"प्लूटो (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pnb:پلوٹو (نکا سیارہ)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: am:ፕሉቶ
ओळ ४६१: ओळ ४६१:
[[af:Pluto (dwergplaneet)]]
[[af:Pluto (dwergplaneet)]]
[[als:(134340) Pluto]]
[[als:(134340) Pluto]]
[[am:ፕሉቶ]]
[[an:Plutón (astronomía)]]
[[an:Plutón (astronomía)]]
[[ang:Pluto]]
[[ang:Pluto]]

११:४५, १८ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

प्लूटो (बटु ग्रह)  
शोधक: क्लाईड टॉमबॉघ
शोधाचा दिनांक: फेब्रुवारी १८, १९३०
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
अपसूर्य बिंदू७,३७,५९,२७,९३१ कि.मी.
४९.३०५०३२८७ खगोलीय एकक
उपसूर्य बिंदू: ४,४३,६८,२४,६१३ कि.मी.
२९.६५८३४०६७ खगोलीय एकक
अर्धदीर्घ अक्ष: ५,९०,६३,७६,२७२ कि.मी.
३९.४८१६८६७७ खगोलीय एकक
वक्रता निर्देशांक: ०.२४८८०७६६
परिभ्रमण काळ: ९०,६१३.३०५ दिवस
२४८.०९ वर्ष
सिनॉडिक परिभ्रमण काळ: ३६६.७३ दिवस
सरासरी कक्षीय वेग: ४.६६६ कि.मी./से.
कक्षेचा कल: १७.१४१७५°
११.८८° सूर्याच्या विषुववृत्ताशी
कोणाचा उपग्रह: सूर्य
उपग्रह:
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या: १,१९५ कि.मी.
पृथ्वीच्या ०.१९ पट
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: १.७९५ × १० कि.मी.²
पृथ्वीच्या ०.०३३ पट
घनफळ: ७.१५ × १० कि.मी.³
पॄथ्वीच्या ०.००६६ पट
वस्तुमान: (१.३०५ ± ०.००७) × १०२३ किलोग्रॅम
पृथ्वीच्या ०.००२१ पट
सरासरी घनता: २.०३ ± ०.०६ ग्रॅ./सें.मी.³
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): ०.५८ मी./से.²
०.०५९ g
मुक्तिवेग: १.२ कि.मी./से.
विषुववृत्तावरील परिवलनवेग: ४७.१८ कि.मी./तास
परावर्तनीयता: ०.११९
पृष्ठभागाचे तापमान:
   केल्व्हिन
किमानसरासरीकमाल
३३ के४४ के५५ के
वातावरण
पृष्ठभागावरील दाब: ०.३० पास्कल
संरचना: नायट्रोजन
मिथेन


प्लूटो हा सूर्यमालेतील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा बटु ग्रह आहे (एरिस नंतर) तसेच सूर्याला प्रदक्षिणा मारणार्‍या खगोलीय वस्तूंमधील दहाव्या क्रमांकाची खगोलीय वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो.[१] प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे.

कायपरच्या पट्ट्यातील इतर सदस्यांप्रमाणे प्लूटो हा मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला आहे तसेच तुलनेने छोटा आहे (वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतियांश). याची भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार असून त्यामुळे काही वेळा हा ग्रह सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जवळ येतो.

प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह चेरॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते.[२] प्लूटोला अजून दोन छोटे उपग्रह आहेत - निक्सहायड्रा - ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[३]

प्लूटोचा शोध १९३० साली लागला व तेव्हापासून २००६ पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. पण २०व्या शतकाच्या शेवटीशेवटी तसेच २१व्या शतकाच्या सुरुवातीला प्लूटोसारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागला. यातील नोंद घेण्याप्रत वस्तू म्हणजे विखुरलेल्या चकतीमधील एरिस, ज्याचे वस्तुमान प्लूटोपेक्षा २७% जास्त आहे.[४] ऑगस्ट २४, २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने सर्वप्रथम ग्रहाची व्याख्या केली. या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिससेरेससोबत बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.[५] या वर्गीकरणानंतर प्लूटोला लघुग्रहांच्या यादीत टाकण्यात आले व त्याला १३४३४० हा क्रमांक देण्यात आला.[६][७] मात्र अनेक शास्त्रज्ञांच्या मते प्लूटोला परत ग्रहांच्या वर्गात टाकण्यात यावे.[८]


शोध

१८४०च्या दशकामध्ये उर्बैन ली व्हेरियेने न्यूटोनियन गतिशास्त्राच्या (Newtonian mechanics) सहाय्याने युरेनसच्या कक्षेतील उतारचढावांचा अभ्यास करून नेपच्यूनच्या जागेचे भाकित केले होते.[९] नेपच्यूनच्या नंतरच्या निरिक्षणानंतर शास्त्रज्ञांनी असा तर्क केला की युरेनसची कक्षा नेपच्यूनशिवाय अजून एका ग्रहामुळे बदलत आहे. १९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेलने फ्लॅगस्टाफ, अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व संभाव्य नववा ग्रह हुडकण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला. या ग्रहाला त्याने प्लॅनेट एक्स असे नाव दिले होते.[१०] १९०९ पर्यंत लॉवेल व विल्यम हेन्री पिकरींग यांनी या ग्रहासाठी अनेक संभाव्य जागा सूचित केल्या.[११] लॉवेलच्या १९१६मधील मृत्यूपर्यंत हा शोध चालू होता पण हाती काही यश आले नव्हते. पण लॉवेलला माहित नव्हते की त्याच्या नकळत मार्च १९ १९१५ला वेधशाळेने प्लूटोचे दोन अंधुक छायाचित्र घेतले होते.[११][१२]

यानंतर १० वर्ष हा शोध थांबला होता. याला कारण होते पर्सिव्हाल लॉवेलची बायको, कॉन्स्टंस लॉवेलने, लॉवेलचा वेधशाळेतील हिस्सा हस्तगत करण्यासाठी दाखल केलेला खटला.[१३] १९२९ मध्ये वेधशाळेचे संचालक व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी प्लॅनेट एक्सला हुडकण्याची जबाबदारी २३ वर्षाच्या कॅन्सास येथून आलेल्या क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली.[१३] टॉमबॉघचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे. ब्लिंक सेपरेटर नावाचे यंत्र वापरून तो दोन चित्रांमध्ये जलदगत्या मागे-पुढे जाऊ शकत असे. यामुळे जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर त्याच्या हालचालीचा आभास (illusion) निर्माण होत असे. जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८, १९३० रोजी टॉमबॉघला जानेवारी २३जानेवारी २९ च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली. जानेवारी २१ला काढलेल्या कमी दर्जाच्या अजून एका छायाचित्राने ही हालचाल सिद्ध केली.[१४] हे पडताळण्यासाठी वेधशाळेने अजून काही छायाचित्र काढली व त्यानंतर शोधाची बातमी हार्वर्ड कॉलेज वेधशाळेला मार्च १३, १९३० तारखेला पाठविली.[११]

नामकरण

या नवीन वस्तूला नाव देण्याचे अधिकार लॉवेल वेधशाळेकडे होते. टॉमबॉघने स्लिफरला इतर कोणी करण्याच्या आधी लवकरात लवकर हे नामकरण करावे अशी विनंती केली.[१०] सर्व जगातून नावासाठी प्रस्ताव आले. कॉन्स्टंस लॉवेलने आधी झ्यूस, नंतर लॉवेल, आणि शेवटी स्वतःचे नाव मांडले. हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.[१५]

प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले.[१६] व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्रामध्ये रूची होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या (Underworld) देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकार्‍यांना तारेने पाठवून दिले.[१७]

या नवीन वस्तूला मार्च २४, इ.स. १९३० रोजी औपचारिकरित्या नाव देण्यात आले.[१८] लॉवेल वेधशाळेचा प्रत्येक सदस्यांचे तीन प्रस्तावित नावांवर मत घेण्यात आले. ही तीन नावे होती - "मिनर्वा" (जे आधीच एका लघुग्रहाला देण्यात आले होते), "क्रोनस" (हे नाव त्याकाळातील काहीशा अलोकप्रिय असलेल्या थॉमस जेफरसन जॅक्सन सी या खगोलशास्त्रज्ञाने सुचविले असल्यामुळे त्याबद्दल लोकमत थोडे वाईट होते) व प्लूटो. प्लूटोला सर्व मते मिळाली.[१९] नावाची घोषणा मे १, १९३० रोजी करण्यात आली.[१६] या घोषणेनंतर मॅडन यांनी व्हेनेशियाला पाच पाऊंड बक्षिस म्हनून दिले.[१६]

प्लूटो (Pluto) हे नाव पार्सिवाल लॉवेल यांच्या नावाच्या अद्याक्षराने सुरू होते. तसेच त्याची अद्याक्षराची आकृती (monogram) P-L हे प्लूटोच्या खगोलशास्त्रीय चिन्हात आहे. (♇).[२०] प्लूटोचे फलज्योतिष चिन्ह() हे नेपच्यूनच्या चिन्हा ()सारखेच आहे, फक्त त्यात मध्यभागी वर्तूळ आहे तर नेपच्यूनच्या चिन्हात मध्यभागी त्रिशूळ आहे.

होउई नोजिरी यांच्या १९३०मधील सूचनेनुसार चायनीज, जापनीजकोरियन भाषांमध्ये या नावाचे भाषांतर पाताळभूमीचा राजा तारा (冥王星),[२१][२२] असे केले जाते.[२३] अनेक अयुरोपियन भाषा प्लूटो हेच नाव त्यांच्या लिपितून लिहितात (transliteration).परंतु काही भारतीय भाषा पाताळदेव यम हे नाव वापरतात. व्हिएतनामीज भाषेमध्येपण यमाचे नाव (Diêm Vương) प्लूटोचे नाव म्हणून वापरतात.[२१]

भौतिक गुणधर्म

हबल दूर्बिणिने जमवलेल्या माहितीवरून बनविलेली प्लूटोची चित्रे.
प्लूटोच्या पृष्ठभागाचा हबलने बनविलेला नकाशा. यात प्लूटोच्या अल्बेडोमधील चढ-उतार दिसत आहेत.

प्लूटोचे पृथ्वीपासून असलेले दीर्घ अंतर त्याचा तपशीलवार अभ्यास करणे कठीण बनविते.प्लूटोची अनेक गुपिते २०१५ पर्यंत अज्ञातच राहतील, जेव्हा न्यू होरायझन्स प्लूटोजवळ पोहोचेल.[२४]

स्वरूप व संरचना

प्लूटोच्या वर्णपटीय पृथक्करणातून असे आढळून आले आहे की प्लूटो हा ९८% नायट्रोजन बर्फ व थोड्या प्रमाणात मिथेन व कार्बन मोनॉक्साईड यांच्यापासून बनला आहे.[२५][२६] दीर्घ अंतर व सद्ध्याच्या दूर्बीण तंत्रज्ञानाच्या मर्यादा यामुळे प्लूटोच्या पृष्ठभागाच्या तपशीलांचे छायाचित्र घेणे अशक्य आहे. तसेच हबल दूर्बिणितून मिळालेली चित्रे पूर्ण तपशील दाखवत नाहीत.[२७]

आकारमान व वस्तुमान

पृथ्वी-चंद्र व प्लूटो-चेरॉन यांच्या आकारमानाची तुलना. प्लूटोचे घनफळ पृथ्वीच्या ०.६६% आहे

सुरुवातीला प्लूटोला लॉवेलचा "प्लॅनेट एक्स" समजून शास्त्रज्ञांनी त्याच्या नेपच्यून व युरेनसवरील प्रभावावरून त्याचे वस्तुमान काढले. १९५५ मध्ये प्लूटोचे वस्तुमान जवळपास पृथ्वीच्या वस्तुमानाइतके आहे असा हिशेब करण्यात आला होता. अधिक काळजीपूर्वक गणनेनंतर ते मंगळाच्या वस्तुमानाइतके आहे असे मांडण्यात आले.[२८] पण १९७६ मध्ये हवाई विद्यापीठाचे डेल कृशॅंक, कार्ल पिल्चर व डेव्हिड मॉरिसन यांनी प्लूटोच्या अल्बेडोचे (albedo)[मराठी शब्द सुचवा] (वस्तूचे सूर्याचा प्रकाश परावर्तित करण्याचे प्रमाण) पहिल्यांदाच मोजमाप केले. व हे त्यांना मिथेनच्या बर्फाइतके आढळले. यावरून असे स्पष्ट झाले की प्लूटो त्याच्या आकाराच्या मानाने खूप प्रकाशमान आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १% पेक्षा जास्त असणे शक्य नाही.[२८][२९]

चेरॉनचा शोध लागल्यावर केपलरचा तिसर्‍या नियमाचे न्यूटननी केलेल्या सूत्रीकरणाचा उपयोग करून प्लूटो-चेरॉन जोडीचे वस्तुमान काढण्यात आले. जेव्हा चेरॉनच्या गुरुत्वाकर्षणाचा प्लूटोवरील परिणाम मोजण्यात आला तेव्हा प्लूटोचे वस्तुमान १.३१×१०२२ किलोग्रामवर आले, जे पृथ्वीच्या ०.२४% आहे.[३०] चेरॉन-प्लूटोच्या ग्रहणसंक्रमणांदरम्यान केलेल्या निरिक्षणांवरून प्लूटोचा व्यास २३९० कि.मी. असावा असा निकष मांडण्यात आला आहे.[३१] अडाप्टिव प्रकाशशास्त्राच्या(adaptive optics)[मराठी शब्द सुचवा] शोधानंतर खगोलशास्त्रज्ञांना प्लूटोचा आकार अचूकपणे मोजणे शक्य झाले आहे.[३२]

प्लूटो हा सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा तर लहान व हलका आहेच पण यासेबत तो ७ नैसर्गिक उपग्रहांपेक्षाही छोटा आहे. हे सात उपग्रह म्हणजे गनिमिड, टायटन, कॅलिस्टो, आयो, पृथ्वीचा चंद्र, युरोपा, आणि ट्रायटन. प्लूटोचे वस्तुमान चंद्राच्या ०.२ पट आहे. लघुग्रहांच्या पट्ट्यातील सर्वांत मोठ्या सेरेसपेक्षा प्लूटोचा व्यास दुप्पट तर वस्तुमान १२ पट आहे. पण प्लूटो एरिसपेक्षा लहान आहे, ज्याचा शोध २००५ मध्ये लागला.

वातावरण

प्लूटोचे वातावरण नायट्रोजन, मिथेनकार्बन मोनॉक्साईड यांच्या पातळ आवरणाने बनले आहे. हे आवरण त्याच्या पृष्ठभागावरील बर्फापासून बनले आहे.[३३] जसा प्लूटो सूर्यापासून दूर जातो, तसे त्याचे वातावरण गोठत जाते व त्याच्या पृष्ठभागवर पडते. आणि जसा प्लूटो सूर्याजवळ येत जातो तसे प्लूटोच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व बर्फाचे वायूंमध्ये रुपांतरण होते. हे रुपांतरण प्रति-हरितगृह परिणामासारखे (anti-greenhouse effect)[मराठी शब्द सुचवा] काम करते व प्लूटोचा पृष्ठभाग थंड करते. ज्याप्रमाणे घामामुळे शरिराचे तापमान कमी होते. सब्लिमिटर ऍरे (Submillimeter Array) वापरून अलिकडेच शास्त्रज्ञांनी प्लूटोचे तापमान ४३ केल्व्हिन आहे असा शोध लावला आहे, जे अपेक्षेपेक्षा १० केल्व्हिन ने कमी आहे.[३४]

चित्र:New horizons Pluto.jpg
न्यू होरायझन्स प्लूटोवरून जात असल्याचे कल्पनाचित्र. यामध्ये प्लूटोचे विरळ वातावरण दिसते.

जेव्हा एखादा वातावरण नसलेला ग्रह एखाद्या दूरवरच्या तार्‍याला झाकतो (याला ऑकल्टेशन (occultation)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात), तेव्हा तो तारा एकाएकी दृष्टिआड होतो. याविरूद्ध जेव्हा वातावरण असलेला ग्रह एखाद्या तार्‍याला झाकतो तेव्हा तो तारा हळुह्ळू अंधुक होत जात नजरेआड जातो. त्याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून त्या ग्रहाच्या वातावरणाबाबत माहिती मिळू शकते. १९८५ च्या प्लूटोच्या एका ऑकल्टेशन (occultation) च्या अभ्यासातून प्लूटोला वातावरण आहे हे सिद्ध झाले होते. हा शोध १९८८ मधील अजून एका ऑकल्टेशनवरून अधिक दृढ झाला.[३५] तार्‍याच्या अंधुक होण्याच्या वेगावरून प्लूटोचा वातवरणीय दाब ०.१५ पास्कल इतका निश्चित करण्यात आला होता, जो पृथ्वीच्या जवळपास १/७,००,००० पट आहे.[३६]

२००२ मध्ये अजून एक ऑकल्टेशन पॅरिस वेधशाळेच्या ब्रुनो सिकार्डी यांच्या नेतृत्वाखालील गटाने,[३७] तसेच एम.आय.टी.च्या जेम्स एल. इलियट[३८]विल्यम कॉलेजच्या जे पासाचॉफ [३९] यांनी बघितले व अभ्यासले. यावरून वातावरणीय दाब ०.३ पास्कल असावा असा अंदाज करण्यात आला. हे थोडे अनपेक्षित होते कारण प्लूटो सूर्यापासून १९८८ पेक्षा आता जास्त दूर होता व यामुळे वातावरणातील वायू थंड होऊन ते अधिक विरळ होणे अपेक्षित होते. याचे एक स्पष्टिकरण असे देण्यात येते की, १९८७ मध्ये प्लूटोचा दक्षिण ध्रूव १२० वर्षांनंतर सावलीतून बाहेर आला होता. यामुळे बराच नायट्रोजन वातावरणात उत्सर्जित झाला असावा, जो थंड होण्यास बरीच दशके लागतील.[४०] अजून एक ऑकल्टेशन एम.आय.टी.-विल्यम कॉलेजचा संयुक्त गट (ज्यामध्ये जेम्स एलिएट व जे पासाचॉफ होते) व साउथवेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या लेसली यंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने जून १२, २००६ मध्ये ऑस्ट्रेलियामधून बघितले.[४१]

कक्षा

प्लूटोची कक्षा (लाल), नेपच्यूनची कक्षा (निळी), प्रमाण प्रतल (इलिप्टिक) क्षितिजसमांतर दाखविले आहे.

प्लूटोची कक्षा इतर ग्रहांपेक्षा बरीच वेगळी आहे. इतर ग्रहांच्या क़क्षा जवळपास वर्तुळाकार असून त्या एकाच इलिप्टिक प्रतलामध्ये आहेत. मात्र प्लूटोची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती या प्रमाण प्रतलापासून बरीच कललेली आहे (१७° पेक्षा जास्त) . ही उत्केंद्रता (eccentricity) प्लूटोला काही काळ सूर्यापासून नेपच्यूनपेक्षाही जास्त जवळ आणते.प्लूटो फेब्रुवारी ७, १९७९ पासून फेब्रुवारी ११, १९९९ पर्यंत सूर्यापासून नेपच्यूनपेक्षा जास्त जवळ होता. याआधी अशी स्थिती केवळ चौदा दिवसांसाठी जुलै ११, १७३५ ते सप्टेंबर १५, १७४९ पर्यंत होती. त्याही आधी अशी स्थिती एप्रिल ३०, १४८३ पासून जुलै २३, १५०३ (जवळपास २० वर्षे) टिकली होती.

कायपरचा पट्टा

मुख्य पान: कायपरचा पट्टा
कायपरच्या पट्ट्यातील ज्ञात खगोलीय वस्तू, सोबत ४ बाह्य राक्षसी वायू ग्रह दाखविले आहेत.

प्लूटोचा जन्म व मूळ यांनी खगोलशास्त्रज्ञांना नेहमीच बुचकळ्यात टाकले आहे. १९५० च्या दशकात असा सुचविण्यात आले होते की प्लूटो हा आधी नेपच्यूनचा उपग्रह होता पण त्याला नेपच्यूनच्या आत्ताचा सर्वांत मोठा उपग्रह ट्रायटनने त्याच्या कक्षेतून उडवून लावले. ही . हे मत आता पूर्णपणे अमान्य आहे कारण, प्लूटो कधीच नेपच्यूनच्या जवळ येत नाही.[४२]

१९९२ च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकित करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू म्हणून वर्गीकृत करतात.[१] कायपरच्या पट्ट्यातील इतर वस्तूंप्रमाणे प्लूटो व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवार्‍यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[४३] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेवटी तयार होईल.[४४]

जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी ट्रायटनचे, जो प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे, अनेक गुणधर्म (वातावरण तसेच भूरचना याबाबतीतील) प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याभोवतीच्या कक्षेत अडकला.[४५] एरिस हासुद्धा प्लूटोपेक्षा मोठा आहे, पण तो विखुरलेली चकती या वर्गात गणला जातो. (खाली पहा)

नैसर्गिक उपग्रह

प्लूटो व त्याचे तीन ज्ञात उपग्रह. चेरॉन, निक्स व हायड्रा

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : चेरॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्सहायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[४६]

प्लूटो व त्याचे उपग्रह, 'पी १' हा निक्स आहे तर 'पी २' हा हायड्रा

प्लूटो-चेरॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वांत मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्त्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[४७] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष चेरॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[४८] या जोडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्लूटो व चेरॉन हे एकमेकांना नेहमी स्वतःची एकच बाजू दाखवतात. याचा अर्थ असा की प्लूटोवर चेरॉनकडील बाजूवर उभ्या असलेल्या व्यक्तीला चेरॉनची एकच बाजू दिसेल आणि जर ती व्यक्ती दुसर्‍या बाजूला गेली तर तिला चेरॉन कधीच दिसणार नाही. हेच चेरॉनवरच्या व्यक्तीलाही लागू होते.[४९]

हबल दुर्बिणीवर काम करणार्‍या शास्त्रज्ञांना मे १५, इ.स. २००५ रोजी प्लूटोच्या आणखी दोन उपग्रहांचा शोध लागला. त्यांना अनुक्रमे "एस/२००५ पी १" व "एस/२००५ पी २" ही तात्पुरती नावे देण्यात आली. आय.ए.यू. ने जून २१, २००६ रोजी त्यांना निक्स (तुलनेने जवळचा, पी १) आणि हायड्रा (तुलनेने दूरचा, पी २) ही नावे दिली.[५०] हे दोन छोटे उपग्रह चेरॉनच्या जवळपास दोन आणि तीन पट अंतरावरून वर्तुळाकार कक्षेत चेरॉनच्याच कक्षीय प्रतलावरून (Orbital plane) प्लूटोभोवती फिरतात.[५१]

अवकाशयानांनी केलेले निरिक्षण

न्यू होरायझन्स (नवी क्षितिजे), यानाचे प्रक्षेपण जानेवारी १९, २००६

प्लूटोचा लहान आकार व पृथ्वीपासूनचे दीर्घ अंतर यामुळे प्लूटो हे अंतरिक्षयानांसाठी एक आव्हान ठरले आहे. व्हॉयेजर १ प्लूटोपर्यंत पोहोचू शकले असते पण शेवटी शनीचा उपग्रह टायटन याच्याजवळून त्याला नेण्याचे ठरविण्यात आले व यामुळे ते यान प्लूटोजवळून जाऊ शकले नाही. व्हॉयेजर २ च्या मार्गाला तर प्लूटोजवळून जाणे शक्यच नव्हते.[५२] प्लूटोजवळून जाण्याचा एकही गंभीर प्रयत्न २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत केला गेला नव्हता. ऑगस्ट १९९२ मध्ये जे.पी.एल.मधले शास्त्रज्ञ रॉबर्ट स्टाएहल यांनी क्लाईड टॉमबॉघला दूरध्वनी करून प्लूटोला भेटण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. या घटनेचे स्मरण करतांना टॉमबॉघ म्हणाले होते, मी त्यांना सांगितले, तुम्ही खुशाल जाऊ शकता, पण एका लांब व थंड प्रवासासाठी तयार रहा.[५३] या शुभारंभानंतरपण नासाने २००० मध्ये खर्च व प्रक्षेपकातील विलंबाचे कारण देऊन प्लूटो कायपर एक्सप्रेस हे यान रद्द केले.[५४]

तीव्र राजनैतिक भांडणानंतर अम्रेरिकेच्या सरकारने न्यू होरायझन्स या प्लूटोला जाणाऱ्या नवीन अंतरिक्ष मोहिमेला निधी देण्याचे मंजूर केले.[५५] न्यू होरायझन्स जानेवारी १९, २००६ रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. दिवंगत क्लाईड टॉमबॉघ (जे १९९७ मध्ये मरण पावले) यांच्या काही अस्थी या यानावर ठेवल्या गेल्या आहेत, याची पुष्टी मोहिमेचे प्रमुख असलेले एस. अॅलन स्टर्न यांनी केली आहे.[५६]

चित्र:112806 pluto animation.gif
न्यू होरायझन्स ने घेतलेले प्लूटोचे पहिले छायाचित्र

२००७ च्या सुरुवातीला या यानाने आपल्या मार्गक्रमणासाठी गुरूच्या गुरुवत्वाकर्षणाचा उपयोग करून घेतला. जुलै १४, २०१५ रोजी हे यान प्लूटोच्या सर्वाधिक जवळ असेल. प्लूटोची शास्त्रोक्त निरिक्षणे याच्या पाच महिने आधीपासून चालू होतील व पुढे कमीत कमी एक महिना चालू राहतील. न्यू होरायझन्स ने सप्टेंबर २००६ मध्ये प्लूटोची लाँग रेंज रिकनायसन्स इमेजर (Long Range Reconnaissance Imager (LORRI)) वापरून पहिली छायाचित्रे घेतली.[५७] ही चित्रे जवळपास ४२० कोटी किलोमीटर अंतरावरून काढली गेली आहेत व यामुळे यानाची दूरवरच्या वस्तूंचा वेध घेण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. याचा उपयोग यानाला प्लूटो व कायपरच्या पट्ट्यातील इतर खगोलीय वस्तूंजवळ जाण्यासाठी होईल. रिमोट सेंन्सिंग[मराठी शब्द सुचवा] तंत्रज्ञानाचा उपयोग करून न्यू होरायझन्स प्लूटो व त्याचा उपग्रह चेरॉन यांची भूरचना (geology) व स्वरूप अभ्यासण्याचा, त्यांच्या पृष्ठभागाची संरचना मानचित्रित करण्याचा तसेच प्लूटोचे उदासीन (neutral)[मराठी शब्द सुचवा] वातावरण व मुक्तिवेग अभ्यासण्याचा प्रयत्न करेल. न्यू होरायझन्स प्लूटो व चेरॉनच्या पृष्ठभागाची छायाचित्रेपण घेईल.

निक्सहायड्रा यांच्या शोधामुळे यानासमोर अशी अनेक आव्हाने उभी ठाकण्याची शक्यता आहे ज्यांचा आधी विचार करण्यात आला नव्हता. कायपर पट्ट्यातील वस्तूंमध्ये होणाऱ्या टकरी तसेच त्यांचा कमी असलेला मुक्तिवेग यामुळे निर्माण झालेला अंतराळातील कचरा एकप्रकारचे धुळीचे कडे बनवू शकतो. जर यानाला अशा कड्यातून जावे लागले तर त्याला हानी होण्याची शक्यता वाढते व यामुळे ते यान निकामीपण होऊ शकते.[५८]

त्याच्या ग्रह असण्यावरुन असलेला विवाद

प्लूटोचा ग्रह म्हणून असलेला दर्जा १९९२ पासून विवादात आला जेव्हा कायपर पट्ट्यातील पहिली खगोलीय वस्तू (१५७६०) १९९२ QB शोधली गेली. तेव्हापासून अनेक शोधांनी हा वाद वाढवतच नेला आहे.

प्लूटोची ग्रह म्हणून असलेली स्मारके

पायोनियर पाटी

प्लूटो हा पायोनियर पाटीवर ग्रह म्हणून दाखवण्यात आला आहे. ही कोरलेली पाटी पायोनियर १०पायोनियर ११ या १९७१ साली अवकाशात सोडलेल्या अंतराळ यानांना जोडली गेली होती. परग्रहावरील एखाद्या जीवसृष्टीला जर ही याने भविष्यात कधी भेटली तर त्यांना पृथ्वीबद्दल माहिती देण्यासाठी ही पाटी या यानांना जोडण्यात आली होती. या पाटीवर सूर्यमालेचे नऊ ग्रह दाखवणारे चित्र आहे.[५९] तसेच १९७०च्या दशकातच अंतराळात सोडलेल्या व्हॉयेजर १व्हॉयेजर २ या अंतराळयानांवर असलेल्या व्हॉयेजर सुवर्ण तबकडी या फोनोग्राफ तबकडीवरपण प्लूटोचे चित्र होते व ते चित्र प्लूटो हा नववा ग्रह आहे असे दर्शवित होते.[६०] डिस्नीच्या ऍनिमेशनपटांमधील प्लूटो या पात्राला प्लूटोच्या गौरवार्थच ते नाव देण्यात आले होते.[६१] तसेच १९४१मध्ये नवीन बनविलेल्या एका रासायनिक मूलतत्वाला ग्लेन टी. सीबॉर्ग यांनी प्लूटोनियम हे नाव दिले.[६२]

वाद

कायपर पट्ट्याचा शोध व प्लूटोचा त्याच्याशी असलेला संबंध यामुळे अनेकजण प्लूटोला कायपर पट्ट्यातील इतरांपेक्षा वेगळे गणले जावे वा नाही असा प्रश्न मांडू लागले. २००२ मध्ये कायपर पट्ट्यातील ५०००० क्वावार चा शोध लागला. याचा व्यास सुमारे १२८० कि.मी. आहे जो प्लूटोच्या जवळपास अर्धा आहे.[६३] २००४ मध्ये १८०० कि.मी व्यास असलेला ९०३७७ सेडनाचा शोध लागला.[६४] सेरेसच्या शोधानंतर त्याला ग्रहाचा दर्जा द्यावा असे काहींचे मत होते, पण वर नमूद केलेल्या तसेच इतर लघुग्रहांचा शोध लागल्यामुळे त्याला ग्रह दर्जा देण्याचे रद्द करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर प्लूटोलासुद्धा क्युपर पट्ट्यातील वस्तू म्हणून वर्गिकृत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

जुलै २९, २००५ रोजी एरिस या नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूचा शोध लागला. हा प्लूटोपेक्षा थोडा मोठा आहे.[६५] ट्रायटनच्या १८४६ मधल्या शोधानंतर एरिस हा सूर्यमालेत सापडलेली सर्वांत मोठी खगोलीय वस्तू होती. त्याच्या शोधकांनी व वार्ताहारानी त्याला दहावा ग्रह असे संबोधले पण यावर औपचारिक एकमत नव्हते.[६६] इतर काही जणांचे म्हणणे होते की एरिसचा शोधामुळे आता प्लूटोला लघु ग्रह म्हणून गणण्यात यावे.[६७]

प्लूटोला वेगळे ठरविणारे शेवटचे घटक होते, त्याचा चंद्र चेरॉन व त्याच्याभोवतीचे वातावरण. पण हेपण बहुदा चूक आहे कारण अनेक नेपच्यून पलीकडील खगोलीय वस्तूंना उपग्रह आहेत तसेच एरिसच्या वर्णपटावरून असे प्रतित होते की एरिसचा पृष्ठभाग हा प्लूटोसारखाच असावा.[६८] एरिसचा एक उपग्रहपण आहे, डिस्नोमिया नावाचा, ज्याचा शोध सप्टेंबर २००५ मध्ये लागला.

आय.ए.यू. ची ग्रहाची व्याख्या

२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे.

  1. ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
  2. त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार (spherical) व्हावा.
  3. त्या खगोलीय वस्तूने आपली कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात.[६९][७०]

प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही. त्याचे वस्तूमान त्याच्या कक्षेतील इतर वस्तूंच्या केवळ ०.०७ पट आहे. (पृथ्वीचे वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेतील वस्तूंच्या १७ दशलक्ष पट आहे.)[७१][७२] आय.ए.यू.ने पुढे ठरविले की प्लूटोला बटु ग्रह या नवीन तयार केलेल्या वर्गात टाकले जावे तसेच तो नेपच्यून पलीकडील वस्तू या वर्गातील प्लूटॉईड या उपवर्गाचा मूळ नमुना (prototype)सुद्धा मानण्यात यावा.

संदर्भ

  1. ^ a b जरी एरिस प्लूटोपेक्षा मोठा आहे तरी तो विखुरलेल्या चकतीमध्ये धरला जातो. हा भाग विकिसंकेतानुसार कायपर पट्ट्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून प्लूटो कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू बनतो
  2. ^ C.B. Olkin, L.H. Wasserman, O.G. Franz. Icarus (PDF). pp. 254–259. doi:10.1016/S0019-1035(03)00136-2 http://www.as.utexas.edu/~fritz/astrometry/Papers_in_pdf/%7BOlk03%7DPlutoCharon.pdf. 2007-03-13 रोजी पाहिले. More than one of |कृती= and |journal= specified (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ B. Sicardy, W. Beisker et al. http://adsabs.harvard.edu/abs/2006DPS....38.3106S. 2007-03-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); Explicit use of et al. in: |authors= (सहाय्य)
  4. ^ hubblesite http://hubblesite.org/newscenter/archive/releases/2007/24/full/. 2007-11-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ A. Akwagyiram. http://news.bbc.co.uk/1/hi/magazine/4737647.stm. 2006-03-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ T. B. Spahr. http://cfa-www.harvard.edu/mpec/K06/K06R19.html. 2006-09-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ D. Shiga. http://www.newscientistspace.com/article/dn10028-pluto-added-to-official-minor-planet-list.html. 2006-09-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Richard Gray. http://www.telegraph.co.uk/earth/main.jhtml?xml=/earth/2008/08/10/scipluto110.xml. 2008-08-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ K. Croswell. p. 43. Unknown parameter |आयडी= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ a b J. Rao. http://www.space.com/spacewatch/050311_pluto_guide.html. 2006-09-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ a b c W. G. Hoyt (1976). "W. H. Pickering's Planetary Predictions and the Discovery of Pluto". Isis. 67 (4): 551–564. doi:10.1086/351668. 2007-06-27 रोजी पाहिले.
  12. ^ Mark Littman. pp. p. 70. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra text (link)
  13. ^ a b Croswell, p. 50
  14. ^ Croswell p. 52
  15. ^ B. Mager. Pluto: The Discovery of Planet X http://www.discoveryofpluto.com/pluto05.html. 2007-03-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ a b c P. Rincon. Pluto: The Discovery of Planet X http://news.bbc.co.uk/1/hi/sci/tech/4596246.stm. 2007-04-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ K. M. Claxton. http://fredpratt.tripod.com/PR/pluto.html. 2007-10-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ "The Trans-Neptunian Body: Decision to call it Pluto". The Times: 15. May 27, 1930. Italic or bold markup not allowed in: |journal= (सहाय्य)
  19. ^ Croswell pp. 54–55
  20. ^ http://sse.jpl.nasa.gov/multimedia/display.cfm?IM_ID=263. 2007-03-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ३, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  21. ^ a b http://seds.lpl.arizona.edu/nineplanets/nineplanets/days.html. 2007-06-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जून २३, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  22. ^ cjvlang.com http://www.cjvlang.com/Dow/UrNepPl.html. 2008-05-24 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ Steve Renshaw and Saori Ihara. http://www2.gol.com/users/stever/nojiri.htm. 2007-06-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ http://www.cbsnews.com/stories/2006/01/19/tech/main1219891.shtml. 2007-04-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ Tobias C. Owen, Ted L. Roush; et al. (1993). "Surface Ices and the Atmospheric Composition of Pluto". Science. 261 (5122): 745–748. doi:10.1126/science.261.5122.745. PMID 17757212. 2007-03-29 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य); Explicit use of et al. in: |author= (सहाय्य)
  26. ^ SolStation http://www.solstation.com/stars/pluto.htm. 2007-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ Hubblesite http://hubblesite.org/newscenter/archive/releases/1996/09. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ a b Croswell p. 57
  29. ^ प्लूटोचा अल्बेडो पृथ्वीच्या १.३-२.० पट जास्त आहे. http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/plutofact.html. 2007-03-24 रोजी पाहिले. Unknown parameter |Author= ignored (|author= suggested) (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ J. Davies. Royal Observatory, Edinburgh (PDF) http://assets.cambridge.org/052180/0196/excerpt/0521800196_excerpt.pdf. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ D. J. Tholen, M. W. Buie, R. P. Binzel, M. L. Frueh (1987). "Improved Orbital and Physical Parameters for the Pluto-Charon System". Science. 237 (4814): 512–514. doi:10.1126/science.237.4814.512. PMID 17730324. 2007-03-26 रोजी पाहिले. More than one of |work= and |journal= specified (सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)
  32. ^ L. M. Close, W. J. Merline, D. J. Tholen, T. C. Owen, F. J. Roddier, C. Dumas, (2000). "Adaptive optics imaging of Pluto-Charon and the discovery of a moon around the Asteroid 45 Eugenia: the potential of adaptive optics in planetary astronomy". Proceedings of the International Society for Optical Engineering. 4007: 787–795, . 2007-03-26 रोजी पाहिले. More than one of |work= and |journal= specified (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
  33. ^ Ken Croswell. http://www.kencroswell.com/NitrogenInPlutosAtmosphere.html. 2007-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  34. ^ T. Ker. http://www.cnn.com/2006/TECH/space/01/03/pluto.temp/index.html. 2006-03-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ http://cfa-www.harvard.edu/iauc/04000/04097.html#Item0. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ R. Johnston. http://www.johnstonsarchive.net/astro/pluto.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ B. Sicardy (2003-07-10). "Large changes in Pluto's atmosphere as revealed by recent stellar occultations". Nature. Nature. 424: 168. doi:10.1038/nature01766. 2006-03-05 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  38. ^ http://web.mit.edu/newsoffice/2002/pluto.html. 2007-03-20 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ http://www.williams.edu/admin/news/releases.php?id=162. 2007-03-20 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  40. ^ R. R. Britt. Space.com http://www.space.com/scienceastronomy/pluto_seasons_030709.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  41. ^ J. L. Elliot, M. J. Person, A. A. S. Gulbis, E. R. Adams, E. A. Kramer, C. A. Zuluaga, R. E. Pike, J. M. Pasachoff, S. P. Souza, B. A. Babcock, J. W. Gangestad, A. E. Jaskot, P. J. Francis, R. Lucas, A. S. Bosh. American Astronomical Society http://adsabs.harvard.edu/abs/2006DPS....38.3102. 2007-04-12 रोजी पाहिले. More than one of |कृती= and |journal= specified (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  42. ^ NASA New Horizons http://pluto.jhuapl.edu/science/everything_pluto/16_plutoOrbit.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  43. ^ New Horizons http://pluto.jhuapl.edu/science/everything_pluto/8_cousin.html. 2006-06-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  44. ^ Neil deGrasse Tyson. The Planetary Society http://www.planetary.org/explore/topics/topten/tyson_pluto_is_not.html. 2006-06-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  45. ^ The Planetary Society http://www.planetary.org/explore/topics/neptune/triton.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  46. ^ Guy Gugliotta. "Possible New Moons for Pluto." Washington Post. November 1, 2005. Retrieved on October 10, 2006.
  47. ^ Derek C. Richardson and ­ Kevin J. Walsh. Department of Astronomy, University of Maryland http://arjournals.annualreviews.org/doi/abs/10.1146/annurev.earth.32.101802.120208?journalCode=earth. 2007-03-26 रोजी पाहिले. soft hyphen character in |लेखक= at position 25 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  48. ^ B. Sicardy et al. http://www.nature.com/nature/journal/v439/n7072/abs/nature04351.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); Explicit use of et al. in: |authors= (सहाय्य)
  49. ^ Leslie Young. Southwest Research Institute, Boulder, Colorado http://www.boulder.swri.edu/~layoung/projects/talks03/IfA-jan03v1.ppt. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  50. ^ "IAU Circular No. 8723 - Satellites of Pluto" (PDF) (Press release). International Astronomical Union. 2006-06-21. 2007-02-12 रोजी पाहिले.
  51. ^ F. R. Ward (2006). "Forced Resonant Migration of Pluto's Outer Satellites by Charon". Science. 313 (5790): 1107–1109. doi:10.1126/science.1127293. PMID 16825533. 2007-02-12 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  52. ^ http://voyager.jpl.nasa.gov/faq.html. 2006-09-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  53. ^ Dava Sobel. Discover magazine http://www.findarticles.com/p/articles/mi_m1511/is_n5_v14/ai_13794133. 2007-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  54. ^ Dr. David R. Williams. NASA Goddard Space Flight Center http://nssdc.gsfc.nasa.gov/database/MasterCatalog?sc=PLUTOKE. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  55. ^ Robert Roy Britt. space.com http://www.space.com/scienceastronomy/pluto_horizons_030225.html. 2007-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  56. ^ Dr. Alan Stern. Southwest Research Institute http://www.jhuapl.edu/newscenter/pressreleases/2006/060203.asp. 2007-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  57. ^ http://pluto.jhuapl.edu/news_center/news/112806.htm. 2007-03-20 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  58. ^ Steffl, Andrew J. "First Constraints on Rings in the Pluto System" (subscription required). astro-ph/0608036. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); Cite journal requires |journal= (सहाय्य)
  59. ^ R.W. Robinett. Department of Physics, The Pennsylvania State University (PDF) http://www.waiferx.com/Physics/2006/Fall/Ast10/Goals/FinalExam/TPT2001-RWRobinett.pdf. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  60. ^ Planetary Society http://www.planetary.org/explore/topics/space_missions/voyager/golden_record.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १५, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  61. ^ Allison M. Heinrichs. Pittsburgh Tribune-Review http://www.pittsburghlive.com/x/pittsburghtrib/news/cityregion/s_467650.html. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  62. ^ David L. Clark and David E. Hobart. (PDF) http://www.fas.org/sgp/othergov/doe/lanl/pubs/00818011.pdf. 2007-08-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  63. ^ Michael E. Brown and Chadwick A. Trujillo. The American Astronomical Society http://www.journals.uchicago.edu/cgi-bin/resolve?doi=10.1086/382513. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  64. ^ W. M. Grundy, K. S. Noll, D. C. Stephens. Lowell Observatory, Space Telescope Science Institute http://arxiv.org/abs/astro-ph/0502229. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  65. ^ Hubblesite http://hubblesite.org/newscenter/newsdesk/archive/releases/2006/16/. 2007-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  66. ^ Jet Propulsion Laboratory http://www.jpl.nasa.gov/news/news-print.cfm?release=2005-126. 2007-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  67. ^ Steven Soter. http://arxiv.org/abs/astro-ph/0608359. 2006-08-24 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य) submitted to The Astronomical Journal, August 16, 2006
  68. ^ Mike Brown. California Institute of Technology http://www.gps.caltech.edu/~mbrown/planetlila/. 2006-05-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  69. ^ (PDF). August 24, 2006 http://www.iau.org/static/resolutions/Resolution_GA26-5-6.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  70. ^ "IAU 2006 General Assembly: Result of the IAU Resolution votes" (Press release). International Astronomical Union (News Release - IAU0603). 2006-08-24. 2008-06-15 रोजी पाहिले.
  71. ^ Steven Soter. Department of Astrophysics, American Museum of Natural History http://www.sciam.com/article.cfm?chanID=sa006&articleID=93385350-E7F2-99DF-3FD6272BB4959038&pageNumber=2&catID=2. 2007-02-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  72. ^ . August 24, 2006 http://www.iau2006.org/mirror/www.iau.org/iau0603/index.html. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA