अधर्माच्या पाच शाखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा.

’विधर्म’[संपादन]

धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो ’विधर्म’ होय.

’परधर्म’[संपादन]

आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म ’परधर्म’ होय.

’उपधर्म’ किंवा ’उपमा’[संपादन]

पाखंड किंवा दंभ म्हणजे ’उपधर्म’ किंवा ’उपमा’ होय.

’छ्ल’[संपादन]

शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा ’छ्ल’ होय.

’आभास’[संपादन]

आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ’आभास’ होय.

संदर्भ :

श्रीमद् भागवत महापुराण स्कंध-७ वा-अध्याय १५ वा श्लोक १२-१४)