"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३३: ओळ ३३:
संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
===शिस्त===
===शिस्त===
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बऱ्यापैकी वाखाणण्यासारखी शिस्त असते.पण हिच गोष्ट त्यांच्या छत्राखालील इतर संस्थांना लागू होतेच असे नेमके पणाने सांगता येत नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी शिस्त असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरु होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात. पण हिच गोष्ट त्यांच्या छत्राखालील इतर संस्थांना लागू होतेच असे नेमके पणाने सांगता येत नाही.

===हुमन नेटवर्किंग आणि पाठपुरावा===
===हुमन नेटवर्किंग आणि पाठपुरावा===
संघाचे कार्यकर्ते हुमन नेटवर्किंगमध्ये आणि पाठपुरावा करण्यात सकुशल असतात याचा चांगला उपयोग छत्राखालील संस्थाना उभेकरण्यात आणि नियंत्रीत करण्यात केला जातो.सहसा जाहीर भेटींच्या आधी ठराविक गटाच्या बैठकी घेऊन पुर्वरचित हितांची रचना साध्य होईल असे पाहिले जाते. याचीच दुसरी बाजू पडद्दामागून ब्राह्मण्य आणि जातीवाद सर्वसमावेशक आणि आंतरजातीय सौहार्द जपणाऱ्यांना दूर ठेवणारी गटबाजी केली जाते.
संघाचे कार्यकर्ते हुमन नेटवर्किंगमध्ये आणि पाठपुरावा करण्यात सकुशल असतात याचा चांगला उपयोग छत्राखालील संस्थाना उभेकरण्यात आणि नियंत्रीत करण्यात केला जातो.सहसा जाहीर भेटींच्या आधी ठराविक गटाच्या बैठकी घेऊन पुर्वरचित हितांची रचना साध्य होईल असे पाहिले जाते. याचीच दुसरी बाजू पडद्दामागून ब्राह्मण्य आणि जातीवाद सर्वसमावेशक आणि आंतरजातीय सौहार्द जपणाऱ्यांना दूर ठेवणारी गटबाजी केली जाते.

१७:०५, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारीत रचनात्मक पुनरुज्जीवनवादी हिंदूधर्मीय शीस्तबद्ध स्वयंसेवकांची संघटना आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे.

स्थापना

स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या "शुक्रवारी" या नागपूर येथील निवासस्थानी केली.[१] १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

संघटनेचा मूळ उद्देश संघटीत सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे,इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्या बद्दलची विश्लेषणे,मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करवल्या गेलेल्या धर्मांतरांबद्दल संशयवाद,पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्यजीवन शैलीच्या प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीवादाचा जहालवादास नकार , अल्पसंख्यांक धर्मियांच्या काँग्रेसने/महात्मा गांधी यांच्या तथाकथित लोकानुनय हि प्रमूख कारणे होती.

कार्यतत्त्व

भारतमातेची पूजा करणारे आणि या भारताला आपली मातृभूमी मानणारे हे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातिपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे.

भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परमवैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात..

फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.

सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारीत रचनात्मक पुनरुज्जीवनवाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकाच वेळी दोन संदेश देतो रचनात्मक सांस्कृतिक राष्ट्रवादावर भर देताना, भारताच्या बाहेर निर्माण झालेल्या धर्मधारणांबद्दल नकारात्मकता दर्शवताना स्वत:चा पुरोगामी पणावर आधिकार सांगते,त्याचवेळी सनातनतेचे पुनरुत्थानाचे अश्वासन पुनरुज्जीवनवाद्यांना मिळत राहील अथवा कालबाह्य सनातनता होताहोईतो पाठीशी घातली याचीही काळजी घेतली जाते.

भारताच्या राजकीय सिमा ऐतिहासीक काळात भारतीय उपखंडा बाहेर होत्या असे समर्थकात इतिहासाचे अतिरंजन करणारा पुनरुज्जीवन वादाचा काही फायदा होतो का हे काळ ठरवेल परंतु स्वातंत्र्योत्तर काळात पाकीस्तानने भारताच्या दुसऱ्या शेजारी देश चीनच्या नेतृत्वास भारताच्या हेतुंबद्दल साशंक करण्याकरिता संघप्रणित उपखंडाबाहेरील जागांवरचे अतिरंजीत दाव्यांचा यशस्वी उपयोग केला.

परधर्मीयांवर टिका करताना हिंदूधर्महे परकियांनी ठेवलेले नामाभिधान आणि धर्म शब्दाची व्याख्या मात्र स्विकारली.हिंदू धर्माची व्याख्या व्यापक आहे म्हणतानाच या व्याख्येवर भारतात राहणारे तेच हिंदू अशी हिंदू धर्माच्या वैश्विक प्रसारावर भौगोलीक सिमा टाकली.भारतीय विचारधारा प्रार्थना आणि तत्वज्ञान पद्धतीत वैविध्य जपण्यास सक्षम असताना त्यातील वैदिकासोबतच इतर दर्शनतत्वज्ञानाचा परिचय स्वत:च्या समर्थकांना खासकरून तरूण वर्गास करून देण्यात संघ कमी पडतो का ? इतर दर्शन आणि जीवन पद्धतींना हिंदू धर्माच अंग म्हणवून घेताना , केवळ संस्कृतभाषा निष्ठ अद्वैत वैदिक आणि परंपरावादी सनातन्यांच प्राबल्य जपल जाईल याची संघ अधिक काळजी करतो का ? मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मा तत्वज्ञानातील भारतीय विचारधारांशी सहमती असलेली आणि नसलेली तत्व नेमके पणाने सांगून (त्यांच्यातील कोणत्याचांगल्या गोष्टी स्विकारत आहोत स्पष्ट नकरता सरसकट नकारात्मक भूमिका राबवली जाते का?) नेमकेपणाने चर्चा करण्या एवजी एखादा समाज कोणत्या दिशेस पाहून प्रार्थना करतो , जन्मदिवशी दिवेलावतो कि मेणबत्त्या फुंकतो अशा सनातनी परंपरावाद्यांच्या दिखाऊ आक्षेपांना शरण जाऊन संघाचे नेतृत्व इतिहासपुरुषाची पुजा करताना आपल्या समर्थकांना सांस्कृतीक अभिमानाची मर्यादा ओलांडून सांस्कृतीक अहंकारास प्रवृत्ततर करत नाही आहे याबद्दल संघ नेतृत्व कितपत काळजी घेते या बद्दल वेळोवेळी शंका घेतल्या जातात.

राजकीय विचार

संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम , विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष ई. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पद ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ गाईड करू शकतात. निर्णय हे लोकशाही पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.

संघ आणि परिवारातील कार्यकर्त्यांची कोंग्रेस आणि इतर विरोधकांवरील टिका वेळोवेळी मुद्दांच्या रूळांवरून घसरून व्यक्तिगत बनत जाते.नेहरू उत्तरकाळात काँग्रेस आणि इतर तथाकथीत धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षातील मनापासून धर्मनिरपेक्षता जपणारे नेतृत्व मागे पडून धर्मनिरपेक्षते बद्दल केवळ तोंडदेखली पोपटपंची करणारे निवडणूकांची धार्मीक-जातीय समिकरणे मांडणारे नेतृत्व पुढे येत गेल्याने ते खऱ्या धर्मनिरपेक्षतेस न्याय देऊ शकले नाहीच पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्या धर्मनिरपेक्षतेस तथाकथित म्हणून हिणवण्याचा मार्ग (आणि सांस्कृतीक कमी) आणि राजकीय प्रभाव वाढत गेला.

संरचना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात.. सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.

शाखा

चित्र:Sangh karyakram.JPG
चित्र:सरसंघचालक प्रणाम कार्यक्रम जबलपुर (१ नवम्बर २००९)

वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.

संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.

शिस्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी शिस्त असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरु होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात. पण हिच गोष्ट त्यांच्या छत्राखालील इतर संस्थांना लागू होतेच असे नेमके पणाने सांगता येत नाही.

हुमन नेटवर्किंग आणि पाठपुरावा

संघाचे कार्यकर्ते हुमन नेटवर्किंगमध्ये आणि पाठपुरावा करण्यात सकुशल असतात याचा चांगला उपयोग छत्राखालील संस्थाना उभेकरण्यात आणि नियंत्रीत करण्यात केला जातो.सहसा जाहीर भेटींच्या आधी ठराविक गटाच्या बैठकी घेऊन पुर्वरचित हितांची रचना साध्य होईल असे पाहिले जाते. याचीच दुसरी बाजू पडद्दामागून ब्राह्मण्य आणि जातीवाद सर्वसमावेशक आणि आंतरजातीय सौहार्द जपणाऱ्यांना दूर ठेवणारी गटबाजी केली जाते.

संघाच्या उपलब्धी

राष्ट्रवादाने प्रेरीत यूवकवर्ग समाजात घडवला जाणे ही संघाची खरी उपलब्धी संघाच्या अहंकारावर आधारीत पुनरुज्जीवनवादामुळे झाकोळली जाते. संघाने समाजातील विविध कार्यांत आपले अस्तित्व दाखवले आहे.. उदाहरणार्थ १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना जानेवारी २६, १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला निमंत्रित केले. केवळ २ दिवसांच्या पूर्वसूचनेनंतरसुद्धा ३०००पेक्षा जास्त स्वयंसेवक प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत सामील होण्यास हजर राहिले. अलीकडील काळात संघाच्या विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकीय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ माजीउपराष्ट्रपती भैरव सिंग शेखावत, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी गृहमंत्री लाल कृष्ण अडवाणी इत्यादी लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते/आहेत..

जात्युच्छेदन, संघ दृष्टीकोण आणि प्रत्यक्ष कार्य


१९३६ साली स्वा.सावरकर अस्पृश्यता आणि चातुर्वर्ण्य संकल्पनेस विनाअट मूठमाती देण्याच्या समाजसुधारणेकरता कार्यरत झाले[२] त्या उलट वर्णव्यवस्था उपयुक्त ठरलीही असेल पण सध्या ती कालबाह्यच नव्हे तर राष्ट्रघातक झाली आहे हे सांगायला संघाचे नेते टाळतात [२] . सनातन लोकानुनयास्तव जानेवारी १९६९ मध्ये गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चातुर्वर्ण्य ईश्वरनिर्मित असल्याचे सांगून त्याचे समर्थन करत होता. पूर्वकर्मानुसार वर्ण मिळत असल्याचे प्रतिपादन केले. अनिष्ट रुढी सक्तीने बदलायला विरोध दर्शविला. त्यामुळे धर्मश्रद्धेला, प्राचीन परंपरेला धक्का बसतो, असे सांगत होता. संघस्थानावर अस्पृश्यता पाळली जात नाही. संघ जात मानत नाही. संघात सारे फक्त हिंदू असतात, हे तेव्हाही सांगितले गेले. आजही सांगितले जाते. परंतु संघावरील ब्राह्मण्याच्या टीकेचे मूळ गुरुजींच्या विचारात व भूमिकेत आहे. [३]

शिवाय संघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अभिजन वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून संघ सवर्णांचा व मुख्यत्वे ब्राह्मणांचा यात दोष आहे हे ही सांगायला कचरतो . [२]पण याचबरोबर इतरही नेत्यांची वक्तव्ये लक्षात घ्यायला हवीत. बाळासाहेब देवरस यांनी ‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’ असे सुस्पष्ट विधानही केले आहे. त्याचबरोबर २ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांना बोलावून त्यात सरसंघचालक के.सुदर्शन म्हणाले, 'आम्ही आमच्या शाखेमध्ये कधीच जातीयवाद पाळत नाही. दलित हे आमच्याच रक्ताचे आहेत पण काही कारणांनी चुकीच्या आचरणाने अस्पृश्यता अशा लोकांवर लादली गेली, जे आमच्याच धर्माचे भाग आहेत' पण ज्या जोराने संघ राममंदिर, रामसेतू वगैरे मुद्दे मांडतो त्या जोराने तो जात्युच्छेदनाविरोधी भूमिका नक्कीच घेत नाही. [२] त्याचबरोबर संघाच्या विविध कार्यक्रमांना शंकराचार्यांचे घोळके असतात ज्यामुळे हे काय जात्युच्छेदन करणार अशी शंका साहजिकच येते.[२] संघ दलितांचे उपनयन अथवा दलितांना पुजारी बनवणे वगैरे काम करते पण आंतरजातीय विवाह लावणे संघाला सहज शक्य आहे पण संघ ते कार्य करत नाही .[२] याबद्दल परिवाराच्या एका वेबसाईटवर या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की आमचा आंतरजातीय विवाहास विरोध नाही पण जर ते लावले तर मागच्या पिढीतील लोक रागावतील व हिंदुत्वापासुन दूर जातील. पण जात्युच्छेदन करायचे असल्यास कोणी ना कोणीतरी दुखावला जाणारच आहे. दुखावले जाणार्‍याची काळजी संघाने करण्याची गरज नाही कारण संघ ही राजकीय पार्टी नाही. प्रबोधन करायचे असल्यास विरोध हा स्वाभाविक आहे.[२]

संघ अनेकदा प्रतिगामी भूमिका घेतो असेही दिसते. म्हणजे संघाच्या एका नेत्याने मुलाखतकार मुलीने जीन्स घातली म्हणून दाखवलेली नाराजी [२] अथवा प्रमोद महाजन फाईव्ह स्टार कल्चर आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून धुसफूस इत्यादी अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी संघ मध्ययुगीन कालखंडात घेऊन जाईल अशी भीती अनेकांना वाटते [२]. सध्या संघ ही एकमेव हिंदुत्ववादी संघटना आहे जी देशभर पसरलेली आहे व जिच्याकडे हजारो स्वयंसेवक आहेत व जात्युच्छेदनाचे कार्य तेच व्यवस्थितपणे करु शकतात.[४]

टीका

इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.. महात्मा गांधींवर हल्ला करणारा नथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली.

काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, शाह बानो खटल्याची गैरहाताळणी, कोणत्याही भारतीय नागरिकाला काश्मीरमध्ये वसण्याला बंदी करणारे घटनेतील ३७०वे कलम, सर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा न आणणे, हज यात्रेला दिलेली अवाजवी सूट आणि मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम न चालवणे इत्यादी गोष्टींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आक्षेप आहे. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदूंना अनुकूल अशा हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी गोष्टी विसरतात.

संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा रामजन्मभूमी होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद निर्माण करू पाहतो आहे, कारण अयोध्येत अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. इ.स. २००३ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.

संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था

आजवरचे सरसंघचालक

प्रार्थना

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्‌ ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्‌
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्‌
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्‌
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्‌
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम्‌
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्‌ ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्‌
परं साधनं नाम वीरव्रतम्‌
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्‌ ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्‌ ।
परं वैभवं नेतुमेतत्‌ स्वराष्ट्रम्‌
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्‌ ।।३।।

।। भारत माता की जय ।।
अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.

।। भारत माता की जय ।।

हे पहा

बाह्य दुवे

संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था

संदर्भ

  1. ^ http://rssonnet.org/index.php?option=com_timeline&Itemid=56
  2. ^ a b c d e f g h i मायबोली हित्गुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ,हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले .
  3. ^ संघाविषयीची कोडी कायमच! - माधव साठे (८ऑक्टोबर२००० अमृतपथ Author: रमेश पतंगे या पुस्तकाच्या प्रकाशन ओळख निमीत्ताने महारष्ट्र टाईम्समध्ये समीक्षा:मुंबईतील नवाकाळ दैनिकात जानेवारी १९६९मध्ये गोळवलकर गुरुजींच्या मुलाखतीत त्यांनी चातुर्वर्ण्य ईश्वरनिर्मित असल्याचे सांगून त्याचे समर्थन केले. पूर्वकर्मानुसार वर्ण मिळत असल्याचे प्रतिपादन केले. अनिष्ट रुढी सक्तीने बदलायला विरोध दर्शविला. त्यामुळे धर्मश्रद्धेला, प्राचीन परंपरेला धक्का बसतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. या मुलाखतीने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. गोळवलकर गुरुजींच्या समताविरोधी विचारांना विरोध झाला. निषेधही व्यक्त करण्यात आला. २६ जानेवारीच्या ऑर्गनायझरमध्ये या संदर्भात गुरुजींची नवी मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. ‘नवाकाळ’ने त्यातील महत्त्वाचा भाग प्रसिद्ध केला. हे वेबसाईट दिनांक २६जुलै २०१२ वेळ दुपारी २.११ वाजता जसे पाहिले
  4. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हित्गुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले