ॲनी मार्गारेट रॉबिन्सन
Appearance
ॲनी मार्गारेट रॉबिन्सन ऊर्फ श्रद्धावान (जन्म - ४ जून १९४२, मृत्यू - १९ जुलै २०२२ [१]) इंग्लिश लेखिका, ऑरोविल येथील सावित्री भवनच्या प्रकल्प समन्वयक. [२] भाषांतरकार, संशोधक, प्रशासक या विविध भूमिकेतून त्या ओळखल्या जातात. [१]
जीवन
[संपादन]ॲनी यांचे वडील प्रोटेस्टंट पास्टर होते तर आई शिक्षिका होत्या. ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी, लंडन येथे इंग्रजी भाषा आणि साहित्याचे तसेच ग्रंथालयशास्त्राचे अध्ययन केले. भारतात येण्यापूर्वी त्यांनी युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया येथे प्रवास केला होता.[२]
१९७० मध्ये ऑरोविल येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या. श्रीमाताजी यांनी त्यांना १९७२ मध्ये श्रद्धावान हे नाम दिले. [३]
कार्य
[संपादन]- ऑरोविलमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्यावर शिक्षिका या नात्याने जबाबदारी सोपविण्यात आली.
- सावित्री भवनच्या निर्मितीपासून ॲनी यांचा त्यामध्ये सहभाग होता.ऑगस्ट १९९९ पासून त्या या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम पाहू लागल्या.[३]
- इनव्होकेशन या सावित्री भवनच्या नियतकालिकाच्या त्या संपादक होत्या.
- श्रीअरविंद लिखित सावित्री आणि लाईफ डिव्हाईन या ग्रंथावरील अभ्यास-वर्गामध्ये त्या अध्यापन करत असत. त्या सावित्री वरील अभ्यासवर्ग २५ वर्षे चालवीत होत्या. [१]
प्रकाशित लेखन
[संपादन]- ॲनी यांच्या कविता, कथा, लेख, पुस्तक परिचय इत्यादी साहित्य मदर इंडिया आणि हेरिटेज या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
- काव्यसंग्रह - स्टार्स इन द सूप [१]
- इंग्लिश ऑफ सावित्री (१२ खंड)
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]२०१२ साली त्यांना ऑरोरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. [१]
अधिक माहितीसाठी
[संपादन]इंग्लिश ऑफ सावित्री (व्याख्याने)