"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: vi:Narmada
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ar:نارمادا
ओळ १२०: ओळ १२०:
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]


[[ar:نارمادا]]
[[be:Рака Нармада]]
[[be:Рака Нармада]]
[[bn:নর্মদা নদী]]
[[bn:নর্মদা নদী]]

१५:४५, १२ जुलै २०१२ ची आवृत्ती

नर्मदा
जबलपूर, मध्य प्रदेश येथील नर्मदेकाठचा 'झाशी घाट'
उगम अमरकंटक
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत (मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात)
लांबी १,३१२ किमी (८१५ मैल)
उगम स्थान उंची ९०० मी (३,००० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,००,०००
धरणे सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)

नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापीमही).

उगम, मार्गक्रमण व मुख

उगम

अमरकंटक येथील नर्मदाकुंड

अमरकंटक (शाडोल जिल्हा, मध्य प्रदेश ) येथील नर्मदाकुंडातून.


मार्गक्रमण

भेडाघाट येथील नर्मदाकाठचे संगमरवरी डोंगर

मुख

भरूच, गुजरातच्या पश्चिम समुफद्र किनाऱ्यावरील खंबायतच्या आखातात.

खोरे

नर्मदेचे खोरे विंध्यसातपुडा पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणार्‍या आहेत. [१]

नर्मदेचे खोर्‍याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात.

  1. वरच्या बाजूचे (उगमाजवळील) डोंगराळ प्रदेश (शाडोल, मंडला, दुर्ग, बालाघाट आणि शिवनी)
  2. वरच्या बाजूचे मैदानी प्रदेश(जबलपूर, नरसिंगपूर, सागर, दामोह, छिंदवाडा, हुशंगाबाद, बैतूल, रायसेनशिहोर)
  3. मधले पठार (खांडवा, देवास, इंदूरधार )
  4. खालच्या बाजूचे (मुखाकडील) डोंगराळ प्रदेश (खरगोन, झाबुआ, नंदुरबार, बडौदा)
  5. खालच्या बाजूचे मैदानी प्रदेश (नर्मदा जिल्हा, भरूच जिल्हा)

उपनद्या

सातपुडा

  • शेर
  • शक्कर
  • दुधी
  • तवा (नर्मदेची सर्वांत मोठी उपनदी)
  • गंजल

विंध्य

  • हिरण
  • लोहार
  • करम
  • बारना

पर्यावरण

वनसंपदा

भूविज्ञान

नर्मदेचे खोरे भूदोषामुळे (पृथ्वीचे भूकवच प्रसारण पावताना तयार झालेला चर) तयार झाले आहे.

सातपुड्याचा उत्तरेकडील उतार व विंध्य पर्वताचा दक्षिणेकडील उतार यांनी नर्मदेचे पाणलोट क्षेत्र तयार झाले आहे. विंध्य पर्वताचे पठार मात्र उत्तर दिशेला झुकलेले असल्याने तेथील पाणी गंगा किंवा यमुना या नद्यांना जाते.

जीवाश्म विज्ञानाच्या दृष्टीने नर्मदेचे खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे. नर्मदेच्या खोर्‍यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहेत. (उदा. Titanosaurus indicus आणि Rajasaurus narmadensis.)

मानववंशशास्त्रदृष्ट्या महत्त्व

नर्मदा नदीच्या प्रदेशात असलेले भीमबेटका येथील पूर्वैतिहासिक गुंफाचित्रे आणि मानवी निवासस्थाने (इ.पू. १५०००) संयुक्त राष्ट्र संघटनेने 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली आहेत.

धरण व कालवे

धार्मिक महत्त्व

ओंकारेश्वर
  • नर्मदेकाठची मंदिरे (उगमापासून ते मुखापर्यंत, क्रमाने) खालीलप्रमाणे:
  1. अमरकंटक
  2. शुक्लतीर्थ
  3. ओंकारेश्वर
  4. महेश्वर
  5. सिद्धेश्वर
  6. चौसष्ट योगिनींचे मंदिर
  7. चोवीस अवतारांचे मंदिर
  8. भोजपूरचे शिवमंदिर
  9. भृगु ऋषीचे मंदिर
  • 'नार्मदीय ब्राह्मण' समाज नर्मदेला आपली कुलस्वामिनी मानतो.

पर्यटन

नर्मदेकाठची महत्त्वाची शहरे

मध्य प्रदेश

गुजरात

संदर्भ