"जैवतंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Biotechnoleg
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: as:জৈৱ প্ৰযুক্তি
ओळ १८: ओळ १८:
[[an:Biotecnolochía]]
[[an:Biotecnolochía]]
[[ar:تقانة حيوية]]
[[ar:تقانة حيوية]]
[[as:জৈৱ প্ৰযুক্তি]]
[[ast:Bioteunoloxía]]
[[ast:Bioteunoloxía]]
[[ba:Биотехнология]]
[[ba:Биотехнология]]

२२:०७, ३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

व्याख्या

तंत्रज्ञान म्हणजे नैसर्गिक कच्च्या मालाचे उपयुक्त उत्पादनांमध्ये परिवर्तन करण्याकरिता वापरले जाणारे विज्ञान. जैवशास्त्रीय तत्त्वे, प्रक्रिया, प्रणाली व जीव यांचा उद्योग-धंद्यांमध्ये वापर करणारे विज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान.

इतिहास

ही संज्ञा विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात 'लीड्स शहर परिषदेने' दिली. पण जैवतंत्रज्ञानाचा वापर मानवी इतिहासाएवढाच जुना आहे. सॉमारसांचे (दारूचे) उत्पादन, हा त्याचा उत्तम नमुना म्हणता येईल. सध्या जैवतंत्रज्ञान सन्करित स्वरुपात वापरले जाते. हे जैवशास्त्रीय प्रक्रिया व अभियांत्रिकी कौशल्यांचे फलित आहे. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर उद्योगांत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियंते, उत्पादन व्यवस्थापक व कामगारांची गरज भासते.

जैवतंत्रज्ञानाचा विस्तार

याचा वापर वैद्यकीय शास्त्रे, शेतकी व उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
1.प्राथमिकरीत्या याचा वापर आंबवण्याच्या प्रक्रियेत केला जातो. यात दारू, प्रतिजैविके, जीवनसत्त्वे व सेंद्रिय आम्ले तयार केली जातात. यात बुरशीपासून ते अनेक विविध सूक्ष्मजीवांचा वापर होतो.
2. शेतकीमध्ये कडधान्यांमध्ये नत्रवायू स्थिरीकरणाचे जनुक (NiF gene) टाकण्याकरिता याचा वापर होतो. यामुळे रासायनिक खतान्चा वापर मोठ्या प्रमाणावर कमी करून जलप्रदूषण काही प्रमाणात कमी करता येईल.
3. वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम होर्मोन निर्मितीसाठी होतो. उदा. मानवी इन्शुलिन, मानवी व्रुद्धिजनक होर्मोन. तसेच काही मानवी प्रथिनेही तयार करता येतात. उदा. इंटर्फेरोन, हे प्रथिन विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण करते.
4. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून अल्कोहोल, जैववायू, हायड्रोजन वायू अशा अपारंपरिक उर्जास्रोतान्ची निर्मिती करता येते.
5. सांडपाणी-विनियोगाकरिता वापरली जाणारी यंत्रसामुग्री हे जैवतंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.