साठेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Sathewadi या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

साठेवाडी हे गाव महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात वसले आहे. गावाचे ग्रामदैवत गुजाई देवी आहे. दुर् दुर् ठिकानाहुन भाविक देवीचे दर्शन घेन्यासाठी येत् असतात.

लोकसंख्या[संपादन]

गावाची लोकसंख्या सुमारे ५०० ते ६०० आहे (इ.स. २००९).

प्रशासन[संपादन]

गावाचा कारभार साठेवाडी ग्रामपंचायत पाहते. ग्रामपंचायतीची स्थापना १९८९ साली झाली. गावचे सुपुत्र मानसिंगराव जाधव हे गावाचे पहिले सरपंच होते.

उल्लेखनीय कार्य[संपादन]

नुकतेच गावाने ग्रामस्वच्छतेसाठी दिल्ली येथे पारितोषिक पटकवले. सप्टेंबर २००७ वर्षासाठी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये गावाने ग्रामस्वच्छता केली. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली होती, त्यात साठेवाडी गावाचा समावेश होता. संतोष जाधव हे इ.स. २०११च्या सुमारास सरपंच आहेत.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.