"भीष्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bn:ভীষ্ম
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lt:Bhišma
ओळ २२: ओळ २२:
[[jv:Bisma]]
[[jv:Bisma]]
[[kn:ಭೀಷ್ಮ]]
[[kn:ಭೀಷ್ಮ]]
[[lt:Bhišma]]
[[ml:ഭീഷ്മർ]]
[[ml:ഭീഷ്മർ]]
[[ne:भीष्म]]
[[ne:भीष्म]]

०२:४३, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

देवव्रत यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली.
राजा रविवर्मा यांचे चित्र.

देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनूगंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला.

भीष्मप्रतिज्ञा

देवव्रत हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूनंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात येतील, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने ज्येष्ठ पुत्र असूनही हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचे भीष्म असे नामाभिधान झाले.

अंबा-शाल्व प्रकरण व शिखंडीचा जन्म

पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्या विवाहासाठी भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर याने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या करून शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतल्याची कथा महाभारतात वर्णिली आहे.