"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १३२: ओळ १३२:
दाबोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.
दाबोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.


==दुर्घटना व अपघात==
<!--
* [[ऑक्टोबर १]], [[इ.स. २००२]] रोजी भारतीय आरमाराची दोन आयएल-१८ प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
==घटना व अपघात==
* डिसेंबर २००४मध्ये सी हॅरियर विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
*On 1 October 2002, two Ilyushin IL-18s collided and crashed near Dabolim airport killing 12 naval personnel in the planes and 3 civilians on the ground.{{Citation needed | date=July 2009}}
* डिसेंबर २००५मध्ये सीहॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
*In December 2004 a Sea Harrier did a "belly flop" while landing. The pilot survived.<ref name="Unnithan"/>
* [[डिसेंबर २४]], २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करुन घेतला.
*In early 2005 a Sea Harrier overshot the runway while landing. The pilot survived.<ref name="Unnithan"/>
*In December 2005 a Sea Harrier crashed through a steel wire barrier, broke through the perimeter wall, and went over a road before ending in a fireball on the other side. The pilot was killed.<ref name="Unnithan"/>
*On 24 December 2007 a Sea Harrier crashed and burned at 11:15 AM while attempting a vertical landing with a full fuel tank at the eastern end of the runway. The pilot ejected to safety but civilian airport operations were halted for 90 minutes.
-->


==संदर्भ==
==संदर्भ==

०७:३७, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


दाबोळी विमानतळ
गोवा विमानतळ
दाबोळी नौसेना विमानतळ
आहसंवि: GOIआप्रविको: VAGO
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक/सेना
मालक गोवाभारतीय नौसेना[१]
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ वास्को दा गामा, गोवा, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १८४ फू / ५६ मी
गुणक (भौगोलिक) 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139गुणक: 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E / 15.38083; 73.83139
संकेतस्थळ संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०८/२६ ३,४५८ ११,३४५ डांबरी

दाबोळी विमानतळ(आहसंवि: GOIआप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को दा गामा येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास

हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५०च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोर सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला.

पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास झुआरीमांडोवी नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग (चोगम) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात जर्मनीची काँडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर विमानांतून दाबोळीस आले.

आर्थिक व्यवस्थापन

इमारत आणि सुविधा

दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय

दाबोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक अंतर्देशीय तर दुसरे आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्देशीय टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी आवागमन करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलश्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ कार आणि आठ बस थांबविण्याची सोय आहे.[४]

दाबोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः ख्रिसमस व ग्रेगोरियन नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाबोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बँगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५]

येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरुन सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.

स्थानिक दळणवळण

गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिकालिम मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मडगांव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वे द्वारे गोवा तसेच भारतात इतर ठिकाणी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

विस्तार

नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले. या वर अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च होतील व त्याने आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य होईल. यात जुन्या टर्मिनल पाडणे आणि सध्याच्या दोन्ही इमारतीतील सुविधा एकाच इमारतीत आणणे हे अपेक्षित आहे. याशिवाय बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेन्द्र बांधले जाईल.

टर्मिनल

जेट एरवेझची वाहने
टर्मिनल १ - देशांतर्गत

दाबोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.

टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय

येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाबोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एरोफ्लोट मॉस्को (हिवाळी सेवा)
एर अरेबिया शारजा
एर इटली पोलास्का वॉर्सॉ (चार्टर सेवा)
आर्कफ्लाय अॅम्स्टरडॅम (चार्टर सेवा)
काँडोर फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एर झुरिक (चार्टर सेवा)
गोएर दिल्ली, मुंबई
इंडियन एरलाइन्स दिल्ली, मुंबई
इंडियन एरलाइन्स बंगळूर, चेन्नई, दुबई, कुवैत
ईंडिगो दिल्ली, मुंबई
जेट एरवेज बंगळूर, हैदराबाद, मुंबई
जेट लाईट अमदावाद, दिल्ली, मुंबई
किंगफिशर एरलाइन्स बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, पुणे, श्रीनगर
एमडीएलआर एरलाइंस दिल्ली
मोनार्क एरलाइंस लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
नोव्हएर ग्योटेबोर्ग, ऑस्लो, स्टॉकहोम
पॅरामाउंट एरवेज चेन्नई, कोची, तिरुवअनंतपुरम
कतार एरवेज दोहा
स्पाईसजेट अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई
थॉमस कूक एरलाइन्स लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
थॉमसन एरवेज ईस्ट मिडलँड्स, लंडन-गॅटविक, मँचेस्टर (चार्टर सेवा)
ट्रांसएरो मॉस्को-दोमोदेदोवो

सांख्यिकी

दाबोळी विमानतळाची सांख्यिकी[२]
वर्ष एकूण प्रवासी एकूण विमान आवागमनसंख्या
1999 758,914 7,584
2000 875,924 7,957
2001 791,628 8,112

सैनिकी विमान प्रशिक्षण

भारतीय आरमार दाबोळी विमानतळावरुन आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्टर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.

विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ

गोव्यातील राजकारण्यांनी दाबोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाबोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाबोळी मध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हणलेले आहे.[६]

२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.

मोपा विमानतळ

काही वर्षांपूर्वी नागरी विमान मंत्रालयाने गोव्याच्या उत्तर भागात मोपा येथे नवीन विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता व त्यास आरमाराने मान्यताही दिली होती. हा विमानतळ बांधून झाल्यावर दाबोळी विमानळ पूर्णपणे आरमाराच्या हाती सोपविणे हे या प्रस्तावात होते. या प्रस्तावाला २००५च्या सुमारास ऐतिहासिक कारणांवरुन विरोध झाल्याने हा पर्यायही बारगळला.

भारतीय आरमारी तळ

दाबोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलुर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केन्द्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौके बरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाबोळी येथे स्थित करण्याचा बेत आहे.[७] कारवारस्थित विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाबोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौके वर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मी लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.

याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाबोळी विमानतळावर स्थित आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊबॉम्बफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करुन दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.

सामान वाहतूक

दाबोळी विमानतळावरुन प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.

दुर्घटना व अपघात

  • ऑक्टोबर १, इ.स. २००२ रोजी भारतीय आरमाराची दोन आयएल-१८ प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
  • डिसेंबर २००४मध्ये सी हॅरियर विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
  • डिसेंबर २००५मध्ये सीहॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
  • डिसेंबर २४, २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करुन घेतला.

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ [http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa
  3. ^ Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline
  4. ^ Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)
  5. ^ Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. Financial Express.
  6. ^ D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". Goa Plus (The Times of India supplement). 5 January 2007
  7. ^ India to receive MiG-29 from Russia in 2007. The Times of India. 13 March 2006

बाह्य दुवे