पेणची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरदार वाघोजी तुपे विरुद्ध नामदार ताहेर खान[संपादन]

पेण शहरात गोटेश्वराचे फारच भव्य मंदिर आहे. या मंदिरापुढे असलेल्या नंदीच्या आकारावरून मंदिरातील शिवपिंड किती मोठीअसावी याची कल्पना येते. त्या काळात हे शिवमंदिर या पंचक्रोशीतप्रसिद्ध होते. या मंदिरापुढे भव्य अशी पुष्करणी होती. या मंदिराचेआवारच ५ ते ६ एकराचे होते. या आवारात भव्य असा बगीचा होता शाहिस्तेखान पुण्याला आला असताना नामदार ताहेरखान नावाचा सरदार मिऱ्या डोंगरावर आपली छावणी टाकून मुक्कामला होता. ताहेरखानाने पेणवर छापा घातला त्यात हे शिवमंदिर उध्वस्त केले.शिवाजी महाराजांनी पेणवर छापा घालण्यापूर्वी २७ फेब्रुवारी१६६२ चे सुमारास मिऱ्या डोंगरावर छावणी टाकलेल्या खानास व रतनगडावरील बलाकी सरदारास वेढा घातला.नेताजी पालकराने उंबरखिंडीच्या युद्धात खानाच्या सैन्याकडून जांभुळपाडय़ाचा परिसरमुक्त केला. कावजी कोंढाळकराने रतनगड जिंकून बलाकी सरदारास पळविले.बारा हजार सैन्य व सातशे पायदळासह नेताजी पालकराने मिऱ्या डोंगराला वेढा दिला.वाघोजी तुपे यांची कुमक येताच नामदार खानाचा पराभव होऊन खान पळून गेला. दुसऱया दिवशी२८फेब्रुवारी १६६२ रोजी सकाळीच शिवाजीचे हे सैन्य वाघोजी तुपे या सरदाराच्या नेतृत्वाखाली पेणच्या गढीवर चालून गेले. पेणच्या गढीलावेढा पडला. (पेणच्या मामलेदार कचेरीची जागा ही पेणची जुनी गढीहोती.) गढीचा संरक्षक खानही त्वरित तयारीनिशी वाघोजी तुपें समोर तलवारीनिशी उभा राहिला.समबल असलेले दोन्ही वीर लढत होते.दोन्ही वीर जखमांनी बेजार झाले. शेवटी एका योग्य क्षणी वाघोजी तुपे यांनी खानावर जबरदस्त प्रहार करून त्यास यमसदनास पाठविले.या लढाईत वाघोजी तुपेंना २७ जखमा झाल्या. या युद्धातमरण पावलेल्या मराठा सरदारांच्या समाध्या आजही मामलेदार कचेरीच्या प्रांगणात दिसतात.यानंतर, पेण शेवटपर्यंत मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात राहिले.