ॲटलेटिको दे कोलकाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲटलेटिको दे कोलकाता
ॲटलेटिको दे कोलकाता.png
पूर्ण नाव ॲटलेटिको दे कोलकाता
टोपणनाव बंगालचे वाघ
स्थापना ७ मे २०१४[१]
मैदान सॉल्ट लेक स्टेडियम
कोलकाता, पश्चिम बंगाल
(आसनक्षमता: ६८,०००[२])
लीग इंडियन सुपर लीग
२०१४ विजयी
यजमान रंग
पाहुणे रंग

ॲटलेटिको दे कोलकाता (इंग्लिश: Atlético de Kolkata) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे सहभाग घेणारा पहिला क्लब आहे.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सौरभ गांगुली, हर्षवर्धन नेओशिया, संजीव गोएंका तसेच स्पेनमधील ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबाने एकत्रितपणे ॲटलेटिको दे कोलकाता क्लबाची स्थापना केली. २०१४ सालच्या आय.एस.एल.च्या (इंडियन सुपर लीगच्या) पहिल्या हंगामामध्ये कोलकाताचा संघ विजयी झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian Super League football: Sourav Ganguly devanshi-backed Atletico de Kolkata launched". Archived from the original on 2014-10-06. 2014-12-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Transformed and shrunk Saltlake स्टेडियम ready for ISL".

बाह्य दुवे[संपादन]

साचा:इंडियन सुपर लीग