ॲलन डॉनल्ड
Appearance

ॲलन डॉनल्ड (इंग्लिश: Allan Donald; २० ऑक्टोबर, १९६६ , ब्लूमफॉंटेन) हा दक्षिण आफ्रिकेचा एक निवृत्त क्रिकेट खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३३० बळी घेणारा डॉनल्ड हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जात असे. सध्या डॉनल्ड भारतीय प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा प्रशिक्षक आहे.