Measles vaccine

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
 
विकिडाटा आयडी सापडली नाही!

vaccine ला विकिडाटा वर शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा.
माध्यमे अपभारण करा

गोवर लस ही अशी लस आहे जी गोवर प्रतिबंधित करते. एका डोसनंतर प्रतिकारशक्ती विकसित होत नाही अशा जवळजवळ सर्वच जणांना दुसर्‍या डोस नंतर विकसित होते. जेव्हा लोकसंख्येमध्ये लसीकरणाचा दर 92% पेक्षा जास्त असतो तेव्हा गोवरचा उद्रेक दिसून येत नाही; तथापि, लसीकरणाचा दर कमी झाल्यास तो पुन्हा येऊ शकतो. लसचा प्रभाव बरीच वर्षे टिकतो. कालांतराने ती कमी प्रभावी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. गोवरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दोन दिवसांत लस दिली असल्यास गोवरपासून संरक्षण सुद्धा होऊ शकते.[१]

एचआयव्ही संसर्ग झालेल्यांसाठीसुद्धा ही लस सामान्यत: सुरक्षित असते.[१] आनुषंगिक परिणाम सामान्यत: सौम्य असतात आणि अल्पकाळ टिकतात. यामध्ये इंजेक्शन जागेवर वेदना किंवा सौम्य ताप यांचा समावेश होतो. प्रत्येक दशलक्ष डोसांपैकी अ‍ॅनाफिलेक्सिसचे डोस सुमारे 3.5-10 प्रकरणांमध्ये नोंदविले गेले आहेत. गोवर लसीकरणामुळे गोईलिन–बॅर सिंड्रोम, ऑटिझम आणि दाहक आतड्यांसंबंधीच्या रोगाच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून आलेले नाही.

लस दोन्हीप्रकारे म्हणजे प्रत्यक्ष लस आणि एमएमआर लस अशा संयोजनामध्येही (रुबेला लस आणि गालगुंड लस यांचे एक संयोजन) उपलब्ध आहे[१] किंवा MMRV लस (एमएमआर आणि कांजिण्याची लस यांचे एक संयोजन).[२] गोवरची लस सर्व पातळीवरील गोवर प्रतिबंधित करण्यासाठी तितकीच प्रभावी आहे, परंतु संयोजनानुसार त्याचे आंनुषंगिक परिणाम बदलतात.[३] जागतिक आरोग्य संघटनेने अशी शिफारस केली आहे की जगातील ज्या भागात हा रोग सामान्य आहे अशा ठिकाणी वयाच्या नवव्या महिन्यामध्ये किंवा जेथे हा रोग सामान्य नाही तेथे वयाच्या बाराव्या महिन्यामध्ये दिली जावी. गोवरची लस गोवरच्या जिवंत परंतु कमकुवत ताणांवर आधारित आहे. ही वाळलेल्या पावडरसारखी असते जी एकतर अगदी त्वचेखाली किंवा स्नायूमध्ये इंजेक्शन देण्यापूर्वी विशिष्ट द्रव मिसळून दिली जाते. ही लस प्रभावी होती का याची तपासणी रक्त चाचणीद्वारे केली जाऊ शकते.

2013 पर्यंत जगभरातील सुमारे 85% मुलांना ही लस मिळाली आहे.[४] 2015 मध्ये कमीतकमी 160 देशांनी त्यांच्या नियमित लसीकरणामध्ये दोन डोस दिले आहेत.[५] गोवरची लस प्रथम 1963 मध्ये सुरू करण्यात आली होती.[६] ही जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या सूचीमध्ये आहे, जी आरोग्य यंत्रणेमध्ये आवश्यक असलेली सर्वात प्रभावी आणि सुरक्षित औषधे आहेत.[७] 2014 पर्यंत विकसनशील जगामध्ये घाऊक किंमत प्रति डोस अंदाजे 0.70 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.[८] कमी-लसीकरण झालेल्या लोकसंख्येमध्ये सहजतेने उद्रेक होत असल्याने, हा रोग अशा लोकसंख्येमध्ये पुरेशा लसीकरणाची चाचणी म्हणून पाहिला जातो.[९]

  1. a b c "Measles vaccines: WHO position paper – April 2017". Weekly Epidemiological Record (English, French मजकूर) 92 (17): 205–27. April 2017. पी.एम.आय.डी. 28459148. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 8 September 2017 रोजी मिळविली). 
  2. ^ Mitchell, Deborah (2013). The essential guide to children's vaccines. New York: St. Martin's Press. पान क्रमांक 127. आय.एस.बी.एन. 978-1-4668-2750-9. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 9 September 2017 रोजी मिळविली).  Unknown parameter |name-list-format= ignored (सहाय्य)
  3. ^ http://www.who.int/vaccine_safety/initiative/tools/MMR_vaccine_rates_information_sheet.pdf?ua=1.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  4. ^ https://web.archive.org/web/20150203144905/http://www.who.int/mediacentre/factsheets/fs286/en/. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 3 February 2015 रोजी मिळविली).  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  5. ^ https://web.archive.org/web/20170713161900/http://www.who.int/mediacentre/factsheets/fs378/en/. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 13 July 2017 रोजी मिळविली).  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  6. ^ Centers for Disease Control and Prevention (2014). CDC health information for international travel 2014 the yellow book. पान क्रमांक 250. आय.एस.बी.एन. 978-0-19-994850-5. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 9 September 2017 रोजी मिळविली). 
  7. ^ https://web.archive.org/web/20161213052708/http://www.who.int/medicines/publications/essentialmedicines/EML_2015_FINAL_amended_NOV2015.pdf?ua=1. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 13 December 2016 रोजी मिळविली).  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  8. ^ http://mshpriceguide.org/en/single-drug-information/?DMFId=793&searchYear=2014.  हरवलेले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)
  9. ^ Abramson, Brian (2018). Vaccine, vaccination, and immunization law. Bloomberg Law. pp. 10–30. आय.एस.बी.एन. 978-1-68267-583-0.  Unknown parameter |name-list-format= ignored (सहाय्य)