सदस्य:Meghashyam
कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांकडून ‘आध्यात्मिक’ पक्ष स्थापन
चेन्नई(वृत्तसंस्था) - कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्री जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी ‘तामिळनाडू नॅशनल स्पिरिच्युचल पीपल्स पार्टी’ या पक्षाची परवा अधिकृतरीत्या स्थापना केली.
या पक्षामध्ये शंकराचार्यांनी कोणतेच पद स्वीकारलेले नाही. कांची मठाशी संबंधित उद्योजक अवदी रविचंद्रन हे या पक्षाचे संस्थापक नेते आहेत. पक्षाने निवडणूक लढवण्याचा सध्या विचार केलेला नाही; परंतु पक्षाचा जाहीरनामा निश्चित करण्यात आला आहे. धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा करणे, गोहत्या बंदी कायदा करणे आणि शासनाकडे असलेला मंदिरांच्या व्यवस्थापनाचा अधिकार काढून घेऊन तो खाजगी संघटनांकडे सोपवणे इत्यादी विषय या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत. या पक्षाच्या झेंड्याचा रंग लाल असून त्यावर भगव्या वर्तुळामध्ये उंचावलेली हाताची मूठ दाखवण्यात आली आहे. या झेंड्यावर पुष्पवर्षाव करून शंकराचार्य म्हणाले, ‘‘लोकांना ईश्वराच्या भक्तीकडे वळवण्याची ही चळवळ आहे. आमच्या सभोवती असलेल्या सर्व राक्षसी वृत्तीचा नाश करणे आणि सर्वांनी शुद्ध अन् आनंदी जीवन जगणे, हा या चळवळीमागचा मुख्य उद्देश आहे’. केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमामध्ये हस्तक्षेप करू नये, त्यासाठी शासन नियम आणि अटी घालू शकता’ असा ठराव या पक्षाच्या वतीने करण्यात आला.