चर्चा:युलिप (गुंतवणूक योजना)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही हे खरे परंतु राहवले नाही म्हणून हा कॉमेंटः अशा निरर्थक रिकाम्या लेखांनी काय साध्य होणार आहे? ह्यात एका शब्दाचाही मजकूर नाही की आंतरविकि दुवा नाही. ह्या लेखाला कोणतेही पान जोडलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे असे असंख्य लेख मराठी विकिपीडियावर अस्तित्वात आहेत. असे लेख असण्यापेक्षा नसलेले बरे असे कधीतरी वाटते.
अभिजीत साठे ०४:०६, २२ जुलै २०११ (UTC)

लेख पूर्ण केले असता त्याला अर्थ नसेल तर ते लेख काढावे. लेख आणि विकिपीडिया हे सतत वृद्धिंगत होत असणार्‍या चीजा आहेत. आत्ता आहे तीच परिस्थिती कायम राहणार नाही याची खात्री बाळगून पुढे जाणे हेच श्रेयस्कर.
अभय नातू ०४:३४, २२ जुलै २०११ (UTC)
असो. ह्याबाबत एकमत होणे अवघड आहे. ह्या लेखाचा मान राखण्याकरिता चार शब्द जोडतो... 12.4.26.248 १२:४९, २२ जुलै २०११ (UTC)
हे तर सगळ्यात उत्तम! अभिजीत, हे तुम्हीच लिहीले कि नाही माहिती नाही पण असेच अनेक लेखक आपल्याला लाभो ही इच्छा!!
अभय नातू १३:५७, २२ जुलै २०११ (UTC)
ता.क. निनावी सदस्या, तुझ्यासाठी भरपूर खाद्य! :-) विशेष:छोटी पाने