"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: map-bms:Fidel Castro (deleted)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ckb:فیدێل کاسترۆ
ओळ ५०: ओळ ५०:
[[bs:Fidel Castro]]
[[bs:Fidel Castro]]
[[ca:Fidel Castro Ruz]]
[[ca:Fidel Castro Ruz]]
[[ckb:فیدێل کاسترۆ]]
[[cs:Fidel Castro]]
[[cs:Fidel Castro]]
[[cv:Кастро Фидель]]
[[cv:Кастро Фидель]]

१७:३०, २४ जून २०१२ ची आवृत्ती

फिडेल कॅस्ट्रो

नाव


फिडेल अलजान्द्रो कॅस्ट्रो रुझ

पद


क्युबाचे राष्ट्राध्यक्ष , क्युबाच्या कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव , क्युबाच्या रिवॉल्यूशनरी आर्म फोर्सचे कमांडंट इन चीफ. प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी ३१ जुलै २००६ रोजी राहुल कॅस्ट्रो यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे सुपूर्द केलीत. एखाद्या देशाचे सर्वाधिक काळ प्रमुखपद भुषवणारे कॅस्ट्रो हे एकमेव नेते आहेत. त्यांनी आज म्हणजे १९ फेब्रुवारी २००८ रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

जन्मतारीख


क्युबाच्या ओरिएंट प्रांतात १३ ऑगस्ट १९२६ मध्ये कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. परंतु काहींच्या मते त्यांचा जन्म एका वर्षांनंतर झाला आहे.

शिक्षण


रोमन कॅथलिक स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झाले. तर हावाना युनिवर्सिटीत त्यांनी वकिली आणि समाजशास्त्राची पदवी घेतली.

क्रांतीपूर्वी


सॅन्टीऍगो येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून २६ जुलै १९५३ रोजी संघर्षाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते मॅक्सिकोमध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले. त्यातील बहुतांशी जणांना एक तर ठार केले नाही तर अटक केले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक मोठे लष्कर उभारले आणि फुलजेन्को बटिस्ताने १ जानेवारी १९५९ रोजी क्युबातून पलायन केल्यावर सत्ता हस्तगत केली.

क्रांतीनंतर


क्युबाने रशियाशी मैत्री करून केलेल्या अणूकरारानंतर युनायटेड स्टेटने क्युबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. परिणामी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने अणू युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर तीन दशकं क्युबा आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध होते. पूर्व युरोपात डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.

परिवार


इ.स. १९४८ मिर्टा डाएज - बलार्ट यांच्यबरोबर फिडेल कॉस्ट्रो यांचा विवाह झाला आहे. या उभयतांना इ.स. १९४९ साली मुलगा झाला. त्याचे नाव फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट. १९५५ साली त्यांचा डिवोर्स झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी दलिया सोटो डेल वॅले नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुलं असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्न झाली असल्याचं आणि त्यांना अनेक मुलं असल्याचं सांगण्यात येतं.