सोमनाथ शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Som nath sharma या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्याला ह्या पदकाने गौरविण्यात आले . त्याला पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले हि घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्या वेळेस काश्मीर मध्ये घडली .तो चौथ्या कुमाऊन रेजिमेंट मधील होता.


  life

सोमनाथ शर्माचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली एका ब्राम्हण परिवारात भारतातील हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला .त्याचे वडील मेजर जनरल अमर नाथ शर्मा सैन्यातील वरच्या स्थरा वरचे अधिकारी होते त्यांचे बंधू lt. जनरल सुरेंद्र नाथ शर्मा, जनरल विश्व नाथ शर्मा आणि बहिण मेजर कमला तिवारी हे होते .त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनिताल येथील शेरवूड महाविद्यालयात केले , नंतर त्यांनी रॉयल मिलिटरी अकादमी मध्ये प्रवेश घेतला .

बदगामची लढाई[संपादन]

३१ ऑक्टोबर, इ.स. १९४७ रोजी सोमनाथ शर्माची रवानगी श्रीनगरला झाली .त्याच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झाली असून सुद्धा तो युद्धासाठी श्रीनगरला गेला. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोम नाथ शर्माच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्याच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्माला कळून चुकले की पाकिस्तानी येथून पुढे सरकले तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल.

शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मास वीर मरण आले. त्याची शेवटची वाक्ये "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू." या दरम्यान १ बटालियन कुमाउँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला.