पहिला सेलीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पहिला सेलीम, ओस्मानी सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिला सेलीम

पहिला सेलीम (ओस्मानी तुर्की: سليم اوّل ; तुर्की: I.Selim ;) (ऑक्टोबर १०, इ.स. १४६५/इ.स. १४६६/इ.स. १४७० - सप्टेंबर २२, इ.स. १५२०) हा इ.स. १५१२ ते इ.स. १५२० या कालखंडादरम्यान ओस्मानी साम्राज्यावर अधिकारारूढ असलेला सुलतान होता. इस्लामाचा खलिफा हे बिरूद धारण करणारा तो पहिला ओस्मानी सुलतान होता. मध्यपूर्वेचा बहुतांश भूप्रदेश जिंकत त्याने ओस्मानी साम्राज्याकडे सुन्नी इस्लामाचे धुरिणत्व आणले. त्यापूर्वी मुख्यत्वेकरून पाश्चात्य ख्रिश्चन जगाविरुद्ध व बेय्लिकांविरुद्ध आक्रमक विस्ताराचे धोरण राखणाऱ्या ओस्मानी साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणांमध्ये या पूर्वाभिमुख मोहिमा म्हणजे मोठेच परिवर्तन होते. इ.स. १५२० साली पहिल्या सेलिमाच्या मृत्युपावेतो ओस्मानी साम्राज्य तिपटीने विस्तारून १ अब्ज एकरांवर पसरले होते.

बाह्य दुवे[संपादन]