ऑरेंज वॉक टाउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑरेंज वॉक टाउन बेलीझमधील एक शहर आहे. ऑरेंज वॉक जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार १३,६८७ होती.

प्राचीन माया लोक या भागाला होल्पातिन या नावाने ओळखत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युकातान संघर्षातील निर्वासित मोठ्या प्रमाणात या शहरात स्थायिक झाले.

येथील साखर कारखाना जिल्ह्यातील उसाच्या पीकाचे गाळप करतो.

ट्रॉपिक एरची विमानसेवा ऑरेंज वॉक विमानतळाला बेलीझ सिटीशी जोडतो.