विजय कुमार मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजय कुमार मल्होत्रा (डिसेंबर ३,इ. स. १९३१:लाहोर, पाकिस्तान - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ. स. १९८९,इ. स. १९९९ आणि इ. स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली मधील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ. स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असलेल्या मनमोहन सिंह यांचा पराभव केला.