"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 8 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2717999
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]
[[चित्र:Kambarmodi (Tridax procumbens).jpg|thumb|150px|right|{{लेखनाव}}]]


'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!)ही एक सूर्यफूल(Compositae) कुळातली लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी, याच्या पाल्याला दगडी पाला आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल म्हणतात. या वनस्पतीच्या पानात [[आयोडिन]] असावे.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही; जखमेस [[खपली]] धरते.
'''{{लेखनाव}}''' (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!) ही एक सूर्यफूल (Compositae) कुळातली लहान [[वनस्पती]] आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी, याच्या पाल्याला दगडी पाला आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल म्हणतात. या वनस्पतीच्या पानात [[आयोडिन]] असावे.{{संदर्भ हवा}} [[पाय|पायास]] ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे [[जखम]] झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे [[निर्जंतुकीकरण]] होते व ती पिकत नाही; जखमेस [[खपली]] धरते. तोंड आले असताही या वनस्पतीच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो.


ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. {{लेखनाव}} ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.
ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. {{लेखनाव}} ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.

१२:२४, २७ जून २०१३ ची आवृत्ती

कंबरमोडी

कंबरमोडी (इं:Tridax procumbens) (चर्चापान वाचावे!) ही एक सूर्यफूल (Compositae) कुळातली लहान वनस्पती आहे. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. मराठीत या झुडपाला एकदांडी, याच्या पाल्याला दगडी पाला आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल म्हणतात. या वनस्पतीच्या पानात आयोडिन असावे.[ संदर्भ हवा ] पायास ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता, या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकतात. त्याने जखमेचे निर्जंतुकीकरण होते व ती पिकत नाही; जखमेस खपली धरते. तोंड आले असताही या वनस्पतीच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो.

ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.

वनस्पतीच्या पानांपासून देठ वेगळा होऊन तो उंच वाढतो. पोपटी-हिरव्या रंगाच्या या देठाला बिनवासाचे एक फूल लागते. (चित्र पहा) काही दिवस फूल राहिल्यावर ते वाळते आणि तेथे गडद काळ्या-तपकिरी रंगाच्या बिया उरतात. या बिया हवेच्या झोतासह सर्वत्र पसरतात.

ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे. समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.

हेही पहा

http://raanaphule.blogspot.com/


चित्र दालन