रिंकू राजगुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(Rinku Rajguru या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
रिंकू राजगुरू
जन्म ३ जून २००१[१]
अकलूज, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१६ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट सैराट

प्रेरणा महादेव राजगुरु एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[२] ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.[३][४] तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. ती सध्या जिजामाता कन्या प्रशाला या (अकलुज : जिल्हा सोलापूर) शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकूचे कौतुक होत आहे. जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल ह्याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तिला अभिनयाची जन्मजातच देणगी असल्याचे या सिनेमातील तिच्या ज्वलंत अभिनयामुळे दिसून येत आहे. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[५] तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकूला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भाषा व्यक्तिरेखा टीप
२०१६ सैराट मराठी आर्ची (अर्चना पाटील) ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग) मिळाला.
२०१७ मान्सू मिलान्गय कन्नड सानवी ३१ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित.
२०१८ [धडक]] हिंदी पार्थवी नायिकेच्या भूमिकेत जान्हवी कपूर २० जुलै २०१८ रोजी प्रदर्शित.

पुरस्कार[संपादन]

  • स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग)

बाह्य दुवा[संपादन]


संदर्भ[संपादन]