"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ms:Shirdi
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Shirdi
ओळ ५३: ओळ ५३:
[[it:Shirdi]]
[[it:Shirdi]]
[[kn:ಶಿರ್ಡಿ]]
[[kn:ಶಿರ್ಡಿ]]
[[mg:Shirdi]]
[[ms:Shirdi]]
[[ms:Shirdi]]
[[pl:Shirdi]]
[[pl:Shirdi]]

२२:४४, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

  ?शिर्डी

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° ४६′ १२″ N, ७४° २८′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५०४ मी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
लोकसंख्या २६,१६९ (२००१)
अलकाताई शेजवळ नगराध्यक्षा
चंद्रकांत खोसे मुख्याधिकारी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 423109
• +त्रुटि: "९१ २४२३" अयोग्य अंक आहे
• एमएच-१६

शिर्डी Shirdi.ogg उच्चार हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.

इतिहास

शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोबर, इ.स. १९१९ रोजी साईबाबानी समाधी घेतली.

साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.

दळणवळण

शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.

शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० कि.मी. आहे. तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबादाहून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://shrisaibabasansthan.org. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)