पनोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पनोरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील गाव आहे.

  ?पनोरे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा लांजा
कोड
पिन कोड

• ४१६७०१

भौगोलिक स्थिती[संपादन]

पनोरे हे गाव साटवली-इसवली रस्त्यावर वसलेले आहे. लांजा-साटवली एसटी बसने गेल्यास साटवली बस थांब्यावर उतरून पुढे २ किमी चालत किंवा सायकलने जाता येते. लांजा-इसवली एसटी बसने थेट पनोरे गावात जाता येते.

लोकजीवन[संपादन]

मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. फणस, काजू, रातांबा, आणि हापूस आंबा ह्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. बाजार-रहाटासाठी दर बुधवारी भरणाऱ्या साटवली आठवडा बाजारावर येथील लोक अवलंबून असतात. येथे दुग्ध व्यवसाय तसेच बकरीपालन व्यवसाय हे शेतीपूरक जोडधंदे म्हणून केले जातात. लोक मेहनती, कष्टाळू, जिद्दी तसेच काटक आहेत. बरेचसे लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईत राहतात.गणपती, होळी, शिमगा सण साजरा करण्यासाठी ते प्रत्येक वर्षी आवर्जून गावी येतात.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

जवळपासची गावे[संपादन]

रावरी, इसवली, खानवली, लावगण, भडे, रुण, गोळवशी, इंदवटी, वनगुळे, वाकेड, बोरथडे ही जवळपासची गावे आहेत.इसवली ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html

२. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

३. http://tourism.gov.in/

  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html