"अरुंधती रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
खूणपताका: विशेषणे टाळा
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bn:অরুন্ধতী রায়
ओळ २३: ओळ २३:


[[ar:أرونداتي روي]]
[[ar:أرونداتي روي]]
[[bn:অরুন্ধতী রায়]]
[[ca:Arundhati Roy]]
[[ca:Arundhati Roy]]
[[cs:Arundhati Roy]]
[[cs:Arundhati Roy]]

००:३९, २० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

अरुंधती रॉय

अरुंधती रॉय (मल्याळम: അരുന്ധതി റോയ് ; बंगाली: অরুন্ধতি রায় ) (जन्म २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात) या भारतीय साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे.

पार्श्वभूमी आणि जीवन

अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालय येथे झाला. त्यांचे वडिल रणजीत रॉय हे हिंदूधर्मीय चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. त्यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑव्ह आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला, तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत.

दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या पुरस्कारप्राप्त चित्रपट मेसी साहब मध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले.

साहित्यिक कारकीर्द

कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात अरूंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले, इन विच एनी गिव्हज इट दोज वन्स (१९८९) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहीली. इलेक्ट्रिक मून (१९९२) ची पटकथाही त्यांनी लिहिली.

शेखर कपूर यांच्या बॅंडिट क्विनवर केलेल्या टिकेने अरूंधती रॉय प्रथम प्रकाशझोतात आल्या.

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही कादंबरी १९९२ मध्ये त्यांनी लिहायला सुरूवात केली आणि १९९६ मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. या आत्मचरित्रात्मक कादंबरीने १९९७ चा बुकर पुरस्कार प्राप्त केला आणि त्यावर्षीच्या नोंद घेण्याजोग्या पुस्तकांमध्येही त्यांच्या या कादंबरीला स्थान मिळाले.