"चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
मराठी नकाशा टाकला
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ २: ओळ २:
| संघर्ष = चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
| संघर्ष = चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
| या युद्धाचा भाग =[[इंग्रज-म्हैसूर युद्धे]]
| या युद्धाचा भाग =[[इंग्रज-म्हैसूर युद्धे]]
| चित्र = Anglo-Mysore War 4.png
| चित्र = Anglo-Mysore War 4.marathi.png
| चित्र रुंदी =
| चित्र रुंदी =
| चित्रवर्णन = सैन्यसंघर्षाचा नकाशा
| चित्रवर्णन = सैन्यसंघर्षाचा नकाशा

२१:४०, ५ जुलै २०१२ ची आवृत्ती

चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध
इंग्रज-म्हैसूर युद्धे ह्या युद्धाचा भाग
सैन्यसंघर्षाचा नकाशा
सैन्यसंघर्षाचा नकाशा
दिनांक इ.स. १७९८ ते इ.स. १७९९
स्थान भारत
परिणती टिपू सुलतानचा मृत्यू
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय
युद्धमान पक्ष
म्हैसूरचे राज्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
मराठा साम्राज्य
हैदराबादचा निजाम
त्रावणकोरचे राज्य
सेनापती
टिपू सुलतान
मिर गोलाम हुसेन
मोहम्मद हुलेन मिर मिरान
उमादत उल उम्र
गुलाम मोहम्मद खान
मिर सादीक
जनरल जॉर्ज हॅरीस
मेजर जनरल डेविड बेअर्ड
कर्नल आर्थर वेलेस्ली


चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्लिश: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ अँग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-म्हैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला.

पार्श्वभूमी

तिसर्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.

त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेची अक्षरश: पिळवणूक करावी लागली. त्याला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. टिपूने ज्या असुरी वृत्तीने ही रक्कम गोळा केली त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.[१]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ हबीब, इरफान. p. ३९ http://books.google.co.in/books/about/Confronting_colonialism.html?id=ckJuAAAAMAAJ&redir_esc=y. Missing or empty |title= (सहाय्य)