जागतिक व्यापार संघटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(WTO या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
जागतिक व्यापार संघटना
World Trade Organization (इंग्रजी)
Organisation mondiale du commerce (फ्रेंच)
Organización Mundial del Comercio (स्पॅनिश)

World Trade Organization (logo and wordmark).svg

WTO members and observers.svg
  सदस्य
  सदस्य, युरोपियन संघाद्वारे प्रतिनिधीत्व
  निरिक्षक
  सदस्य नाही
स्थापना१ जानेवारी १९९५
मुख्यालयजिनिव्हा, स्वित्झर्लंड
सदस्यता१64 सदस्य राष्ट्रे
अधिकृत भाषाइंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश
वेबसाईटwto.org

जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी डब्ल्यू.टी.ओ.ची प्रमुख कामे आहेत. भारतासह जगातील 164 देश ह्या संघटनेचे सदस्य तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.

आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .

जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक[संपादन]

जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत.

नाव पासून पर्यंत देश
पीटर सदरलँड १ जानेवारी १९९५ १ मे १९९५ आयर्लंड
रिनेटो रूगीइरो १ मे १९९५ १ सप्टेंबर १९९९ इटली
माईक मूर १ सप्टेंबर १९९९ १ सप्टेंबर २००२ न्यूझीलंड
सुपाचाई पनीटचपकडी १ सप्टेंबर २००२ १ सप्टेंबर २००५ थायलंड
पास्कल लॅमी १ सप्टेंबर २००५ १ सप्टेंबर २०१३ फ्रान्स
रॉबर्टो अ‍ॅझेवेडो १ सप्टेंबर २०१३  ---- ब्राझील

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: