तर दक्षिण चंदा Prabhat खन्ना रजनीकांत, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर
१९८८ खात्रोन के खिलाडी कविता
१९८८ दयावान नीला वेल्हू फिरोज खान विनोद खन्ना, फिरोज खान, अमरीश पुरी, Aditya पांचोली
१९८८ तेझाब मोहिनी N. Chandra अनिल कपूर , अनुपम खेर , चंकी पांडे , मंदाकिनी Nominated, Filmfare Best Actress Award
१९८९ वर्दी जया
१९८९ राम लखन राधा Subhash Ghai Rakhee Gulzar , जॅकी श्रॉफ , अनिल कपूर , Dimple Kapadia , Gulshan Grover , अमरीश पुरी , अनुपम खेर
१९८९ प्रेम प्रतीग्या लक्ष्मी Bapu Mithun Chakraborty , विनोद Mehra , Ranjeet Nominated, Filmfare Best Actress Award
१९८९ इलाका विद्या Aziz Sejawal Dharmendra, Sanjay Dutt
१९८९ मुजरिम सोनिया Umesh Mehra Mithun Chakraborty, नूतन
१९८९ त्रिदेव दिव्या माथुर Rajiv Rai नसीरुद्दीन शाह , सनी देओल , जॅकी श्रॉफ
१९८९ कानून अपना अपना भारती
१९८९ परिंदा पारो Vidhu विनोद Chopra अनिल कपूर , जॅकी श्रॉफ , अनुपम खेर , नाना पाटेकर India's official entry to the Oscars
१९८९ पाप का अंत
१९९० महा-संग्राम झुमरी Mukul Anand विनोद खन्ना , Govinda
१९९० किशन कन्हैया अंजू Rakesh Roshan अनिल कपूर, Shilpa Shirodkar , अमरीश पुरी
१९९० इज्जतदार मोहिनी K. Bapaiah Dilip कुमार , Govinda , Raghuvaran , Shafi Inamdar, अनुपम खेर
१९९० दिल मधु मेहरा Indra कुमार आमिर खान , Saeed Jaffrey , अनुपम खेर Winner, Filmfare Best Actress Award
१९९० दिवाना मुझसा नाही अनिता Y.Nageshwar Rao आमिर खान , Khushboo
१९९० जीवन एक संघर्ष मधु सेन
१९९० सैलाब डॉ. सुषमा मल्होत्रा Deepak Balraj Vij Aditya पांचोली, Shafi Inamdar
१९९० जमाई राजा रेखा A. Kodandarami Reddy Hema Malini, अनिल कपूर , अनुपम खेर , Satish Kaushik
१९९० थानेदार चांद Raj N. Sippy Sanjay Dutt, Jeetendra, Jayapradha
१९९१ प्यार का देवता देवी
१९९१ खिलाफ श्वेता
१९९१ १०० डेज देवी Parto Ghosh जॅकी श्रॉफ, Moon Moon Sen, Javed Jaffrey
१९९१ प्रतिकार मधु
१९९१ साजन पूजा Lawrence D'Souza Sanjay Dutt , Salman खान Nominated, Filmfare Best Actress Award
१९९१ प्रहार शिर्लेय नाना पाटेकर नाना पाटेकर, Dimple Kapadia, Gautam Joglekar
१९९२ बेटा सरस्वती Indra कुमार अनिल कपूर, Aruna Irani, Laxmikant Berde, अनुपम खेर Winner, Filmfare Best Actress Award
१९९२ झीन्दागी एक जुवा जुही Prakash Mehra अनिल कपूर, अनुपम खेर, Shakti कपूर
१९९२ प्रेम दिवाने शिवांगी मेहरा
१९९२ खेल सीमा /डॉ. जडी बुटी Rakesh Roshan अनिल कपूर, Sonu Walia, अनुपम खेर, Mala Sinha
१९९२ संगीत निर्मला देवी & संगीता
१९९३ धरावी ड्रिम गर्ल Sudhir Mishra Shabana Azmi, Om Puri
१९९३ साहिबान साहिबान
१९९३ खलनायक गंगा (गंगोत्री देवी ) Subhash Ghai Sanjay Dutt, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, Raakhee Gulzar Nominated, Filmfare Best Actress Award
१९९३ फुल गुड्डी
१९९३ दिल तेरा आशिक़ सोनिया खन्ना /सावित्री देवी Lawrence D'Souza Salman खान, अनुपम खेर
१९९३ आंसू बने अंगारे
१९९४ अंजाम शिवानी चोप्रा Rahul Rawail शाहरूख खान, Johnny Lever, Himani Shivpuri, Deepak Tijori Nominated, Filmfare Best Actress Award
१९९४ हम आपके है कौन ...! निशा चौधरी Sooraj R. Barjatya Salman खान, Mohnish Behl, Renuka शाहane, Laxmikant Berde, अनुपम खेर Winner, Filmfare Best Actress Award
१९९५ राजा मधु गरेवाल Indra कुमार Sanjay कपूर, Mukesh खन्ना Nominated, Filmfare Best Actress Award
१९९५ याराना ललिता /शिखा David Dhawan Rishi कपूर, Raj Babbar, Kader खान Nominated, Filmfare Best Actress Award
१९९६ प्रेम ग्रंथ कजरी Rajiv कपूर Rishi कपूर, अनुपम खेर
१९९६ पापी देवता
१९९६ राज कुमार राजकुमारी विशाका Pankaj Parashar अनिल कपूर, Danny Denzongpa
१९९७ कोयला गौरी Rakesh Roshan शाहरूख खान, अमरीश पुरी
१९९७ महानता जेनया पिंटो
१९९७ मृत्युदंड केतकी Prakash Jha Shabana Azmi, Ayub खान, Mohan Agashe, Om Puri
१९९७ मोहब्बत श्वेता शर्मा Reema Rakesh नाथ Akshay खन्ना, Sanjay कपूर
१९९७ दिल तो पागल है पूजा Yash Chopra शाहरूख खान, Karisma कपूर, Akshay कुमार Winner, Filmfare Best Actress Award
१९९८ बडे मियां छोटे मियां माधुरी दीक्षित David Dhawan Amitabh Bachchan, Govinda Special appearance
१९९८ वजूद अपूर्वा चौधरी N. Chandra नाना पाटेकर, Mukul Dev
१९९९ आरजू पूजा Lawrence D'Souza Akshay कुमार, Saif Ali खान
२००० पुकार अंजली Rajकुमार Santoshi अनिल कपूर, Namrata Shirodkar, Danny Denzongpa, Om Puri Nominated, Filmfare Best Actress Award
२००० गज गामिनी गज गामिनी /संगीता /
शकुंतला /मोनिका /
मोना लिसा
M.F. Husain शाहरूख खान, नसीरुद्दीन शाह
२००१ येह रास्ते है प्यार के नेहा Deepak Shivdasani Ajay Devgn, Preity Zinta, Vikram Gokhale
२००१ लज्जा जानकी Rajकुमार Santoshi Manisha Koirala, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, Mahima Chaudhry, Rekha, Ajay Devgn Nominated, Filmfare Best Supporting Actress Award
२००२ हम तुम्हारे है सनम राधा K. S. Adiyaman शाहरूख खान, Salman खान
२००२ देवदास चंद्रमुखी Sanjay Leela Bhansali शाहरूख खान, Aishwarya Rai Winner, Filmfare Best Supporting Actress Award
India's official entry to the Oscars
२००७ आजा नाचले दिया अनिल Mehta Konkona Sen Sharma, Akshaye खन्ना, Kunal कपूर, Divya Dutta, Ranvir Shorey, Vinay Pathak Nominated, Filmfare Best Actress Award

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx. १० ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.expressindia.com/news/ie/daily/19971124/32850403.html. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.forbes.com/2001/03/09/0309bollywood.html. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://india.gov.in/myindia/padmashri_awards_list1.php?start=357. २ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.indianfilmfestival.org/movies08/tribute2008-madhuridixit.html. ४ जानेवारी २००९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)[मृत दुवा]
  6. ^ (इंग्रजी भाषेत) http://hindifilmnews.com/polls-2/poll-6-the-most-desirable-bollywood-actress/. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे