ब्रह्मकमळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रम्हकमळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रह्मकमळ
ब्रह्मकमळ
ब्रह्मकमळ
शास्त्रीय वर्गीकरण
कुळ: Asteraceae
जातकुळी: Saussurea
जीव: obvallata
शास्त्रीय नाव
Saussurea obvallata
(DC.) Edgew.[१]

ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हॅलाटा (Saussurea obvallata) हे आहे.

भारतात डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग वनस्पतीला अज्ञानवश 'ब्रह्मकमळ' असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती भिन्न भिन्न असून यांची कुळे पण वेगवेगळी आहेत.

सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. परंतु 'फुलांच्या दरीत' (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीनचार छोट्या फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी ही रचना आहे. हे ब्रह्मकमळ साधारणपणे एकटे-दुकटे नसते, ते तीन चार फुलांच्या गटांमध्येच आढळते. हे फूल हिमालयातील उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्रीकेदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहायची परंपरा आहे. त्यामुळेच याला देवपुष्प म्हणतात. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Saussurea obvallata (DC.) Edgew". The Plant List. Archived from the original on 2013-07-09. 6 August 2013 रोजी पाहिले.