"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uk:Англо-індійці
No edit summary
ओळ ६१: ओळ ६१:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]
[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]

[[uk:Англо-індійці]]

११:०१, ११ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

मराठीमाती
ब्रीदवाक्य माझ्या मातीचे गायन
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
स्थापना २७ सप्टेबर २००२
संस्थापक हर्षद खंदारे
मुख्यालय

पुणे, महाराष्ट्र, भारत

कार्यालयांची संख्या
महत्त्वाच्या व्यक्ती हर्षद खंदारे (संस्थापक, मुख्य संपादक), स्वाती खंदारे (सह संपादिका)
सेवा पर्यटन माहिती, बातम्या, दिनदर्शिका, शुभेच्छापत्रे, छायाचित्रे, ज्योतिष
मालक हर्षद खंदारे
पालक कंपनी ओनवे आर्ट अ‍ॅन्ड टेक्नोलॉजी
संकेतस्थळ मराठीमाती.कॉम

मराठीमाती.कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदनीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत. मराठीमाती.कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट देण्यात आलेली आहे.

मराठीमाती चे नवीन संकेतस्थळ

दिनांक १ जून २०१२ पासून मराठीमातीचे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे[३]. आणि ते मराठीमाती.नेट या पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून या संकेतस्थळावर स्वत: लिखाण केले जाऊ शकते, हे या नवीन संकेतस्थळाचे मुख्य आकर्षण आहे.

विविध विभाग

  • विशेष : संपादकीय लेख, दैनिक व्यंग्यचित्रे आणि मातीतले कोहिनूर या सारखे विविध विषय या विशेष विभागात आहे.
  • महाराष्ट्र : महाराष्ट्रातील इतिहास, पर्यटन विषयक छायाचित्रांसह रंजक माहिती, साहित्य क्षेत्रातील नवनवीन लेखन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक माहिती, महाराष्ट्रातील कला आणि क्रीडा या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
  • जीवनशैली : सर्वसामान्य जीवनाशी संलग्न असणारे विविध विषय यात पहावयास मिळतात.
  • करमणूक : नाटक, चित्रपट, टि.व्ही,मराठी गाणी आणि मराठी विनोद या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
  • घडामोडी : महाराष्ट्र आणि मराठी संदर्भातील मराठी बातम्यांचे हे सदर आहे.
  • अक्षरमंच : वाचक - लेखकांचे मुक्त व्यासपीठ, वाचक आपले साहित्य या सदराद्वारे प्रसिद्ध करू शकतात. या सदरातील लेखकांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
  • ब्लॉग : मराठीमातीवर सातत्याने होणारे बदल आणि घडमोडींची माहिती या ब्लॉगद्वारा प्रसारीत केली जाते.

सेवा-सुविधा

  • मराठी फॉन्ट : विविध मराठी(देवनागरी) फॉन्ट(टंक) डाऊनलोड करण्याची सुविधा.
  • मराठी दिनदर्शिका : मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका.
  • महाराष्ट्र फोटो गॅलरी : महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणांची, उत्सवांची, कार्यक्रमांची छायाचित्रे.

बाह्य दुवे

संदर्भ