चोरवड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चोरवड हे महाराष्ट्रातील एक गाव आहे.

बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ‘चोरवड’ हे गाव, महाराष्ट्राच्या दख्खन पठारात व दिशेने परभणीच्या आग्नेयेत वसलेले. परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर परभणी पासून ६५ किमी अंतरावर. जेमतेम दोन अडीचशे वस्तीचे गाव.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

‘चोरवड’ या शब्दाची फोड चोर + वड अशी होते, सुरुवातीला या दोन शब्दाचा अर्थ ‘चोर’ म्हणजे दुसऱ्याची वस्तू नकळत उचलून नेतो. पळवतो, तो ‘चोर’ अशी साधारण चोराची व्याख्या. या चोराची तीवृत्ता कमी अधिक असू शकते. पण ‘चोर’ म्हणजे बदमाश, आयतोबा, समाजकंटक व गुंड अशी मलीन प्रतिमा असते. ‘वड’ हे एक वृक्ष आहे. हिंदूधर्मात वडाच्या झाडाला पवित्र मानतात. सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस याची पूजा करतात. सितादेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. बौद्धधर्मी लोक पिंपळ, वड, असे सात वृक्षांना पवित्र बौद्धी वृक्ष असे मानतात.

हि एक दंतकथा आहे. गावाचे नाव चोरवड. पूर्वी या गावाला ‘सय्यदाचे चोरवड’ असे म्हणत. त्याहीपूर्वी याला ‘कमलापूर’ असे नाव होते. या गावाच्या थोड्या अंतरावर एक वाडाचे झाड होते. ते फार मोठे होते. त्या वडाला अंधाऱ्या वड म्हणत. ते वडाचे झाड दोन बिगा जमीन व्यापायचे असे भले मोठे होते. त्या वडाच्या झाडाखाली चोर दिवसभर विश्रांती घ्यायचे, अन् रात्री चोरी करायची, असा त्यांचा नित्यनियम. त्यांच्या या पराक्रमाने हा वड प्रसिद्धीच्या झोतात आला. अन् चोरांचा वड म्हणून पंचक्रोशीत कुप्रसिद्ध झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावाला ‘चोराचा वडगाव’ म्हणू लागले. पुढे चोराचा वड हे नाव मागे पडून तत्पुरुष समासातील ‘चोरवड’ हा शब्द रूढ झाला. नावात नकारात्मकता असूनही देशात एकूण सहा गावाचे नाव ‘चोरवड’ आहे. अशी ही गावाच्या नावाची कथा.

या गावाचा काही पुस्तकामध्ये किंवा जुन्या नकाशावर ‘चोखड’ असा ही उल्लेख आढळतो. त्यामुळे काही लोकांच्या मते ‘ख’ या अक्षरातून ‘र’ आणि ‘व’ असे दोन अक्षर निर्माण झाले असावे. ‘चोखड’ या शब्दाचा ‘चोरवड’ असा नवीन शब्द तयार झाला असावा. भारतात चोरवडनावाचे गाव, गुजरात मध्ये जुनागड जिल्ह्यात एक तसेच महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पारोळा, रावेर आणि भुसावळ या तालुक्यात प्रत्येकी एक व धुळे जिल्ह्यात साक्री या तालुक्यात तसेच. चोरवड गाव हे अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात आहे.

चोरवड[संपादन]

जि. जुनागड – गुजरात :[संपादन]

हे गाव रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक धीरजलाल हिराचंद अंबानी यांचे जन्मगाव. तिपानीनृत्याचा उगम येथे झाले आहे. तसेच नवाब साहेब मोहब्बत खान पॅलेस पुरातन ठिकाण प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे येथे ‘चोरवडी’ मातेचे मंदिर आहे. चोरवडी मातेच्या नावाने या गावाचे नाव चोरवड उदयास आलेले आहे.

“चांमुडा चंम्बिका गंगा महालक्ष्मी कालेश्वरी,

चोरवटेश्वरी भोगा वाराह्याद्या प्रकीर्तिता.’’

हे श्लोक कंडूला पुराणा मध्ये स्कंद पुराणात असे नमूद केले आहे. या पुराणा मध्ये ‘चोरवटेश्वरी’ मातेचा चोरवडी माता असा उल्लेख केला आहे. चोरवडी मातेचे मूळ स्वरूपाने भवानी माता आहे. भवानी माता म्हणजे पार्वती, महादेवाची पत्नी, महादेवाला भव असे म्हणतात. भवाची पत्नी भवानी. चोरवडी मातेच्या आदिवासा जवळ असणाऱ्या समुदायाला ‘झुंड’ म्हणतात. झुंड या शब्दाचा मूळ अर्थ वन जमीन असा होतो. तेथे जमीन क्षेत्र सुमारे १० एकर आहे. त्याचे   अवशेष आता ही पाहू शकता.

या गावात चोवडा जातीचे लोक राहत होते. चोवडा राजपूत याने या प्रदेशावर राज्य केले त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे चोवडा याला ‘चोरा’ असे संबोधू लागले. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातील नोटांचे किंवा इतर कागदपत्रांचे बंडल(ठिकाण) याला संस्कृत मध्ये ‘वटक’ असे होते. त्या ठिकाणच्या लोकांच्या मते ‘चोरावटक’ पासून चोरवड असा शब्द निर्माण झाला असावा.