ॲडॅप्टिव्ह मल्टिरेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अ‍ॅडॅप्टिव्ह मल्टिरेट (इंग्लिश: Adaptive Multi-Rate ; रोमन लिपीतील लघुरूप : AMR) ही 'स्पीच कोडिंग'साठी बनवलेली 'ऑडिओ डेटा कॉम्प्रेशन'ची पद्धत आहे. ऑक्टोबर १९९८ मध्ये 3GPP ने ए‍एम्‌आरला प्रमाणित स्पीच कोडेक म्हणून मान्यता दिली; आणि आता जीएस्‌एम्‌मध्येदेखील त्याचा बराच वापर होत आहे. ए‍एम्‌आरमध्ये लिंक अ‍ॅडॅप्टेशन नावाचे तंत्र वापरले जाते. या तंत्रामध्ये वाहिनीच्या (लिंकच्या) स्थितीनुसार आठ वेगवेगळ्या बिटरेटांमधून एक बिटरेट निवडला जातो.

ए‍एम्‌आरमध्ये १२.२, १०.२, ७.९५, ७.४०, ६.७०, ५.९०, ५.१५ आणि ४.७५ केबीपीएस्‌ एवढे बिटरेट उपलब्ध आहेत.