"वॉल्ट डिस्ने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Walt Disney
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ ३७: ओळ ३७:
[[वर्ग:वॉल्ट डिस्नी कंपनी|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:वॉल्ट डिस्नी कंपनी|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|डिस्नी, वॉल्ट]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|डिस्नी, वॉल्ट]]

[[af:Walt Disney]]
[[als:Walt Disney]]
[[an:Walt Disney]]
[[ar:والت ديزني]]
[[arz:والت ديزنى]]
[[as:ৱাল্ট ডিজনী]]
[[ast:Walt Disney]]
[[az:Uolt Disney]]
[[ba:Уолт Дисней]]
[[bar:Walt Disney]]
[[bat-smg:Volts Dėsniejos]]
[[be:Уолт Дысней]]
[[be-x-old:Ўолт Дыснэй]]
[[bg:Уолт Дисни]]
[[bn:ওয়াল্ট ডিজনি]]
[[br:Walt Disney]]
[[bs:Walt Disney]]
[[ca:Walt Disney]]
[[ckb:واڵت دیزنی]]
[[cs:Walt Disney]]
[[cy:Walt Disney]]
[[da:Walt Disney]]
[[de:Walt Disney]]
[[el:Ουώλτ Ντίσνεϋ]]
[[en:Walt Disney]]
[[eo:Walt Disney]]
[[es:Walt Disney]]
[[et:Walt Disney]]
[[eu:Walt Disney]]
[[ext:Walt Disney]]
[[fa:والت دیزنی]]
[[fi:Walt Disney]]
[[fr:Walt Disney]]
[[fy:Walt Disney]]
[[ga:Walt Disney]]
[[gl:Walt Disney]]
[[he:וולט דיסני]]
[[hi:वॉल्ट डिज़्नी]]
[[hif:Walt Disney]]
[[hr:Walt Disney]]
[[hu:Walt Disney]]
[[hy:Ուոլթ Դիսնեյ]]
[[ia:Walt Disney]]
[[id:Walt Disney]]
[[ilo:Walt Disney]]
[[io:Walt Disney]]
[[is:Walt Disney]]
[[it:Walt Disney]]
[[ja:ウォルト・ディズニー]]
[[jv:Walt Disney]]
[[ka:უოლტ დისნეი]]
[[kbd:Уолт Дисней]]
[[kk:Уолт Дисней]]
[[kn:ವಾಲ್ಟ್ ಡಿಸ್ನಿ]]
[[ko:월트 디즈니]]
[[la:Gualterius Elias Disney]]
[[lb:Walt Disney]]
[[li:Walt Disney]]
[[lt:Walt Disney]]
[[lv:Volts Disnejs]]
[[min:Walt Disney]]
[[mk:Волт Дизни]]
[[ml:വാൾട്ട് ഡിസ്നി]]
[[mn:Уолт Дисней]]
[[ms:Walt Disney]]
[[nah:Walt Disney]]
[[nds:Walt Disney]]
[[new:वाल्ट डिज्नी]]
[[nl:Walt Disney]]
[[nn:Walt Disney]]
[[no:Walt Disney]]
[[oc:Walt Disney]]
[[os:Дисней, Уолт]]
[[pl:Walt Disney]]
[[pms:Walt Disney]]
[[pnb:والٹ ڈزنی]]
[[pt:Walt Disney]]
[[qu:Walt Disney]]
[[ro:Walt Disney]]
[[ru:Дисней, Уолт]]
[[rue:Уолт Дісней]]
[[sa:वाल्ट डिज्नी]]
[[sah:Уолт Дисней]]
[[scn:Walt Disney]]
[[se:Walt Disney]]
[[sh:Walt Disney]]
[[simple:Walt Disney]]
[[sk:Walt Disney]]
[[sl:Walt Disney]]
[[sq:Walt Disney]]
[[sr:Волт Дизни]]
[[su:Walt Disney]]
[[sv:Walt Disney]]
[[sw:Walt Disney]]
[[szl:Walt Disney]]
[[ta:வால்ட் டிஸ்னி]]
[[te:వాల్ట్ డిస్నీ]]
[[tg:Уолтер Элайас Дисней]]
[[th:วอลต์ ดิสนีย์]]
[[tl:Walt Disney]]
[[tr:Walt Disney]]
[[tt:Уолт Дисней]]
[[uk:Волт Дісней]]
[[ur:والٹ ڈزنی]]
[[vi:Walt Disney]]
[[vo:Walt Disney]]
[[war:Walt Disney]]
[[xmf:უოლთ დისნეი]]
[[yi:וואלט דיזני]]
[[zh:華特·迪士尼]]
[[zh-min-nan:Walt Disney]]
[[zh-yue:和路迪士尼]]

१२:०१, १० मार्च २०१३ ची आवृत्ती

वॉल्टर एलिआस डिस्नी

वॉल्टर एलिआस डिस्नी (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनी नायक (voice actor)[मराठी शब्द सुचवा], ऍनिमेटर आणि उद्योजक (entrepreneur)[मराठी शब्द सुचवा] होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ रॉय डिस्नी याच्यासोबत मिळून वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्नी म्हणून ओळखल्या जाते.

वॉल्टचे वडील एलिआस डिस्नी हे आयरिश-कॅनडियन वंशाचे तर आई फ्लोरा या जर्मन-अमेरिकन होत्या. कामाच्या शोधात अमेरिकेत विविध ठिकाणी फिरून मिळेल ते काम करत डिस्नी कुटुंब शिकागो येथे स्थाईक झाले. वॉल्ट यांना लहानपणापासून चित्र काढण्याचे वेड होते तसेच रेल्वे गाडीचे आकर्षणही होते. वॉल्ट यांनी मॅककिन्ले हायस्कुल मध्ये दिवसाच्या शाळेत प्रवेश घेतला तर रात्रीच्या वेळी ते शिकागो आर्ट इंस्टिट्युट मध्ये चित्र काढ्याणचे प्रशिक्षण घेत. त्यांच्या शाळेच्या वार्तापत्राचे ते व्यंगचित्रकार होते. त्या काळातील वॉल्ट यांची बरीच चित्रे पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेली देश प्रेमावर आधारीत होती.

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे शिक्षण बंद पडल्याने वॉल्ट यांनी सैन्यात जाण्याचे ठरविले पण त्यांचे वय त्या कामाच्या आड आल्याने त्यांनी तो विचार बदलून आपल्या काही मित्रांसह रेड क्रॉस मध्ये प्रवेश केला. या कामासाठी त्यांची नियुक्ती फ्रान्स येथे रुग्णवाहिकेचे चालक म्हणून झाली. १९१९ साली वॉल्टने ही नोकरी सोडून कॅन्सास शहरात नोकरीचा शोध चालविला. नट होणे किंवा वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून नोकरीस त्यांची पसंती होती. पण या दोनपैकी कोणतेही काम त्यांना मिळाले नाही. येवढेच नव्हे तर रुग्णवाहिकेच्या चालकाची नोकरी त्यांना मिळू शकली नाही. वॉल्ट यांचे भाऊ रॉय यांनी प्रयत्न करून पेस्मेन-रुबीन आर्ट स्टुडिओ मध्ये जाहिरात विभागात वॉल्ट यांना नोकरी मिळवून दिली. येथेच वॉल्ट आणि आयवर्क्स (Iwerks) यांची मैत्री जमली. पेस्मेन-रुबीन आर्ट स्टुडिओ लवकरच बंद पडल्याने जानेवारी १९२० मध्ये त्यांनी आयवर्क्स-डिस्नी कमर्शियल आर्टीस्ट्स नावाची स्वतःची संस्था सुरू केली. व्यापार करणे न जमल्याने ही संस्था सोडून वॉल्टने पुन्हा नोकरीचा मार्ग धरला आणि आयवर्क्सला एकट्याला व्यापार जमेना म्हणून तेही वॉल्ट यांच्या मागोमाग कॅन्सास सिटी फिल्म अॅड कंपनी मध्ये दाखल झाले. या संस्थेत दोघांनी अॅनिमेशन विषयातले सर्व बारकावे जाणून घेतले.

या प्रशिक्षणाच्या जोरावर आयवर्क्स-डिस्नी या जोडीने आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. कॅन्सास सिटी फिल्म अॅड कंपनी मधल्या फ्रेड हर्मन सह अनेकांना आपल्याकडे नोकरीत घेतले. वॉल्ट डिस्नी आणि आयवर्क्स यांची पहिली मालिका लाफ-ओ-ग्राम्स सुरू झाली. ही मालिका प्रदर्शीत झाल्याबरोबर खूप गाजली. पण डिस्नी आणि आयवर्क्स यांचा धंद्याचा अनुभव कमी पडल्याने याहीवेळी स्टुडिओ बंद करावा लागला.

या अनिश्चित व्यापाराला कंटाळून डिस्नी आणि आयवर्क्स हॉलिवूड येथे गेले. रॉय डिस्नीने यावेळी पैसा जमवून दिला. त्यामुळे डिस्नी ब्रदर्स नावाची संस्था जन्माला आली. या ठिकाणीच अनेक गाजलेल्या व्यंगचित्र मालिका (Cartoon Series) तयार झाल्या. त्यातील विशेष गाजली ती ओस्वाल्ड - द रॅबिट नावाची मालिका. या चित्रमालिकेतील प्रमुख चित्रे आयवर्क्सने काढलेली होती. मालिका गाजली तरीही काळाची मागणी चलचित्र (अॅनिमेशन) ची असल्याने धंदा पुन्हा एकदा बंद करावा लागला. यावेळी डिस्नी आणि आयवर्क्स यांनी सुप्रसिद्ध युनिव्हर्सल पिक्चर्सशी एक करार केला. त्याप्रमाणे ओस्वाल्डची दुसरी मालिका सुरू करण्यात आली. तीही मालिका गाजली. पण मोठ्या कंपनीने केलेला करार त्यांच्या बाजुचा होता. चित्रमालिका गाजली पण चित्रांचे मालकी हक्क डिस्नी आणि आयवर्क्स यांच्याकडे नव्हते. वॉल्ट डिस्नी यांनी चिडून आपल्याच स्टुडिओत नवी चित्रमालिका तयार करण्याचे ठरविले.

१९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टीमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले. मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मुक चित्रपट Plane Crazy तयार झाला. या काळापर्यंत मुकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला.

१९२८ साली मिकी माऊसचा पहिला अॅनिमेटेड बोलपट स्टीमबोट विली (Steamboat Willie) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने नवीन विक्रम प्रस्थापित करत इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले. यानंतर डिस्नी आणि आयवर्क्स यांनी एकामागे एक सरस चित्रपटांची मालिका काढली त्यातील सर्वच चित्रपट अतिशय गाजले. आता कंपनीचा चांगलाच जम बसला, त्यांना पैसा आणि जागतिक प्रसिद्धी मिळू लागली. डिस्नी हे पूर्णपणे व्यावसायिक होते तसेच ते द्रष्टेही होते. त्यांनी फार पूर्वी केलेली एका विशाल करमणूक केंद्राची कल्पना त्यांच्या मनात होतीच. हा नवा विचार कृतीत आणण्यचे त्यांनी ठरविले. तसेच दूरचित्रवाणीचे आगमन होत असल्याने लोकप्रिय चित्रमालिका त्यावर सादर करण्याचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागले.

हळुहळू डिस्नीलँड रंगरुपास येऊ लागले. या भव्य दिव्य प्रकल्पासारखा दुसरा प्रकल्प जगात अन्यत्र कुठेही असु नये असे वॉल्ट डिस्नी यांना वाटत होते. यासाठी बँक ऑफ अमेरिकेने कर्ज मंजूर केले.

१९६६ सालाच्या शेवटी वॉल्ट डिस्नी यांचे एक ऑपरेशन ठरले होते. त्यासाठी त्यांच्या चाचण्या घेतांना लक्षात आले की वॉल्ट डिस्नी यांच्या पोटात एक ट्यूमर झाला आहे. वॉल्ट यांचे पोटाचे ऑपरेशन आधी करावे असे ठरविण्यात आले. प्रत्यक्ष ऑपरेशनच्या आधी असे लक्षात आले की ट्युमरची व्याप्ति खूप मोठी आहे. ऑपरेशन ऐवजी केमोथेरपीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी वॉल्ट डिस्नी यांचे आयुष्य सहा महिने ते वर्ष येवढेच असल्याचे त्यांना सांगितले. डिसेंबर १५,१९६६ रोजी वॉल्ट डिस्नी यांचा मृत्यू झाला.

पुरस्कार, मान सन्मान

  • १९३९ साली स्नो व्हाइट अ‍ॅन्ड द सेव्हन डवार्फस ला खास ऑस्कर देण्यात आले. त्यात नेहमीची ऑस्करची प्रतिमा आणि ऑस्करच्याच सात बुटक्या प्रतिमा होत्या. ख्यातनाम बालनटी शर्ली टेम्पल हिच्या हस्ते हे ऑस्कर प्रदान करण्यात आले.

बाह्य दुवे

विकिक्वोट
विकिक्वोट
वॉल्ट डिस्ने हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.