कोलकाता रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारत देशाचे कोलकाता रेल्वे स्थानक हे पश्चिम बंगालच्या कोलकाता महानगरामधील एक लांब पल्ल्याचे रेल्वे स्थानक आहे. चितपुर रेल्वे स्थानक ह्या जुन्या नावाने ओळखले जाणारे हे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे क्षेत्राच्या सियालदाह विभागाच्या अखत्यारीखाली येते. हावडा रेल्वे स्थानक, सियालदाह रेल्वे स्थानकशालिमार रेल्वे स्थानक ही कोलकात्यामधील इतर तीन प्रमुख स्थानके आहेत. कोलकाताचे उत्तर पूर्व बाजूस चितपूर विभागात कोलकाता रेल्वे स्थानक आहे.[१]

इतिहास[संपादन]

चितपूर रेल्वे स्थानक हे पूर्वी रेल्वे माल साठवणुकीचे फार मोठे ठिकाण होते. विशेषतः येथे कोळसा साठवणूक आणि लोडिंग करण्याचे ठिकाण होते. कोलकता शहरात सियालदाह रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे त्यावर दूरवर जाणाऱ्या प्रवाश्यांचा प्रचंड भार पडू लागला, त्याचे अपुरे जागेचे मर्यादेमुळे शिवाय स्थानिक प्रवाश्यांची लोकलची गर्दी वाढली त्यामुळे हे स्थानक प्रवाशी गर्दी सहन करू शकत न्हवते म्हणून रेल्वेने सन २००४-२००५ चे दरम्यान तेथे 9A आणि 9B हे दोन फ्लॅट फॉर्म बांधले.

सन २००० मध्ये या स्थानकात प्रवाशी वाहतूक करण्याचा निर्णय होऊन कोलकाता मध्ये दुसरे मोठे रेल्वे स्थानक निर्माण करण्याचा निर्णय झाला. अनेक अडचणींना सामोरे जात आणि त्या दूर करत शेवटी चितपूर रेल्वे स्थानक निर्माण करण्याची योजना कलकत्ता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (KMDA) मान्य केली आणि दी.१५ मे २००३ रोजी पश्चिम बंगाल राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी या रेल्वे स्थानकाचे कामाचा शिलान्यास केला.

या रेल्वे स्थानकाचे बांधकाम २००४ मध्ये सुरू झाले. रेल्वे स्थानकावर आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रिक काम, प्रवाशी सेवा, ट्रॅक, इत्यादी सर्व सुविधा पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २००६ मध्ये या रेल्वे स्थानकाचे आफिसीयली उद्घाटन झाले.[२]

सेवा[संपादन]

हे स्थानक सियालदाह- रानाघाट- कृष्णनगर- बेर्हंपोर-लालगोळा लाइन, या रेल्वे स्थानकाना जोडले तसेच नाईहति-बांडेल-कल्याणी सिमन्ता-गेडे-शांतिपूर- डंकुणी- कोलकता एर पोर्ट-बोंगाव-हासनाबाद-आणि इतर या पूर्व रेल्वे स्थानकाना जोडले.[३] या स्थानकात स्थानिक लोकल ट्रेन पेक्षा दूर पल्ल्याच्या ट्रेनचे प्रमाण खूप वाढले. या रेल्वे स्थानकात पांच फ्लॅट फॉर्म आहेत. त्यातील १ व २ स्थानिक लोकल साठी आणि ३,४,५ हे दूरवर जाणाऱ्या ट्रेन साठी वापरात आले. याचे व्यवस्थापन पूर्व रेल्वेचे अधिपत्याखाली होऊ लागले. कलकत्ता –ढाका मैत्री एक्सप्रेस की जी बांगलादेश कडे जाते ही येथून एक आंतरराष्ट्रीय ट्रेन निघते. दूरवर जाणाऱ्या ट्रेनचे प्रस्थान येथुन ठरविल्याने सियालदाह आणि हावडा येथून प्रस्थान करणाऱ्या बऱ्याच ट्रेन येथून प्रस्थान करू लागल्या आहेत. दी.२०-३-२०१० रोजी पहिल्यांदा महाराजा एक्सप्रेस ट्रेन येथून प्रस्थान करू लागली.

खालील ट्रेन या स्थानकातून प्रस्थान करतात.[४]

  • कोलकाता - पाटणा गरीब रथ एक्सप्रेस
  • कोलकाता - गुवाहाटी गरीब रथ एक्सप्रेस
  • कोलकाता - अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस
  • कोलकाता - आनंद विहार एक्सप्रेस
  • कोलकाता - हळदीबरी त्री वीकली इंटर्सिटी एक्सप्रेस
  • मैथिली एक्सप्रेस
  • कोलकाता - जोगबाणी एक्सप्रेस
  • कोलकाता - जयनगर वीकली एक्सप्रेस
  • कोलकाता - सीतमारी मिथीलंचल एक्सप्रेस
  • कोलकाता - राधिकापुर एक्सप्रेस व्हाया राईगंज
  • कोलकाता - गोरखपूर पूर्वांचल एक्सप्रेस व्हाया मुजफ्फरपुर
  • कोलकाता - गोरखपूर पूर्वांचल एक्सप्रेस व्हाया बालिया
  • कोलकाता - गोरखपूर पूर्वांचल एक्सप्रेस व्हाया नर्कतीयगंज
  • कोलकाता - जम्मू तावी एक्सप्रेस
  • कोलकाता - मुजफ्फरपुर तिरहुत एक्सप्रेस
  • कोलकाता - गिरीदी लिंक एक्सप्रेस
  • कोलकाता - बलूरघाट तेभगा एक्सप्रेस
  • दिब्रुगढ - कोलकाता सुपरफास्ट एक्सप्रेस
  • कोलकाता - नांगळ डॅम गुरुमुखी सुपरफास्ट एक्सप्रेस
  • कोलकाता - अजमेर वीकली एक्सप्रेस व्हाया कोटा
  • कोलकाता - आग्रा कोंटांमेंट सुपरफास्ट एक्सप्रेस
  • कोलकाता - आग्रा कोंटांमेंट एक्सप्रेस
  • कोलकाता - अजमेर वीकली एक्सप्रेस व्हाया निमच
  • कोलकाता - लालगोळा हजरदूयरी एक्सप्रेस
  • कोलकाता - झांसी प्रथम स्वतंत्रता संग्राम एक्सप्रेस
  • कोलकाता - ढाक्का कांट्ट मैत्री एक्सप्रेस (भारत – बांगलादेश अंतरराष्ट्रीय एकमेव ट्रेन)
  • कोलकाता - अजमगड वीकली एक्सप्रेस
  • कोलकाता - लालगोळा धांनोध्याण्या त्री वीकली एक्सप्रेस
  • कोलकाता - लालगोळा पॅसेंजर
  • अकाल तक्थ सुपरफास्ट बी-वीकली एक्सप्रेस
  • अनन्या एक्सप्रेस (वीकली)

या रेल्वे स्थानकासाठी बस मार्ग[संपादन]

KB सीरीज मार्ग[संपादन]

KB20 धूलगर – कोलकाता रेल्वे स्थानक

K सीरीज मार्ग[संपादन]

के1 कोलकाता रेल्वे स्थानक – न्यू टाऊन

JM सीरीज बस मार्ग[संपादन]

007 कोलकाता रेल्वे स्थानक –गरीय बस स्थानक JM2 कोलकाता रेल्वे स्थानक –मलांचा (सुभाषग्राम स्थानक)

मिनी बस मार्ग[संपादन]

189 हावडा मैदान - कोलकता रेल्वे स्थानक

STA बस मार्ग[संपादन]

कोलकाता रेल्वे स्थानक –मलांचा

विना क्रमांक बस मार्ग[संपादन]

कोलकाता रेल्वे स्थानक – चकला कोलकाता रेल्वे स्थानक – बाईड्याबती स्थानक कोलकाता रेल्वे स्थानक – बगणन कोलकाता रेल्वे स्थानक – आलमपुर कोलकाता रेल्वे स्थानक – घाटल (AC/Non AC) कोलकाता रेल्वे स्थानक – चंद्रकोना रोड

WBSTC फ्रेंचाइजी बस मार्ग[संपादन]

कोलकाता रेल्वे स्थानक – सोनारपूर स्थानक

CSTC बस मार्ग[संपादन]

S45 शकुंतला पार्क - कोलकाता रेल्वे स्थानक S53 कोलकाता रेल्वे स्थानक – न्यू टाऊन युनिटेक

अवलोकन[संपादन]

या रेल्वे स्थानकासाठी आवश्यक असणारी सार्वजनिक बस सेवा समाधानकारक नाही. पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत परिवहन सेवेतील फक्त दोन तीन बस मार्ग या रेल्वे स्थानकाशी जोडलेले आहेत. इतर बस मार्ग आणि ट्रॅम सेवा थांबे या रेल्वे स्थानकापासून एक किमी दूर आहेत. अतिशय जवळचे मेट्रो स्थानक ही दोन किमी दूर आहे. यासंबंधा ने योजना विचाराधीन असल्या तरी अध्याप त्या मार्गी लागलेल्या नाहीत त्यामुळे प्रवाशी टीका करतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कोलकाता रेल्वे स्थानकांचा इतिहास". Archived from the original on 2019-11-17. 2016-11-14 रोजी पाहिले.
  2. ^ "कोलकाता रेल्वे स्थानकांचा अधिकृत कोड". Archived from the original on 2018-12-18. 2016-11-14 रोजी पाहिले.
  3. ^ "कोलकाता रेल्वे स्थानकांची यादी".
  4. ^ "कोलकाता रेल्वे स्थानकातून प्रस्थान करणाऱ्या ट्रेन".