ॲनेट बेनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲनेट कॅरोल बेनिंग [१] (२९ मे, १९५८:टोपेका, कॅन्सस, अमेरिका - ) [२] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. हीने रंगमंचावर आणि चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत. चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत बेनिंगला बाफ्टा पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार तसेच एमी पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार मिळाले आहेत तसेच चार अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनेही मिळाली आहेत.

बेनिंगने १९८०मध्ये कॉलोराडो शेक्सपियर फेस्टिव्हल कंपनीतून रंगमंचावर कारकिर्दीची सुरुवात केली

बेनिंगला द ग्रिफ्टर्स (१९९०), अमेरिकन ब्युटी (१९९९), बिईंग जुलिया (२००४), आणि द किड्स आर ऑल राईट (२०१०) चित्रपटांतील भूमिकांसाठी चार अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली. याशिवाय तिने पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज (१९९०), बग्सी (१९९१), रिचर्ड III (१९९५), द अमेरिकन प्रेसिडेंट (१९९५) सह अनेक चित्रपटांतून काम केले आहे.

१९९९ मध्ये बेनिंग

संदर्भ[संपादन]

  1. ^ "#83 Royal Descents, Notable Kin, and Printed Sources: A Third Set of Ten Hollywood Figures (or Groups Thereof), with a Coda on Two Directors". AmericanAncestors.org. April 18, 2008. Archived from the original on October 18, 2014. January 21, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Annette Bening Biography: Film Actress (1958–)". Biography.com (FYI / A&E Networks). Archived from the original on July 3, 2016. February 6, 2017 रोजी पाहिले.