"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: new:हेलेन केलर
ओळ १४७: ओळ १४७:
[[mn:Хелен Келлер]]
[[mn:Хелен Келлер]]
[[nds:Helen Keller]]
[[nds:Helen Keller]]
[[new:हेलेन केलर]]
[[nl:Helen Keller]]
[[nl:Helen Keller]]
[[nn:Helen Keller]]
[[nn:Helen Keller]]

०३:१६, २९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

हेलन केलर
जन्म हेलन ॲडम्स केलर
जून २७, इ.स. १८८०
टस्कंबिया, अलाबामा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू जून १, इ.स. १९६८
ईस्टन, कनेटिकट, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
वडील आर्थर केलर
आई केट ॲडम्स
पुरस्कार प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम
स्वाक्षरी



हेलन ॲडम्स केलर (जून २७, इ.स. १८८० - जून १, इ.स. १९६८) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ती होत्या.

सुरुवातीचे दिवस

हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १९८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एवी ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलेनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे [१] कप्तान होते.

हेलनची आजी ही रॉबर्ट इ. ली यांची बहीण होती.

हेलन ही जन्मजात मूक बधीर नव्हती. पण नंतर स्कारलेट फिवर किंवा मेनिंजायटीस झाल्याने ती अंध आणि बधीर झाली.

प्राथमिक शिक्षण

मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किंस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये हेलेन केलर आणि अॅन सुलीवान यांनी न्यूयॉर्कमधल्या बधीरांसाठीच्या राइट हुमेसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या.त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.

लेखन

केलर यांनी १२ प्रकाशित पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.

वयाच्या ११ वर्षी त्यांनी द फ्रॉस्ट किंग (इ.स. १९८१ ) हे पुस्तक लिहिले. असे आरोप होते की ही कथा साहित्यिक चोरी होती, द फ्रॉस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधन केल्यानंतर कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.

वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा द स्टोरी ऑफ माय लाइफ (इ.स. १९०३), सुलीवान आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाचा काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दात लिहिली आहे.

केलर यांनी द वर्ल्ड आय लिव इन (इ.स. १९०८) या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितलं. आऊट ऑफ द डार्क, ही समाजवादावरील निबंधांची मालिका इ.स. १९१३ मध्ये प्रकाशित केली.

अकिता कुत्रा

जेव्हा केलरने जुलैमध्ये इ.स. १९३७ साली जपानमध्ये अकीता परगण्याला भेट दिली, तेव्हा तिने हाचीको या इ.स. १९३५ साली वारलेल्या प्रसिद्ध अकीता कुत्र्याबद्दल चौकशी केली, तिने एका जपानी मनुष्याला सांगितले की तिलाही तसे कुत्रे हवे आहे; तिला महिन्याभरातच कामिकाझे-गो नावाचा एक कुत्रे देण्यात आले, पण ते विषाणूजन्य रोगाने मेले. जुलै, इ.स. १९३८ मध्ये जपानी सरकारने कामिकाझे-गोचा थोरला भाऊ केंझन-गो नावाचा अजुन एक कुत्रा त्यांना भेट म्हणून दिला होता. हेलर यांनी नेलेल्या या कुत्र्यांमुळे अमेरिकेत अकिता कुत्र्यांबद्दल जागरुकता निर्माण झाली

सहकारी

ॲन सुलिवान ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्या बरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह जॉन मेसी ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला.त्यांची तब्येत इ.स. १९१४ नंतर उतरत गेली.

पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधीर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या.[२]

त्या नंतर हेलन ॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्विन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड" सुरु केले.[३]

ॲन सुलिवान ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला, त्या वेळी त्या कोम्यात असल्याचे कळते. मृत्यूसमयी त्यांचे हात केलर यांच्या हातात होता.[४] त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या.

नंतरचे आयुष्य

इ.स. १९६१ मध्ये हेलेन केलर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या घरातच होत्या. १४ सप्टेंबर, इ.स. १९६४ रोजी,राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन यांनी हेलन केलर यांना अमेरिकेमधील सर्व श्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रिडम दिले. इ.स. १९६५ मध्ये त्यांची नॅशनल वुमेंस हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी त्याचं नंतरचे आयुष्य अमेरिकन फाउंडेशन, ह्या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले .१ जून, इ.स. १९६८ च्या रात्री आर्कन रीज, ईस्टन, कनेक्टिकट येथील घरात झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ

  1. ^ सांघिक राज्य सेना (इंग्लिश: Confederate States Army, कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मी)
  2. ^ http://www.graceproducts.com/keller/life.html
  3. ^ http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People
  4. ^ http://www.rnib.org.uk/aboutus/aboutsightloss/famous/Pages/helenkeller.aspx