एडवर्ड झेझेपानिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड झेझेपानिक

एडवर्ड झेझेपानिक (पोलिश: Edward Franciszek Szczepanik; २२ ऑगस्ट १९१५ - ११ ऑक्टोबर २००५) हा एक पोलिश अर्थतज्ञ व युनायटेड किंग्डममधून चालवल्या जात असलेल्या पोलंडच्या प्रतिसरकारचा अखेरचा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९८६ ते डिसेंबर १९९० दरम्यान ह्या पदावर होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाच्या छत्रछायेखाली पोलंडमध्ये साम्यवादी राजवट होती. ह्या कम्युनिस्ट सरकारचा विरोध करण्यासाठी ब्रिटनमधून पोलंडचे एक प्रतिसरकार जालवले जात असे. ह्या सरकारला कोणतीही राजकीय मान्यता अथवा अधिकार नव्हते व ते केवळ औपचारिक स्वरूपाचे होते. १९९० मध्ये पोलंडने साम्यवाद झिडकारून प्रजासत्ताक पद्धतीचे अवलंबन केल्यानंतर हे प्रतिसरकार बरखास्त करण्यात आले.