ऑस्कर कार्मोना
| अँतोनियो ऑस्कर दि फ्रागोसो कार्मोना | |
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष
| |
| पंतप्रधान | स्वतः होजे व्हिसेंते दि फ्रैतास आर्तुर इव्हेन्स फेर्राझ दॉमिंगो ऑलिव्हेरा अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार |
|---|---|
| जन्म | २४ नोव्हेंबर, १८६९ |
| मृत्यू | १८ एप्रिल, १९५१ (वय ८१) |
| राजकीय पक्ष | नॅशनल युनियन (१९३२–१९५१) |
अँतोनियो ऑस्कर दि फ्रागोसो कार्मोना [a] [१] (२४ नोव्हेंबर, १८६९:लिस्बन, पोर्तुगाल) – १८ एप्रिल, १९५१:लिस्बन) हे पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान होते. हे १९२६ ते १९५१ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होते.
यांची आई मरिया इनेस कोर्ते-रेआल दि मेलो फ्रागोसो [२] लष्करी कर्मचारी होती तर वडील अल्वारो रोसारियो टेक्सेरा कार्मोना मूळ ब्राझिलमधील फेल्ग्वेरास येथील पोर्तुगीज आरमारी अधिकारी होते. कार्मोनाने यांनी मरिया दो कार्मो फेरेरा दा सिल्वा यांच्याशी विवाह केला. या लग्नामुळे त्यांच्या तीन मुलांना कायदेशीर मान्यता मिळाली.
कार्मोना लिस्बनच्या माजी महापौर कार्मोना रॉड्रिग्ज (२००४-२००७) यांचे आजोबा होते. ते ब्राझिलचे अध्यक्ष आउगुस्तो तास्सो फ्रागोसो यांचे मामेभाऊ होत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Cidadãos nacionais agraciados com ordens portuguesas" [Nationals with portuguese orders]. Gran Master's official website for the honorific orders (पोर्तुगीज भाषेत). April 11, 2025 रोजी पाहिले.
- ^ "Óscar Carmona - Biografia". museu.presidencia.pt. 20 May 2022 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.