ॲन बँक्रॉफ्ट
आना मरिया लुइसा इटालियानो तथा ॲन बँक्रॉफ्ट (१७ सप्टेंबर, इ.स. १९३१:ब्रॉंक्स, न्यू यॉर्क, अमेरिका - ६ जून, इ.स. २००५:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री होती. हिला एक ऑस्कर, दोन बॅफ्टा, दोन गोल्डन ग्लोब, दोन टोनी आणि दोन एमी पुरस्कार मिळाले होते.
हिने द मिरॅकल वर्कर या चित्रपटात हेलेन केलरची शिक्षिका ॲन सुलिव्हानची भूमिका केली होती. द ग्रॅज्युएट चित्रपटातील मिसेस रॉबिन्सनच्या भूमिकेसाठी ही विशेष प्रसिद्ध झाली.